scorecardresearch

एशियन पेन्ट्स ट्रॅक्टर अँड एस स्पार्क एमल्शन…आता तुमच्या हौसेला नो लिमिट!

एशियन पेन्ट्सनं “शौक की नो लिमिट-बजेट में फिट” ट्रॅक्टर आणि एस स्पार्क एमल्शनचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

asian paints
एशियन पेन्ट्स ट्रॅक्टर अँड एस स्पार्क एमल्शन…आता तुमच्या हौसेला नो लिमिट!

आपल्या घराची सजावट करणं हे खरंतर आव्हानात्मकच काम असतं. मग ते घराच्या रचनेमधील दुरुस्ती असो किंवा मग प्रत्येक खोलीचे स्वत:चे असे गुणधर्म जतन करून ठेवणं असो. तुम्हाला नेमकं काय हवंय आणि तुम्ही नेमकं काय करताय हे समजून घेणं फार महत्त्वाचं असतं! असं असलं, तरी पेन्टिंग अर्थात तुमच्या घराला रंग देणं हे एक असं काम आहे, ज्यामुळे अगदी सहज एखाद्या कंटाळवाण्या खोलीचं रुपडं पालटलं जाऊ शकतं. घराचा रंग उठून दिसतो आणि जो नक्कीच घराच्या एकंदरीत लूकमध्ये वेगळेपणा आणणारा घटक असतो. यामध्ये कोणतीही शंका नाही की घराच्या भिंतींवर मारलेले रंगाचे हात, त्याच्या काळजीपूर्वक निवडलेल्या शेड्समुळे भिंतींचा उठावदारपणा आणखीन खुलून येतो.

घराच्या अगदी एखाद्या कोपऱ्याचीही डागडुजी किंवा सजावट करायची असेल, तरी त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागतं. तुमच्यापैकी बहुतेक जण हे असं कधीतरीच करता. पण त्यातही हे करताना तुम्ही तुमच्या इच्छांना अनेकदा मुरड घालता. त्यामुळेच आपल्या घरासाठी सर्वोत्कृष्ट रंग कोणता असेल, हे कोणत्याही घरमालकाला माहिती असणं आवश्यक असतं. बाजारात यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असतात. पण त्यातला योग्य पर्याय निवडण्याची पद्धत सोपी आहे. तुमच्या खिशाला मोठा झटका न बसू देता तुम्हाला हवा असणारा लुक घराला येण्यासाठी योग्य ब्रँडची निवड करणं ही ती पद्धत होय!

एशियन पेन्ट्स का?

देशभरातील लोकांसाठी एशियन पेन्ट्स हा एक विश्वासार्ह ब्रँड राहिला आहे. जेव्हा केव्हा आपण घराला रंग देण्याचं काम काढतो, तेव्हा बऱ्याचदा आपण आपल्या इच्छांना मुरड घालतो असाच बहुतेकांचा अनुभव असेल. पण एशियन पेन्ट्सला ग्राहकांच्या आर्थिक तडजोडींची पूर्ण कल्पना असून त्यासाठीच कंपनीनं “शौक की नो लिमिट-बजेट में फिट” ट्रॅक्टर आणि एस स्पार्क एमल्शनचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. डिस्टेम्परशी तुलना करता हा पेन्ट म्हणजे खऱ्या अर्थाने ‘व्हॅल्यू फॉर मनी’ आहे! हा एक स्वस्त दरातील पेन्ट असून तुमची प्रत्येक हौस तुमच्या बजेटमध्ये बसवण्याची क्षमता त्याच्यात आहे. या पेंटमुळे तुमच्या घराच्या आतल्या आणि बाहेरच्या भिंतींना जबरदस्त लूक मिळतो. यामुळे आपली हौस आणि आपले खर्च हातात हात घालूनच जातील याचा विश्वास घरमालकाच्या मनात निर्माण होतो.

एशियन पेन्ट्स ट्रॅक्टर अँड एस स्पार्क एमल्शनची वैशिष्ट्ये:

  • हा भिंतींना एक स्मूथ लूक देतो.
  • डिस्टेम्परच्या तुलनेत या रंगाच्या भिंती पाण्याने उत्तमरीत्या स्वच्छ करता येतात.
  • यामध्ये भिंतींना स्मूथ लूकसोबतच भिंतीच्या अधिक भागावर पसरण्याचीही क्षमता आहे.
  • यामध्ये तब्बल ८५० हून जास्त शेड्सचे पर्याय उपलब्ध आहेत.

हा पेन्ट स्वस्तातले सामान्य दर्जाचे डिस्टेम्पर आणि महागडे व उच्च दर्जाचे एमन्शन पेन्ट्स यातली तफावत भरून काढण्याचं काम करतो. त्यामुळेच या पेन्टच्या जाहिरातीमध्ये एक विनोदी जिंगल वापरण्यात आली आहे, जी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसते!

ही जाहिरात अशा घरमालकांवर लक्ष केंद्रीत करते, ज्यांना त्यांच्या बजेटमध्ये फिट बसणारा आणि तरीही चांगल्या दर्जाचा पेन्ट हवा असतो. असा पेन्ट, जो त्यांच्या इच्छाही पूर्ण करेल आणि पैसेही वाचवेल. या जाहिरातीत दाखवण्यात आलंय की कशा प्रकारे लोक घराला किंवा अगदी एखाद्या खोलीलाही रंग देताना त्यांच्या इच्छांना मुरड घालतात. त्यामुळेच एशियन पेन्ट्स ट्रॅक्टर अँड एस स्पार्क एमल्शन म्हणजे ग्राहकांसाठी व्हॅल्यू फॉर मनी आहे. हा पेन्ट घराला एक नवा लूक देतो. शिवाय, या रंगाचा दर्जाही उत्तम असतो. ग्राहकांच्या इच्छांशी कोणतीही तडजोड न करता हा पेन्ट त्यांचं घर सजवण्यासाठी त्यांची मदत करतो.

याव्यतिरिक्त अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या आणि तुमच्या घराच्या रंगाशी संबंधित कोणत्याही गोष्टींसाठी योग्य मार्गदर्शन मिळवा.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-05-2023 at 16:21 IST

संबंधित बातम्या