फ्लिपकार्टच्या विविध उपक्रमांमुळे सामाजिक आणि आर्थिक विकासात पडतेय मोलाची भर!

अनेक प्रकारचे फायदे छोट्या आणि मध्यम उद्योजकांना आणि कारागिरांना मिळावेत, यासाठी फ्लिपकार्टनं अनेक प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत.

flipkart samarth initiative
फ्लिपकार्टच्या उपक्रमांचा नवउद्योजकांना फायदा!

ई-कॉमर्समुळे टू किंवा थ्री टियर शहरांमधली सामाजिक आणि आर्थिक दरी भरून काढण्यासाठी मोलाची मदत होतेय. भाषेची कोणतीही अडचण न येता ई-कॉमर्सच्या मदतीने ग्राहकांपर्यंत चांगल्या दर्जाची उत्पादनं पोहोचत आहेत.

ई-कॉमर्सच्या व्यवहारांमधली सुलभता आणि विकासाची सर्वोत्तम शक्यता पाहाता अनेक मध्यम आणि लघु उद्योगक, तसेच छोटे नवउद्योजक व्यवसाय करण्यासाठीचं पहिलं साधन म्हणून ई-कॉमर्सकडे वळत आहेत. भारतातील पूर्णपणे स्वदेशी ई-कॉमर्स बाजारपेठ असलेलं फ्लिपकार्ट हे अशा लघु आणि मध्यम उद्योगांना पूर्ण सहकार्य करतं. यामध्ये दैनंदिन व्यवहारांमधील कौशल्य, ग्राहकांविषयीचं सखोल आकलन आणि त्यांचा ऑनलाईन व्यवसाय अखंडपणे सुरू राहावा, यासाठीचं अविरत समुपदेश अशा गोष्टींचा यात समावेश आहे.

हे सर्व फायदे छोट्या आणि मध्यम उद्योजकांना आणि कारागिरांना मिळावेत, यासाठी फ्लिपकार्टनं अनेक प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. समाजातील अविकसित घटकांचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आलेला फ्लिपकार्ट समर्थ हा असाच एक उपक्रम. आपलं कौशल्य वापरून आयुष्यात बदल घडवण्याची आणि स्वावलंबी बनण्याची उत्तम संधी योग्य त्या व्यक्तींना मिळावी यासाठी फ्लिपकार्ट कायमच प्रयत्नशील असतं.

भारतातील कारागीर, विणकर, सूक्ष्म उद्योगधंद्यांना ई-कॉमर्सचं व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समर्थ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. यातून या उद्योगधंद्यांना भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं. या कुशल कारागिरांना त्यांचं कसब दाखवण्याचं आणि विकण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच फ्लिपकार्ट समर्थ या उपक्रमात कॅटलॉग करण्यासाठीची मदत, प्रशिक्षण सत्र, जाहिरातीचे क्रेडिट्स अशा इतरही अनेक बाबी उपलब्ध करून दिल्या जातात.

फ्लिपकार्टच्या या अनोख्या उपक्रमामुळे अशा कौशल्याधारीत कारागिरांच्या समूहाचं जीवनमान मोठ्या प्रमाणावर स्थिर पद्धतीने सुधारलं आहे. व्यापक आणि सूक्ष्म स्तरावर पाहाता एकूणच सामाजिक आणि आर्थिक विकास साध्य करण्याचं काम देखील य उपक्रमाच्या माध्यमातून शक्य होऊ शकलं आहे. यातून याआधी कधीही दिसून न आलेलं सामाजिक हित साध्य होत असल्यचं दिसून येत आहे.

एक पूर्णपणे भारतीय असलेलं ई-कॉमर्स व्यसपीठ म्हणून फ्लिपकार्टनं सातत्याने समाजातील मागास घटकांन बळ देण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केले आहेत. गेल्या अनेक वर्षांत फ्लिपकार्टनं असंख्य लोकांना त्यांचं अर्थार्जन वाढवण्यासोबतच त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठीची संधी उपलब्ध करून दिली आहे. फ्लिपकार्टच्या उपक्रमांमधून साध्य होणारा हा सामाजिक हेतू स्थानिक आणि व्यापक अर्थाने राज्य पातळीवर अधिक चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

फ्लिपकार्टमुळे ज्वेलरी व्यवसायानं घेतली मोठी झेप!

