ई-कॉमर्सच्या जन्मामुळे एकूणच पारंपरिक भारतीय बाजारपेठांच्या व्यवस्थेमध्ये मूलभूत बदल दिसून येत आहे. देशभरातील नवउद्योजकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी फ्लिपकार्ट मदतीचा हात देत आहे. मग ते पारंपरिक व्यवसायाकडून ऑनलाईन व्यवसायाकडे जाणारे उद्योजक असोत किंवा करिअर आणि कौटुंबिक जबाबदारीमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवमाता असोत. ई-कॉमर्समुळे यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या नवउद्योजकांना देखील अनेक गोष्टी सोप्या होऊन जातात. त्यांनी स्वप्नातही पाहिलं नसेल, असं यश त्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्लिपकार्ट इच्छुकांना एक सहज-सोपी नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देते. यामुळे त्यांना अगदी अल्पावधीत त्यांचा ऑनलाईन व्यवसाय सुरू करता येतो.

फ्लिपकार्टनं जवळपास ४ लाख २० हजार उद्योजकांना त्यांची स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी बळ दिलं आहे. मग ते पेहेरावाची उत्पादनं विकणारे उद्योजक असोत किंवा मग हस्तकलेच्या वस्तू विकणारे. फ्लिपकार्टनं सामाजिक आणि आर्थिक विकासासोबतच गृहिणींना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतानाच त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हातभार लावला आहे.

प्राची पटवर्धन यांनी पहिल्यांदाच दागिन्यांच्या व्यवसायात पाऊल ठेवलं आणि आता त्या पुण्यात त्यांचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालवत आहेत.

प्राची पटवर्धन या फ्लिपकार्टवरील एक विक्रेत्या आहेत. त्यांनी आयटी क्षेत्रामध्ये जवळपास १० वर्ष नोकरी केली. मात्र, त्यांच्या लक्षात आलं की त्यांना नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात समतोल साधणं कठीण जात आहे. त्यांनी आधी पर्यायी रोजगाराचा शोध घेतला. नंतर त्यांच्या पतीच्या सल्ल्यानुसार त्या फ्लिपकार्टवर आर्टिफिशियल दागिन्यांची उत्पादने विकू लागल्या. या व्यवसायात सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्राची पटवर्धन यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पहिल्यांदा त्यांना ही गोष्ट लक्षात आली की आर्टिफिशियल ज्वेलरी विकणारे विक्रेते किंमतीपुढे दर्जाला महत्त्व देत नसून कमी किंमतीतील उत्पादनांसाठी दर्जा देखील कमी करत आहेत. दुसरी बाब म्हणजे त्यांना असा व्यवसाय उभा करायचा होता, जो दीर्घकाळ चालू शकेल. प्राची पटवर्धन यांनी मग चांगल्या दर्जाची उत्पादनं काहीशा जास्त दरामध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्यच असल्याचं पुढे सिद्ध झालं. त्यांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाला. फ्लिपकार्टवर उत्पादनं विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यामुळे अल्पावधीतच त्यांचा व्यवसाय राष्ट्रीय स्तरावरच्या ग्राहकांपर्यंत पोहोचला.

प्राची पटवर्धन त्यांच्या व्यवसायातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगतात, “मला माझी उत्पादनं विकायची होती. यासाठी मला अनेक पुरवठादारांच्या गाठीभेटी घ्याव्या लागल्या. चांगल्या दर्जाची उत्पादनं तयार करण्याची त्यांची क्षमता तपासावी लागली. हे प्रचंड कंटाळवाणं आणि वेळखाऊ होतं. ते सगळं झाल्यानंतर माझ्या उत्पादनांची छायाचित्र काढणं प्रचंड अवघड काम होतं. कारण त्यासाठी एखाद्या छायाचित्रकाराला काम देण्याइतपत आर्थिक तजवीज माझ्याजवळ नव्हती. पण तरीही फ्लिपकार्टच्या टीमकडून वेळोवेळी मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे माझ्यासाठी ही बाब फारच सोपी झाली.” प्राची पटवर्धन यांच्यामते फ्लिपकार्टवर आपलं उत्पादन विकण्याचा फायदा म्हणजे एक तर तुमचा व्यवसाय नफ्यामध्ये येतो, पण महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पादन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. जसजसा त्यांचा व्यवसाय उत्तरोत्तर प्रगती करत गेला, त्यांनी फ्लिपकार्टवर त्यांचा स्वत:चा ब्रँड गर्ल्जफॅशन रजिस्टर केला. अगदी कानातील रिंगा, बांगड्या, नेकलेसपासून पैंजण आणि नाकातील नथणीपर्यंत सर्व प्रकारचे दागिने या ब्रँडकडून विकले जातात. डिजिटल तंत्रज्ञानाचं प्राथमिक ज्ञान असताना देखील प्राची पटवर्धन यांनी त्यांच्या व्यवसायात केलेली प्रगती उत्तम अशीच म्हणता येईल. तसेच, आता त्यांच्यासमोर कोणती मोठी आव्हानं देखील नाहीत.

