Garudavega (NexGen Logistics ची कंपनी) ने YourDesiCart हे ऑनलाइन शॉपिंग आणि पार्सल सेवा प्लॅटफॉर्म विकत घेतले आहे. यामुळे गरुडवेगा (Garudavega) आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्समध्ये अधिक मजबूत होईल आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि मध्यपूर्व भागात सेवा वाढवेल.
२०२० मध्ये सुरू झालेल्या YourDesiCart ने परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी उपयुक्त सेवा दिली आहे. ९०,००० पेक्षा जास्त वापरकर्ते याचा वापर करत आहेत आणि २२० पेक्षा जास्त देशांमध्ये पार्सल पाठवले जात आहेत. ग्राहक भारतातील कोणत्याही दुकानातून (ऑनलाइन किंवा ऑफलाइन) खरेदी करून YourDesiCart मार्फत परदेशात पाठवू शकतात. लॉकर ॲड्रेस, पार्सल कॉन्सॉलिडीशेन आणि असिस्टेड शॉपिंग या सुविधा उपलब्ध आहेत.
आता YourDesiCart हे Garudavega सोबत काम करेल. त्यामुळे डिलिव्हरी जलद होईल, सेवा अधिक विश्वासार्ह बनेल आणि खर्चही कमी होईल.
NexGen Logistics चे सीईओ सतीश लक्करराजू म्हणाले, “YourDesiCart घेतल्यामुळे उत्तम सेवा शकू, याचे समाधान वाटते. आता आम्ही अधिक चांगला आणि पूर्ण शॉपिंग अनुभव देऊ शकतो.”
YourDesiCart च्या संस्थापिका सत्य अय्यागारी म्हणाल्या, “भारतीय उत्पादने जगभर सहज उपलब्ध करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. गरुडवेगा (Garudavega) सोबत आम्ही अधिक वेगाने वाढू शकतो.”
सध्या हैदराबाद येथे कार्यरत असलेले YourDesiCart लवकरच भारतातील इतर शहरांमध्ये विस्तार करणार आहे. यामुळे डिलिव्हरीचा वेळ कमी होईल आणि भारतीय विक्रेत्यांना जागतिक बाजारपेठेत नवीन संधी मिळतील.