प्राची पटवर्धन या आज एक यशस्वी आणि आनंदी व्यक्ती आहेत. ही परिस्थिती कायम अशी नव्हती. त्यांनी आयटी क्षेत्रातील प्रचंड तणावपूर्ण आणि कामाचं ओझं असलेली नोकरी केली. त्यांचं प्रोफेशनल लाईफ इतकं वाईट झालं होतं की त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्याचीही इच्छा होत नव्हती. त्यांच्या पतीकडून मिळालेला पाठिंबा आणि प्रोत्साहनाच्या जोरावर त्यांनी आयटी क्षेत्रातील त्यांची नोकरी सोडली आणि स्वत:चा असा आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला.

व्यवसाय करणं कठीण काम असल्याचं कळत असल्यामुळे सुरूवातीला नवउज्योजिका होण्याची इच्छा असून देखील त्या तसा निर्णय घेण्यासाठी कचरत होत्या. पण एकदा त्यांनी या क्षेत्रात उडी घेतल्यानंतर त्यांना जाणवलं की त्या आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय सुरू करू शकतात. हळूहळू त्यांना ग्राहकांच्या आवडी-निवडी आणि पद्धतींचीही माहिती होऊ लागली. “पण मला हेही माहिती होतं की व्यवसायासाठी एवढंच पुरेसं नाही. त्यामुळे मग मी मार्केट रीसर्च करण्यात काही वेळ घालवला”, असं त्या सांगतात.

सुरुवातीला त्यांनी नोंदणी आवश्यक नसलेल्या काही छोट्या ई-कॉमर्स व्यासपीठांवर प्राची यांनी गर्ल्सफॅशन या स्वत:च्या ब्रँडच्या वस्तू विकायला सुरुवात केली. पण नंतर त्यांना जाणीव झाली की फ्लिपकार्टसारख्या नावाजलेल्या व्यासपीठावर त्यांनी वस्तूंची विक्री करायला हवी. “फ्लिपकार्टची ग्राहकक्षमता प्रचंड आहे. फ्लिपकार्टसाठीची नोंदणी प्रक्रिया अगदी सुलभ होती. फ्लिपकार्ट टीमच्या मार्गदर्शनाखाली मी कॅटलॉग लिस्टिंगचं आव्हानही पार केलं. तो अनुभव खरंच खूप छान होता”, असं त्या सांगतात.

कानातल्या रिंगा, बांगड्या, नेकलेस, अँकलेट्स, नोज पिन अशा सर्व गोष्टी गर्ल्सफॅशन ब्रँडकडून विकल्या जातात. आज त्यांच्या एकूण व्यवसायापैकी ८५ टक्के व्यवसाय हा ऑनलाईन माध्यमातून होतो, ज्यापैकी ७५ टक्के व्यवसाय हा एकट्या फ्लिपकार्टवरून येतो. त्या म्हणतात, “फ्लिपकार्टवर ऑनलाईन वस्तूंची विक्री केल्यामुळे तुम्ही अवघ्या काही वेळातच थेट राष्ट्रीय विक्रेते होता. नोंदणीपासून ते तांत्रिक अडचणी सोडवण्यापर्यंत फ्लिपकार्ट एखाद्या पार्टनरसारखं माझ्यासोबत होतं.”

२०१४-१५ हे साल प्राची यांच्यासाठी शिकण्याचं आणि प्रयोग करण्याचं होतं. गर्ल्सफॅशननं २०१७ सालच्या बिग बिलियन डे सेलदरम्यान खरी झेप घेतली. “यामध्ये ग्राहकांच्या प्रतिक्रियांचा मोठा वाटा होता. त्यातूनच पुढची व्यवसाय वृद्धी व्हायला मदत झाली. त्यामुळे मला ग्राहकांची आवड आणि नावड याविषयी समजू शकलं. यामुळे माझ्या उत्पादनांमध्ये वैविध्य आणणं, अधिक चांगल्या डिझाईन्स तयार करणं आणि दर्जाशी कधीच तडजोड होऊ न देणं या गोष्टी मला शक्य झाल्या”, असं त्या सांगतात.

गर्ल्सफॅशन हा आता एकाच व्यक्तीच्या व्यवसायावरून तीन सदस्यांच्या टीमपर्यंत वाढला आहे. “आम्ही अजूनही खूप छोटी टीम आहोत. आमची वार्षिक उलाढाल १० लाखांची आहे. पण आम्ही सातत्याने दर वर्षाला २५ टक्के व्यवसाय वृद्धी करत आहोत”, असंही त्या अभिमानानं सांगतात.

