आर्किटेक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सला भेटायचं, साहित्य निवडाचं, एकदम परफेक्ट अशी शेड निवडायची, त्यासाठीचे वेगवेगळे कोटेशन समजून घ्यायचे आणि त्यानंतर आर्थिक तरतुदीवर काम करायचं हे सगळं अनेकदा सामान्यांसाठी फारच वेळखाऊ आवाक्याबाहेरचं ठरतं.तुमची स्टाईल कोणतीही असली, तरी घराचं बाहेरचं संपूर्ण चित्र आणि घरामधल्या अनेक छोट्या-छोट्या गोष्टी या सारख्याच महत्त्वाच्या असतात.
आपण सगळेच आपल्या घराची खूप काळजी घेतो. आपलं घर स्वच्छ राहावं आणि अनेक वर्षांपर्यंत ते तसंच सुंदर दिसावं यासाठी आपण प्रयत्न करतो. पण तरीही काळाच्या ओघात बदल होतच असतात. ग्राहकांच्या घरांचं सौंदर्य टिकवून ठेवण्याच्या याच प्रवासात एशियन पेंटस त्यांची सोबत करतो. आपलं घर जपून ठेवण्यासाठी आणि त्याचं सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील असणाऱ्या भारतीयांसाठी एशियन पेंट्स कायमच भरवशाचा पर्याय राहिला आहे.
आपल्या घराच्या बाहेरच्या भिंती या घरातल्या आतल्या गोष्टींचं आणि व्यक्तींचं बाहेरून येणाऱ्या संकटांपासून संरक्षण करतात यात कोणतीही शंका असण्याचं कारण नाही. मग तो पाऊस असो, ऊन असो किंवा आणखीन कुठली बाब. बाहेरून मजबूत असणाऱ्या भिंतीच घरात होऊ शकणारे लीकेजेस, रंग उडणे, ओलसरपणा, बुरशी अशा गोष्टींपासून घराचं खऱ्या अर्थाने संरक्षण करू शकतात.
त्यामुळे घरांच्या बाहेरील भिंतींचं खराब हवामान, धूळ, प्रदूषक आणि अशा इतर अनेक गोष्टींपासून संरक्षण करण्यात ग्राहकांची मदत करण्यासाठी एशियन पेंट्सनं आणलाय (अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक) Apex Ultima Protek! ओलसरपणा, अळगी, तडे, रंग उडणे किंवा बुरशी अशा प्रकारांपासून भिंतींचं संरक्षण करण्यासाठी अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक हा एक दर्जेदार रंग आहे.
पाऊस, धूळ किंवा तीव्र उन्हातही अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक
आपल्या घराच्या बाह्य भिंतींचं सौंदर्य टिकवून ठेवतो. हा एक उत्तम दर्जाचा रंग आहे. यामध्ये लॅमिनेशन गार्ड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. शिवाय, पहिल्यांदाच कुठल्यातरी कंपनीनं अशा रंगासाठी १० वर्षं टॉपकोट आणि सहा वर्षं बेसकोटच्या वॉटरप्रूफिंगची वॉरंटी दिली आहे.
एशियन पेंट्सच्या अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक पेंटमधील लॅमिनेशन गार्ड्स टेक्नॉलॉजीमुळे कशा प्रकारे आपल्या घराच्या बाहेरच्या भिंतींचं उन, पाऊस आणि धुळीपासून संरक्षण होतं, हे दाखवण्यासाठी Ogilvy India साठी नावाजलेले दिग्दर्शक अभिनय देव यांनी एक भन्नाट आणि कल्पक जाहिरात तयार केली आहे.
या जाहिरातीमध्ये अभिनेता रणबीर कपूर दोन भूमिका साकारतो आहे. त्यातली एक जादूगाराची आहे तर दुसरी रंगकाम करणाऱ्या कंत्राटदाराची आहे. यातला जादूगार कोणतीही गोष्ट त्याच्या जादूने अदृश्य करू शकतो. पण एक लहान मूल घराच्या बाहेरच्या बाजूला असलेलं प्लास्टिक काढण्याचं आव्हान जादूगाराला देतो, तेव्हा मात्र जादूगाराची भूमिका साकारणारा रणबीर कपूर हे करू शकत नाही. पण त्याचवेळी रंगकाम करणारा कंत्राटदार रणबीर अॅपेक्स अल्टिमा प्रोटेकसह तिथे हजर होतो. या रंगाच्या सहाय्याने कंत्राटदार घराच्या बाहेरच्या भिंतीवर असणारं प्लास्टिक दूर करतो, घर लॅमिनेट करतो आणि येणाऱ्या-जाणाऱ्या बघ्यांची वाहवा देखील मिळवतो. यासोबतच एक संदेश देतो की अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक पाऊस, ऊन आणि धुळीपासून तुमच्या घराला सर्वोत्तम सुरक्षा पुरवू शकतो.
त्यामुळेच एशियन पेंट्सचा अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक कोणत्याही अतिरिक्त कामाशिवाय आपलं घर दीर्घ काळ नवीन दिसण्यासाठी मदत करतो. यासंदर्भात बोलताना Ogilvy India चे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक सांगतात, “एशियन पेंट्सचा अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक म्हणजेच लॅमिनेशनवाला एक्स्टेरियर पेंट. आमच्या नव्या अॅड कॅम्पेनमुळे या साधर्म्यावर शिक्कामोर्तबच झालं आहे. रणबीर कपूरनं दुहेरी भूमिका साकारलेली ही जाहिरात अॅपेक्स अल्टिमा प्रोटेकचं वेगळेपण तेवढ्याच वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडते. तुमचं घर सुरक्षित आणि नव्यासारखं ठेवण्यासाठी अॅपेक्स अल्टिमा प्रोटेक हाच उत्तम पर्याय ठरू शकतो, हे या जाहिरातीतून स्पष्ट होतंय.”