एक नवउद्योजक असल्यामुळे त्यांना ग्राहकांच्या आवडी-निवडी, त्यांच्या भावना आणि उत्पादनांमध्ये अधिकाधिक नवनवे प्रकार आणण्याची गरज ओळखणं सोपं झालं. याशिवाय यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक चांगल्या डिझाईन्स तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. वैयक्तिक आयुष्यात देखील प्राची पटवर्धन यांच्यासाठी मोठा बदल घडून आला. आता प्राची पटवर्धन यांना त्यांचा यशस्वी व्यवसाय सांभाळण्यासोबतच एक आई म्हणून त्यांच्या असलेल्या जबाबदाऱ्या देखील व्यवस्थित पार पाडता येत आहेत. एकंदरीत फ्लिपकार्टनं त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या अधिकाधिक जवळ राहाण्याची संधी मिळाली.

डिलीव्हरीच्या माध्यमातून किराणासाठी अतिरिक्त कमाई

५० वर्षीय राजू हरिभाऊ तितरमारे हे महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत राहातात. त्य्ंच्या पत्नी मेडिकलच्या व्यवसायात कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतात. राजू स्वत: त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने एक केटरिंगचा व्यवसाय चालवतात.

राजू तितमारे

राजू २० वर्षांचे असल्यापासून लॉजिस्टिक्सच्या व्यवसायात काम करत असून पार्सल पोहोचवतात. ते २०१९मध्ये फ्लिपकार्टचे लॉजिस्टिक्स पार्टनर झाले आणि २०२०मध्ये फ्लिपकार्टच्या किराणा उपक्रमात ते सहभागी झाले. आता दिवसाला ५० पार्सल पोहोचवून महिन्याला राजू जवळपास २० हजार रुपये कमावतात. किराणा उपक्रमातून मिळणाऱ्या या अतिरिक्त पैशामुळे राजू यांना कुटुंबाकडे अधिक लक्ष देता आलं. विशेषत: करोना साथीच्या काळात राजू यांच्या केटरिंगच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. या काळात किराणा उपक्रमातून मिळालेल्या कमाईची त्यांना मोठी मदत झाली.

“गेल्या ३० वर्षांपासून मी लॉजिस्टिक्सच्या व्यवसायात काम करतोय. फ्लिपकार्टच्या किराणा उपक्रमामुळे मला माझ्या जीवनावश्यक गोष्टींकडे लक्ष देता आलं. या उपक्रमामुळे मला माझ्या मुलांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेता आला. शिवाय मला माझं स्वत:चं घर देखील बांधता आलं”, असं राजू सांगतात.

देशभरात आणि राज्यामध्ये फ्लिपकार्टच्या किराणा उपक्रमामुळे मोठा आधार मिळालेल्या या काही मोजक्या यशोगाथा आहेत. डिलीव्हरीच्या माध्यमातून फ्लिपकार्टच्या किराणा पार्टनर्सला त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून फ्लिपकार्टकडून वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसाय पद्धती आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जातं. यासाठी किराणा पार्टनर्सला फ्लिपकार्टकडून योग्य असं प्रशिक्षण देखील दिलं जातं. यामध्ये डिलीव्हरीशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी, मोबाईल अॅप कसं काम करतं आणि ग्राहकांना चांगली सेवा कशी पुरवावी अशा गोष्टींचा समावेश आहे.

फ्लिपकार्टसोबत २०२१मध्ये जवळपास १ लाख किराणा पार्टनर जोडले गेले. किराणा पार्टनर्सला डिजिटल माध्यमातून उत्पन्न वाढवण्याच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याशी फ्लिपकार्टची असलेली वचनबद्धताच यातून स्पष्ट होते. गेल्या वर्षी करोना विषाणूच्या गंभीर परिणामांमुळे बसणाऱ्या धक्क्यापासून सावरण्यासाठी फ्लिपकार्टनं आपल्या किराणा डिलीव्हरी पार्टनर्सला विम्याचं संरक्षण देखील दिलं होतं.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart kirana programme helping partners for job and income pmw
First published on: 29-06-2022 at 14:26 IST