ई-कॉमर्समुळे देशभरातील लाखो भारतीयांना आशेचा किरण दिसू लागला आहे. मग ऑनलाईन व्यवसाय क्षेत्रात यश मिळवणाऱ्या सामान्य भारतीयांपासून ते अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण ई-कॉमर्समुळे रोजगार मिळणाऱ्या असंख्य लोकांपर्यंत सर्वांचा यात समावेश आहे. करोनाच्या साथीमुळे फटका बसलेल्या अनेक क्षेत्रांना ई-कॉमर्सनं मदतीचा हात दिला आहे. फ्लिपकार्टनं देखील ही बाजारपेठ अजून वाढवतानाच विक्रेत्यांवर सकारात्मक परिणाम घडवून आणणे, रोजगार निर्माण करणे, छोट्या शहरांपर्यंत पोहोचणे आणि या व्यवस्थेमध्ये अधिकाधिक विकास घडवून आणण्याचा निर्धार केला आहे.

देशभरातील छोट्या आणि मध्यम विक्रेत्यांचं सबलीकरण करण्यासाठी फ्लिपकार्ट सातत्याने बांधील राहिलं आहे. गेल्या अनेक वर्षांत फ्लिपकार्टनं असंख्य लोकांना त्यांची कमाई वाढवण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. फ्लिपकार्टमुळे छोट्या उद्योगांना देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचता येतं, इ-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतो. यातून त्यांना देशभरात आपला वावर निर्माण करतानाच त्यांच्या आयुष्यात सुधार घडवून आणण्याची संधी मिळते. स्थानिक समाजाचं हित साधण्यासाठी या सर्व गोष्टींची मोलाची मदत होते.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

या संधीचं सोनं करून प्रगतीची मोठी झेप घेणाऱ्या अशाच काही व्यक्तिमत्वांची ही यशोगाथा!

नागपूरमधील या विक्रेत्याची चिकाटी आणि कठोर परिश्रम

केशव जेठानंद खुशलानी हे नागपूरमधील एक ४८ वर्षीय व्यावसायिक आहेत. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून आयुष्यातील अनेक संकटांवर मात करत त्यांनी इलेक्ट्रॉनिक उत्पादनं ऑनलाईन विक्री करून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. ऑनलाईन रिटेल व्यवसायामध्ये यशस्वी झालेल्या इतर उद्योजकांच्या यशापासून प्रेरणा घेऊन त्यांनी त्यांचा मुलगा राहुलसोबत २०१४मध्ये त्यांचा ऑनलाईन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी अवध्या २ लाख कुपयांची गुंतवणूक केली होती. अवघ्या वर्षभरातच फ्लिपकार्टवर त्यांच्या व्यवसायाची चांगलीच भरभराट झाली. २०१५मध्ये त्यांची वर्षभराची उलाढाल तब्बल ३.४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर आता त्यांना दिवसाला तब्बल २०० ते ३०० ऑनलाईन ऑर्डर मिळत असून त्यांच्या उलाढालीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

केशव खुशलानी यांचा असा विश्वास आहे की ऑनलाईन व्यवसायामुळे त्यांना व्यवसाय अशा उंचीवर घेऊन जाता आला, ज्याची त्यांनी कल्पना देखील केली नव्हती. त्यांना देशाच्या सर्व भागातून उत्पादनांसाठी ऑनलाईन ऑर्डर येत आहेत. “अकाऊंट मॅनेजर्सकडून मिळणारं मार्गदर्शन आणि मदत, गोदामाची उपलब्धता आणि देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग या फ्लिपकार्टकडून मला मिळणाऱ्या सुविधांमुळे माझी विक्री वाढली असून व्यवसाय देखील वाढू लागला आहे. प्रत्येक महिन्याला मी सातत्याने नफा कमावत आहे. दरवर्षी माझी विक्री दुप्पट करण्याची माझी इच्छा आहे”, असं केशव म्हणतात.

ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता केशव यांच्याकडे ९ जणांची टीम आहे. अशा संधींमुळे या संपूर्ण व्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांच्या आयुष्यावर कसा सकारात्मक परिणाम होतो, याचं हे एक उत्तम उदाहरण!

किराणा कनेक्ट – स्थानिक पातळीपर्यंतची पोहोच

२०१९मध्ये फ्लिपकार्टनं किराणा पार्टनर उपक्रम सुरू केला. किराणा आणि छोट्या उद्योगांना ई-कॉमर्स व्यवस्थेमध्ये सामावून घेणे आणि त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू होता. यासोबतच फ्लिपकार्टला देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकांपर्यंत आपली सेवा पोहोचवता येणार होती. गेल्या वर्षभरात फ्लिपकार्टसोबत अशा प्रकारे जोडल्या गेलेल्या या उद्योजकांच्या मासिक उत्पन्नात जवळपास ३० टक्के एवढी घसघशीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

महाराष्ट्रातील १८ वर्षांचा बीएससी विद्यार्थी आशिक खान हा गेल्या ५ महिन्यांपासून फ्लिपकार्टच्या किराणा पार्टनर उपक्रमाशी जोडला गेला आहे. आशिक एका चांगल्या नोकरीच्या शोधात होता, जी त्याला त्याच्या वेळेनुसार करता येऊ शकणार होती. अशा वेळी त्याच्या एका मित्राने त्याला फ्लिपकार्टच्या किराणा पार्टनर उपक्रमाबद्दल माहिती दिली. या उपक्रमाविषयी जाणून घेतल्यानंतर आशिकला आनंद झाला. कारण या उपक्रमामुळे त्याला त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देता येणार होतं. घरात देखील लक्ष देता येणार होतं आणि त्याच वेळी त्याला चांगलं उत्पन्न देखील मिळणार होतं.

सुरुवातीला एका हॉटेलमध्ये काम करणारे त्याचे वडील हेच घरात फक्त पैसे कमावत होते. पण आता आपलं बीएससीचं शिक्षण घेतानाच आशिक महिन्याला जवळपास २० हजार रुपयांची कमाई करून त्याच्या घरासाठी आर्थिक हातभार लावतो आहे.

फ्लिपकार्टसोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगताना आशिक म्हणतो, “हे काम शिकण्यासाठी फार सोपं होतं. फ्लिपकार्टच्या टीमकडून मला मिळालेल्या प्रशिक्षणामुळे हे काम समजून घेणं माझ्यासाठी सोपं झालं. यामध्ये ग्राहकांशी कसं बोलावं, त्यांच्या समस्यांची दखल कशी घ्यावी आणि किराणी इंटरफेस अॅपचा वापर कसा करावा अशा गोष्टींचा या प्रशिक्षणात समावेश होता. मला फ्लिपकार्टसोबत काम करण्याचा फार छान अनुभव मिळाला आहे. ज्या कुणाला त्यांच्या वेळेनुसार काम करताना अतिरिक्त नफा कमवायचा आहे, अशा लोकांना मी नक्कीच हे करण्याचा सल्ला देईन. मी यातून चांगला नफा कमावू लागलो आहे. विशेषत: सेल अर्थात ऑफरच्या काळात. मी फ्लिपकार्टच्या द बिग बिलियन डे सेलविषयी आणि या कालावधीत होणाऱ्या डिलीव्हरीजविषयी खूप ऐकलं आहे. अशा काळात मोठा नफा कमावण्याची मला आशा आहे.”

आशिकला असा विश्वास वाटतो की तो त्याच्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणतानाच फ्लिपकार्टच्या किराणा उपक्रमातून अधिकाधिक नफा कमावण्यात यशस्वी होत राहील.

किराणा हे फ्लिपकार्ट समूहाच्या पर्यायी डिलीव्हरी मॉडेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यातून मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यामुळे किराणा पार्टनर्सला फायदा झाला आहे. त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार कमी करण्यासोबतच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसा वाचवणं, कर्ज फेडणं आणि इतर गरजा पूर्ण करणं शक्य झालं आहे!