एज्युकेशनल रिसोर्स कंपनीचा व्यवसाय वाढवण्यास हातभार

नवउद्योजक अतुल बेंगेरी यांनी दोन वर्षांपूर्वी अक्युमेनची सुरुवात केली होती. ही कंपनी शैक्षणिक साहित्याचं डिझाईन ठरवते. यामध्ये पुस्तकांचाही समावेश आहे. ही पुस्तकं रचनात्मक विचार करण्याची क्षमता, शिकणे आणि त्याची अंमलबजावणी करणे यावर आधारित असतात. सीबीएसई, आयसीएसईसारख्या देशभरातील शिक्षण मंडळांच्या धर्तीवरच या पुस्तकांची मांडणी केली जाते.

अक्युमेन सध्या हायब्रिड बिझनेस पद्धतीवर काम करते. यामध्ये बीटूबी ऑफलाईन बिझनेस आणि बीटूसी ऑनलाईन बिझनेस मॉडेलचा समावेश आहे. एकीकडे ते शिक्षम क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, शाळा, शिक्ष यांच्यासाठी त्यांच्या उत्पादनांची विक्री करतात, तर दुसरीकडे ते त्यांचा मार्केट बेस वाढवण्यासाठी फ्लिपकार्टवरून ते थेट खुल्या बाजारात ग्राहकांना त्यांची उत्पादने विकतात. टियर थ्री आणि फोर या श्रेणीतील शहरांमधल्या पालकांना डिजिटल माध्यमं उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी हे पालक पुस्तकांवरच अवलंबून असतात. त्यांच्यासाठी अक्युमेनचे दर हे सहज परवडतील असे असतात.

आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यासाठी अक्युमेननं फ्लिपकार्टची मदत घेतली. सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर फ्लिपकार्टनं ऑनलाईन पुस्तकांची विक्री सुरू केली. भारतात ई-कॉमर्सचा विस्तार आणि विकास होण्यात ही बाब महत्त्वाची ठरली. बेंगेरी म्हणतात, “आमच्यासाठी फ्लिपकार्ट ही अगदी स्वाभाविक निवड होती. कल्पनेवर आधारित पुस्तकं अर्थात कन्सेप्च्युअल बुक्स ही एक नवीन कल्पना होती. लोकांपर्यंत ही कल्पना पोहोचवण्यासाठी अक्युमेनला फ्लिपकार्टची मोठी मदत झाली. यामुळे ही कल्पना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचली आणि लोकांचा त्यात रस वाढला. सुरुवातीला दिवसाला २ ते ३ ऑर्डर्स यायच्या, त्या अवघ्या तीन महिन्यांमध्ये दिवसाला १० ऑर्डर्सपर्यंत वाढल्या”. २०१८मध्ये अक्युमेननं फ्लिपकार्टवर त्यांच्या उत्पादनांची विक्री करायला सुरुवात केली होती. तेव्हा ७ उत्पादनांपासून सुरुवात केलेल्या अक्युमनच्या यादीत आता ३०हून जास्त उत्पादनं आहेत.

फ्लिपकार्टनं अक्युमेन कंपनीला त्यांच्या अनेक वेबिनार्स आणि ग्राहक जागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेतलं. यातून योग्य संदेश किती फायदेशीर ठरू शकतो, हेच दिसून आलं.

ही अक्युमेनला व्यवसायासाठी फ्लिपकार्टकडून एक अतिरिक्त अशी मदतच होती. अतुल सांगतात, “फ्लिपकार्टकडून घेतल्या जाणाऱ्या अनेक वेबिनार्स आणि ग्राहक जागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली. यामुळे भवितव्याविषयी अधिक आत्मविश्वास आमच्यात निर्माण झाला. विशेषत: योग्य प्रकारचे संदेश पाठवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कसा करून घेता येईल याविषयीचं प्रशिक्षण विशेष उपयोगी ठरलं”.

आज अक्युमेन फ्लिपकार्टवर आपला व्यवसाय सातत्याने वाढवत आहे. बंगेरी म्हणतात, “एकीकडे आम्ही कन्सेप्च्युअल पुस्तकांच्या आमच्या मूळ व्यवसायाच्या वृद्धीसाठी प्रयत्न करत असताना डिजिटल विश्वात आमचा प्रवेश आणि प्रवास याविषयी देखील आम्ही प्रचंड उत्साही आहोत. उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने पाहाण्याची हीच वेळ आहे”!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Flipkart samartha initiative to help msme small businesses for social economic growth pmw

ताज्या बातम्या