नियमितपणे प्रवास करणारी आलिया तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत बऱ्याच काळापासून वेटिंगवर असलेल्या तिच्या हिमाचल प्रदेशच्या ट्रिपची आतुरतेनं वाट पाहात होती. तिच्याबद्दलच बोलायचं झालं, तर ट्रिप (बऱ्यापैकी) ठरली होती. कामाचं नियोजन झालं होतं, सुट्या मंजूर झाल्या होत्या आणि त्यांच्या गँगनं ट्रिपसाठीची खरेदीही पूर्ण केली होती. पण जसं नेहमीच घडतं, गोष्टी जशा ठरवल्या असतात, तशा घडायच्याच नसतात! आलियाची तिच्या बिझनेस पार्टनरसोबत एक महत्त्वाची मीटिंग ऐनवेळी ठरली आणि त्यांच्या गँगला सगळे प्लॅन रद्द करावे लागले (कारण अर्थात गँगमधला प्रत्येक सदस्य ट्रिपसाठी येणं मस्ट होतं). परिणाम? विमानाची तिकिटं रद्द करावी लागली आणि आलिया ट्रिपसाठी दुसरी तारीख देखील देऊ शकली नाही. आता त्यांच्या गँगला ही चिंता होती की त्यांनी केलेल्या हॉटेल बुकिंग्जचे पैसे त्यांना परत मिळतील की नाही?

आलियासारखाच अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आलेला असेलच. पण तो खरंच तसा असायला हवाच का?

तुमची ट्रिप तुम्ही ठरवल्याप्रमाणेच आणि ठरवल्याइतकीच भन्नाट आणि निवांत असायला हवी. त्यासाठीच मेकमायट्रिपच्या सुपर फ्लेक्सिबल आणि स्मार्ट बुकिंगच्या पर्यायांमधून या सगळ्या गोष्टी विनासायास पार पडू शकतात. तेही ऐन वेळी कोणताही अडथळा किंवा अनियोजित गोष्टी घडल्या तरीही! एकदा का तुम्ही मेकमायट्रिपच्या स्पेशल फीचर्स आणि भन्नाट ऑफर्समधून बुकिंग केलं, की तुम्ही निवांत होऊन जाता. कारण तुम्हाला माहिती असतं की तुमच्या नियोजनाचं जे काही व्हायचंय, ते #JoHogaWowHoga असंच होईल याची मेकमायट्रिप काळजी घेईल. त्यामुळे आता अजिबात वेळ वाया न दवडता पाहुयात तुमच्यासाठीचे भन्नाट ट्रॅव्हल प्रॉडक्ट्स आणि ऑफर्स!

लॉक किया जाए?

हे मान्य करा. विमान तिकिटाच्या किमती वाढल्या की तुमच्या ट्रिपचं प्लॅनिंग बिघडतं. पण मुळात आपलं ट्रिपचं नियोजन तिकिटाच्या जास्त किमती किंवा कामामुळे का बदलायचं?

मेकमायट्रिपच्या फ्लाईट प्राईस लॉक सुविधेमुळे प्रवाशांना आता टेन्शन-फ्री प्रवासाची खात्रीच मिळाली आहे. प्राईस लॉक सुविधेमुळे तुम्ही कोणत्याही बुकिंगशी बांधील न होता देखील शेवटी तुम्हाला लागू शकेल अशी सीट बुक करू शकता. महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुम्ही काही किमान रक्कम अदा करून तिकिटाची रक्कम प्रवासाच्या दिवसाच्या एक, दोन किंवा अगदी सात दिवस आधी देखील लॉक करू शकता. ही किमान रक्कम देखील तिकिटाच्या किमतीमध्येच सामावून घेतली जाते. त्यामुळे तुम्ही आता तुमची विमानाची तिकिटं पुढच्या काही दिवसांत तिकिटदर वाढण्याच्या भितीशिवाय बिनधास्त बुक करू शकता. या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांचं तिकीट बुक करण्याच्या आधी इतर सर्व गोष्टींची खातरजमा करून घेण्यासाठी वेळ मिळतो.

मेकमायट्रिपची गॅरंटी आहे!

