भारतात दूरसंचार सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी भारती एअरटेल ३.५ गिगाहट्र्झ, २६ गिगाहट्र्झ, २१०० मेगाहट्र्झ, १८०० मेगाहट्र्झ, ९०० मेगाहट्र्झ बॅण्ड्सचे हक्क मिळवत देशात ५ जी क्रांती घडवण्यास सज्ज झाली आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून करण्यात आलेल्या लिलावात कंपनीने ध्वनिलहरींमधील एकूण १९ हजार ८६७.८ मेगाहट्र्झचे हक्क मिळवले आहेत. ध्वनीलहरींचा ही मोठी बँक एकूण ४३ हजार ८४ कोटींच्या मोबदल्यात विकत घेण्यात आली आहे.

सध्या देशातील सर्वात मोठी मोबाइल ब्रॉडबॅण्ड कंपनी एअरटेल देशाच्या ५ जी क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी मजबूत स्थितीत आहे. गेल्या वर्षभरापासून कंपनी विविध क्षेत्रांमध्ये असणाऱ्या असंख्य भागीदारांसह वेगेवळ्या प्रकरणांचा अभ्यास करत असून, आपल्या क्षेत्रात अग्रस्थानी राहिली आणि ५ जी तंत्रज्ञानाची प्रणेता ठरली आहे.

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
DJ used for entertainment
आवाज वाढव डीजे तुला..
confidence petroleum bw lpg jv to invest rs 650 crores in jnpt for new lpg terminal
जेएनपीटीमध्ये ६५० कोटींच्या गुंतवणुकीतून नवीन एलपीजी टर्मिनल; नॉर्वेस्थित बीडब्ल्यू एलपीजीशी भागीदारीतून ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम’ची योजना
amount from cyber fraud re-deposited in bank accounts of citizens Vivek Phansalkar
सायबर फसवणुकीतील २४.५ करोड रुपये पुन्हा नागरिकांच्या बँक खात्यात जमा – विवेक फणसाळकर

या लिलावाच्या माध्यमातून एअरटेलने २० वर्षांसाठी ५ जी ध्वनिलहरी मिळवल्या आहेत. याचा अर्थ कंपनीला पुढील अनेक वर्ष ध्वनिलहरींवर मोठी रक्कम खर्च करावी लागणार नाही. याशिवाय, अतिरिक्त ध्वनिलिहरी मिळवत एअरटेल नवीन प्रवेशकर्त्यांच्या तुलनेत स्पेक्ट्रम वापर शुल्क (SUC) लवाद कमी करण्यास आणि   स्पेक्ट्रम वापर शुल्क पेआउट लक्षणीयरीत्या कमी करण्यास सक्षम ठरली आहे.

भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी सांगितल्यानुसार “५ जी लिलावातील निकालावर एअरटेल आनंदी आहे. नुकत्याच पार पडलेल्या लिलावामध्ये ध्वनिलहरी संपादन करताना, आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत कमी किमतीत सर्वोत्तम ध्वनिलहरी खरेदी करणं हा आमच्या हेतुपुरस्सर धोरणाचा एक भाग आहे. यामुळे आम्हाला नावीन्यपूर्ण गोष्टी करण्याची, तसंच देशात सर्वोत्तम अनुभव मिळण्याची मागणी कणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल”.

पुढे ते म्हणाले “कव्हरेज, वेग आणि लॅटेन्सीच्या बाबतीत आम्ही भारतातील सर्वोत्तम ५ जी अनभुव देण्यास सक्षम आहोत याची आम्हाला खात्री आहे. यामुळे आमच्या बी२सी आणि बी२बी ग्राहकांसाठी असणारे अनेक स्थापित प्रतिमान बदलण्यास यामुळे संधी मिळेल. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया व्हिजनसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध असून भारत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी करत राहू”.

ध्वनिलहरी मिळवण्यासाठी स्पर्धात्मक धोरण

कंपनीने लिलाव, M&A आणि व्यापाराद्वारे ध्वनिलहरी   मिळवण्यासाठी काळजीपूर्वक विचार करत धोरण तयार केले आहे. यामुळे एअरटेलला आपली सर्व उद्दिष्टे साध्य करण्यास मदत मिळत आहे. ज्यामध्ये, सर्वोत्कृष्ट ५ जी अनुभव, 100x क्षमता वाढवणे आणि कंपनीच्या महत्त्वाकांक्षी ESG उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा समावेश आहे.

