आधुनिक राहणीमानामुळे आपलं जीवन अधिक आरामदायी झालंय यात कोणतीही शंका नाही. मात्र, यातून निसर्गाशी आणि बाह्य जगताशी आपलं तुटलेलं नातं ओळखणंही महत्त्वाचं आहे. आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी निसर्गाचा थेट संबंध असतो. त्यामुळे निसर्ग आणि मनुष्यप्राण्यामधील सुसंवाद पुन्हा प्रस्थापित केल्यामुळे आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आणि घर, तसेच आसपासच्या परिसरात हिरवाई पुन्हा अवतरण्यासाठी त्याचा उपयोग होईल हे निश्चित!

मन:शांती मिळवून देणारं नैसर्गित वातावरण आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असं राहणीमान यांची सांगड घालणं फारच अवघड काम आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा निसर्ग आणि डोंगराच्या पायथ्याशी असणारी हिरवाई यांनी नटलेला गोदरेज हिलसाईड ३ हा प्रकल्प म्हणजे अत्याधुनिक राहणीमान आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा मिलाफ आहे. तब्बल ८ एकरहून अधिक हिरवाईनं वेढलेला हा प्रकल्प मुळातच नैसर्गिक प्रकाश आणि हवेशीर स्थितीचा पुरेपूर वापर व्हावा या पद्धतीने उभारण्यात आला आहे. प्रकल्पात वाहनमुक्त परिसर असल्यामुळे इथल्या रहिवाशांना त्यांच्या आरामदायी घरातच स्वच्छ हवेचा मनमुराद आनंद लुटता येतो. गोदरेज हिलसाईड प्रकल्पाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे घरांच्या मोठ्या खिडक्या आणि प्रशस्त बाल्कनीमुळे आसपासच्या निसर्गरम्य वातावरणाशी एकरुप होणं रहिवाशांना अगदी सहज शक्य होतं!

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
boat
पालघर: कृत्रिम भित्तिका समुद्रात सोडणारी बोट सातपाटीच्या खडकावर अडकली
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

बंदिस्त परिसरापासून ते आसपासच्या निसर्गसौंदर्यापर्यंत अनेक वैशिष्ट्याप्रमाणेच गोदरेज हिलसाईड प्रकल्प हा आपल्या दैनंदिन गरजेच्या गोष्टींपासून अगदी जवळ आहे. रहिवासी संकुलांच्या बाणेरपासून आयटी हब म्हणून ओळख असणाऱ्या हिंजेवाडीच्या मध्ये गोदरेज हिलसाईड प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. रुग्णालय, मेट्रो मार्गिका, बँक, शाळा आणि महाविद्यालये प्रकल्पापासून जवळच आहेत. या प्रकल्पात थेट अवकाशाशीच जणू हितगुज साधणारं विशेष बांधकाम इथल्या अत्यधुनिक आणि प्रशस्त सुविधांचा दर्जा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारा आहे. आलिशान राहणीमानाचा अद्भुत अनुभव देणाऱ्या या भागात रहिवाशांना प्रकल्पाचं विहंगम दृश्य बघण्याचा आनंद मिळतो. इथे स्वीमिंग पूल, आऊटडोअर जकूजी आणि फिटनेस सेंटरमुळे आरोग्यासोबतच करमणुकीचीही पुरेपूर काळजी घेतली आहे. या सर्व सुविधांसोबतच प्रकल्पामध्ये चांगल्या दर्जाच्या खरेदीच्या पर्यायांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या रोजच्या गरजा भागण्यासोबतच आपला खरेदीचा एकूण अनुभवही समृद्ध होतो.

याशिवाय, गोदरेज हिलसाईड प्रकल्पामध्ये प्रशस्त असं ‘रूट पार्क’देखील आहे. प्रकल्पाच्या परिसरात हिरवाईचा अनुभव घेता यावा, या दृष्टीने विचारपूर्वक या पार्कमध्ये फुलांचा बगीचा फुलवण्यात आला आहे. या पार्कमध्ये तुम्हाला संध्याकाळचा फेरफटका मारणे, मेडिटेशन आणि योगा अशा अनेक गोष्टी करता येतील. यामुळे आऊटडोअर अॅक्टिव्हिटी आणि सामाजिकरणासाठी आवश्यक बाबींची यथायोग्य पूर्तता या पार्कमध्ये होऊ शकेल! लहान मुलांसाठी खेळण्याची जागा, क्रेचेस आणि चर्चा विभाग यांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे रहिवाशांना एकत्र येण्याचं हक्काचं ठिकाण प्रकल्पाच्या आतच उपलब्ध झालं आहे! द हिलव्यू क्लबहाऊस तर या प्रकल्पात राहण्याचा अनुभव वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. यात जागतिक दर्जाच्या गेस्ट रूम्स, कन्सेप्ट सलॉन, ग्रंथालय आणि जिमचा समावेश आहे. ‘स्काय अरेना’ची रचनाच मुळात इथल्या रहिवाश्यांना पूर्णपणे वैयक्तिक आणि वैशिष्ट्यपूर्ण जागा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली आहे. गोदरेज हिलसाईडमध्ये चार स्तरांची सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये २४/७ सुरक्षा कर्मचारी, तातडीने प्रतिसाद, अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा व्यवस्थेमुळे पूर्णपणे सुरक्षित वातावरणाची हमीच रहिवाश्यांना मिळते!

द हिलसाईड प्रकल्प हा त्यात रहिवाश्यांना मिळणाऱ्या निवासी सोयी-सुविधांमुळेच फक्त विशेष ठरतो असं नाही. पण या प्रकल्पाला मिळालेलं नदीचं सान्निध्य इथल्या रहिवाश्यांना त्यांच्या रोजच्या धावपळीतून होणारी दमछाक घालवण्यासाठी आल्हाददायक ठरतं.

द गोदरेज हिलसाईड प्रकल्प हा उत्तम वास्तुशास्त्राचा नमुनाच आहे. यात रचनाशास्त्र, आलिशान वास्तव्य आणि व्यवस्था या तीन महत्त्वाच्या गोष्टींचा संगम घडून आला आहे. सध्या आरामदायी सुखसुविधांना प्राधान्य दिलं जात असलं, तरी गोदरेजमधील सदनिकांमध्ये आरामदायी जीवन आणि निसर्ग यांचा समतोल साधला गेला आहे.

जर तुम्हाला अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आलेल्या सुविधा आणि शहरांच्या धामधुमीपासून सुटका देणारं जीवनमान हवं असेल, तर भेट द्या-
https://www.godrejproperties.com/pune/residential/godrej-hillside-3/landingpage?utm_source=display_loksatta&utm_medium=cpm&campid=86437&utm_campaign=loksattamahalunge&utm_adgroup=na