कुणालाही रांगेत थांबायला अर्थात वेटिंग लिस्टमध्ये राहायला आवडत नाही. तेही तेव्हा, जेव्हा तुमचा संपूर्ण ट्रिपचा प्लॅन हा तिकीट कन्फर्म होण्यावर अवलंबून असतो आणि शेवटी ते कन्फर्म न होण्याचीच शक्यता जास्त असते! पण मेकमायट्रिपच्या ट्रिप गॅरंटी सुविधेमुळे तुमचं वेटिंग लिस्ट बुकिंग जरी कन्फर्म झालं नाही, तरी ते अजिबात वाया जाणार नाही. सध्याच्या प्रवासावरील निर्बंधांच्या काळात आणि अनिश्चित वातावरणात या सुविधेमुळे तुम्हाला प्रवास नियोजनात एक प्रकारचं स्थैर्य मिळतं. शिवाय, कोणत्याही अनपेक्षित अडचणींपासून देखील तुमचं संरक्षण होतं. जर रेल्वेचं तिकीट शेवटपर्यंत कन्फर्म होऊ शकलं नाही, तर या सुविधेमुळे तुम्हाला शेवटच्या क्षणी प्रवासासाठीचे विमान, कॅब किंवा बस असे इतर मार्ग आणि आर्थिक पर्याय देखील उपलब्ध होतात. या पर्यायाचा वापर करून तुमच्या कन्फर्म न होऊ शकलेल्या तिकिटावर तिप्पट परतावा मिळू शकेल. शिवाय, त्यानंतर विमान, कॅब, बस किंवा दुसऱ्या कुठल्या ट्रेनचं पुढच्या तारखेचं तिकीट देखील तुम्हाला बुक करता येऊ शकेल. ते म्हणतात ना, “जेव्हा एक दरवाजा बंद होतो, तेव्हा दुसरे अनेक दरवाजे उघडले जातात”!

या ट्रिपचे तुम्ही बॉस आहात!

समजा तुम्ही नियोजित ट्रिपचा आनंद लुटून घरी परतले आहाता आणि आराम करत आहात. पण जर तुम्हाला या सर्व प्रवासाची बिलं कंपनीतून ठरलेल्या भत्त्यासाठी हवी असतील तर? शिवाय जर तुम्ही कदाचित ऐनवेळी तिकीटं रद्द केली असतील, तर परताव्याविषयी माहिती घेण्यासाठी तुम्ही कुठे जाल?

मेकमायट्रिपच्या मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर असलेल्या माय ट्रिप या पर्यायामध्ये तुम्हाला तुमच्या आगामी आणि याआधी झालेल्या सर्व ट्रिपविषयीची माहिती मिळू शकेल. चेक-इन, चेक-आऊटच्या माहितीपासून थेट रिफंडसाठीच्या विनंतीबाबत आणि बिलांविषयी देखील सर्व माहिती इथे मिळू शकेल. हा सुटसुटीत आणि वापरण्यासाठी सोपा पर्याय तुम्हाला एकाच वेळी तुमच्या सर्व गोष्टींची माहिती देण्यासाठी सक्षम आहे.

फक्त आमच्या मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवर लॉग-इन करा, माय ट्रिप्सवर क्लिक करा आणि सर्व माहिती तुमच्यासाठी तयार आहे! हे इतकं सोपं आहे!

उज्ज्वल काळाच्या दिशेने…

कोणताही उत्सवाचा काळ हा आपल्यासोबत आनंद, एकोपा आणि समृद्धी घेऊन येतो. फुरसतीच्या वेळेत प्रवास करण्याचं प्रमाण वाढत असताना ग्राहकांना त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या वेळाचा जास्तीत जास्त सदुपयोग होणं अपेक्षित असतं. आणि मेकमायट्रिपच्या खात्रीशीर ट्रॅव्हल ऑफर्सच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या अपेक्षेपेक्षाही खूप काही जास्त मिळतं! मग इथे फक्त जास्त पर्यायच उपलब्ध नाहीत, कारण आम्हाला माहिती आहे की तुम्हाला ऐन वेळी बदलणाऱ्या नियोजनासाठी गोष्टींमध्ये योग्य तो लवचिकपणा देखील हवा असतो. तुम्ही अगदी शेवटच्या क्षणी जरी तुमची ट्रिप रद्द केली, तरी आमचे १०० टक्के परताव्याचे पर्याय नेहमीच उपलब्ध असतात.

तर मग तुम्ही पुढची ट्रिप कधी प्लॅन करताय? एकूण ५० हजारांहून जास्त पर्यायांसोबत मेकमायट्रिप तुम्हाला खरोखरच सुखद आश्चर्याचे धक्के द्यायला तयार आहे!