सर्वोत्तम ५ जी कव्हरेजसाठी एअरटेलने नुकत्याच मिळवलेल्या ३.५ गिगाहट्र्झ आणि २६ गिगाहट्र्झ बॅण्डच्या प्रचंड क्षमतेसह, कमी आणि मध्यम बॅण्ड ध्वनिलहरींचा सर्वात मोठा पूल (SubGHz/1800/2100/2300 बँड) एकत्रित करण्यासाठी परिश्रमपूर्वक काम केले आहे.

५ जी आपल्या भविष्यावर कसा परिणाम करु शकतं

५ जी क्रांतीसोबत प्रगत आरोग्यव्यवस्था, प्रगत कारखाने, जोडली गेलेले पहिल्या फळीतील कर्मचारी आणि ऑप्टिमायज IoT, AI, ML, AR आणि VR तंत्रज्ञानाची अपेक्षा आहे. जवळपास शून्य लॅटेन्सीसह ५ जी तंत्रज्ञान चांगल्या गोष्टींसाठी कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय बदल करेल. प्रवासात स्मार्टफोनवर ऑनलाइन गेमिंगचाही एक चांगला अनुभव मिळेल. आपण अशा स्मार्ट शहरांचाही अंदाज लावू शकतो, जिथे AI नैसर्गिकरित्या वाहतुकीचा नकाशा बनवू शकेल आणि गर्दी कमी करण्यास मदतही करेल. कारण ५ जी एक स्मार्ट, तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आणि जोडलं गेलेलं भविष्य तयार करण्यास मदत करेल. पुढील काळात, ५ जी च्या सहाय्याने होणाऱ्या ऑटोमेशनमुळे सुरक्षा आणि ऊर्जा कार्यक्षमता देखील वाढेल.

एअरटेलचा संपूर्ण देशभरात ५ जी सेवा सुरु करण्याचा मानस असून, याची सुरुवात काही मोठ्या शहरांपासून होईल. महिनाअखेरीच्या आधीच एअरटेल ५ जी सेवा सुरु होईल असं कंपनीने सांगितलं आहे. ग्राहक तात्काळ ५ जी तंत्रत्रान आत्मसात करतील असा कंपनीला विश्वास आहे. याव्यतिरिक्त, एंटरप्राइझ मार्केटमध्ये एअरटेलचे वर्चस्व असल्याने इंडस्ट्रीयल वापराच्या प्रकरणांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होईल, ज्यामुळे B2B क्षेत्रातील एअरटेलचे वर्चस्व आणखी मजबूत होईल.

गेल्या काही वर्षांमध्य एअरटेलने ५ जी डोमेनमध्ये प्रथम श्रेणीची स्थापना केली आहे. २०१८ मध्ये ५ जी चाचणी करणारी ही पहिली दूरसंचार कंपनी ठरली होती. गतवर्षी एअरटेलने भारतात सर्वात पहिली ग्रामीण ५ जी चाचणी आयोजित केली होती, तसेच ७०० मेगाहट्र्झ बँडवर ५ जी क्षमतेची चाचणी घेणारीही पहिली कंपनी होती. BOSCH मधे कंपनीने खासगी एअरटेल ५ जी नेटवर्कचं अनावरण केलं आहे. या सर्व उपलब्धी गतवर्षीच्या ब्रँडच्या यशस्वी ५ जी क्लाउड गेमिंग प्रात्यक्षिकाच्या आणि २०२२ च्या सुरुवातीला आयोजित १७५* रिप्लेड कार्यक्रमात क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भारतातील पहिल्या ५ जी-सक्षम लाइव्ह होलोग्राम प्रदर्शनाच्या शीर्षस्थानी आहेत. त्यामुळे एकीकडे भारतीय आपल्या उपकरणांसाठी ५ जी ची वाट पाहत असताना, एअरटेलने आधीच एक वारसा तयार केला आहे, ज्यामुळे लाखो वापरकर्त्यांसाठी हा अनुभव घेण्याचा आणि इतिहास रचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याची आमच्यावरही जबाबदारी आहे.