फेब्रुवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक अचानक ठप्प झाली, तेव्हा त्याचे परिणाम केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरच नव्हे तर भारतातील घराघरांत आणि रस्त्यावरील खाद्य व्यवसायांपर्यंत जाणवू लागले. भारतापासून जवळपास ७ हजार किलोमीटर लांब असलेला हा जलमार्ग शांतपणे भारतातील ३० कोटींहून अधिक घरांमधील स्वयंपाकासाठी लागणाऱ्या इंधनाचा मुख्य पुरवठादार होता. याचबरोबर सातत्याने वाढणाऱ्या ऑटो-रिक्षांना, कारखान्यांना, रुग्णालयांच्या स्वयंपाकघरांना आणि महाविद्यालयीन कँटीननाही तो इंधन पुरवत होता.

भारतामध्ये डच बहुराष्ट्रीय कंपनी SHV Energy ची उपकंपनी म्हणून कार्यरत असलेली आणि देशातील सर्वात मोठ्या खासगी LPG वितरकांपैकी एक असलेली SUPERGAS साठी हा काळ कसोटीचा ठरला. त्यांची वितरण व्यवस्था आणि आणीबाणीच्या प्रसंगी कृती करण्याच्या क्षमतेचा खरा कस लागला. अशा प्रकारचे प्रसंग क्वचितच उद्भवतात. पण असं असलं, तरी अशाच काळात कंपन्यांमधील सर्वोत्तम गुणवैशिष्ट्ये अधोरेखित होत असतात. कंपन्या कितीही तणावात असल्या, तरीदेखील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणं हे ते गुणवैशिष्ट्य होय!

पुरवठा व्यवस्थेसमोर आव्हान आणि भारताचा प्रतिसाद

भारताच्या एकूण LPG आयातीपैकी जवळपास ९० टक्के आयात होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येते. भारताच्या एकूण गरजेपैकी जवळपास ६२ ते ६५ टक्के गरज आयातीतून भागवली जात असल्यामुळे होर्मुझ या मार्गाच्या बंदीचा मोठा परिणाम झाला. पहिल्या दोन आठवड्यांतच आयातीत जवळपास ३० टक्क्यांची घट झाली, तर जहाजांसाठी युद्धजोखमीचा विमा खर्च १ हजार टक्क्यांहून अधिक वाढला.

दरम्यान सरकारने यावर तात्काळ प्रतिसाद देत घरगुती ग्राहक, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांना प्राधान्याने LPG वितरण करण्याचे आदेश दिले. रिफायनऱ्यांमधील LPG उत्पादन २५ ते ३१ टक्क्यांनी वाढवण्यात आले, तर व्यावसायिक वापरासाठीचे वाटप कमी करण्यात आले, जेणेकरून भारतातील ३३.२ कोटी घरगुती जोडण्यांसाठीचा पुरवठा अखंडपणे चालू राहील.

आव्हानाला दिलेले सक्षम उत्तर

याच प्रतिकूल परिस्थितीत SUPERGAS ने निव्वळ आकड्यांच्या पलीकडे जाऊन आपली बांधिलकी दाखवून दिली. जरी घरगुती LPG पुरवठा हा कंपनीच्या मुख्य व्यावसायिक कार्यक्षेत्राचा भाग नसला, तरी एकूण पुरवठाच विस्कळीत झाल्यामुळे कंपनीला अतिरिक्त प्रयत्न आणि वाढीव खर्च करावा लागला. युद्धादरम्यान महाराष्ट्रात कंपनीने सर्वाधिक तणावाच्या काळातही घरगुती पुरवठ्याची शंभर टक्के बांधिलकी पूर्ण केली. गरजूंना नवीन जोडण्या देखील देण्यात आल्या. भारतभरातील कंपनीच्या ४०० हून अधिक फ्रँचायझींनी या तणावाच्या काळातदेखील अखंडपणे सेवा चालू ठेवली.

प्रूडल हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. चे वरीष्ठ व्यवस्थापन (खरेदी विभाग) राजेश म्हणाले,”देशभरातील पुरवठा व्यवस्थापन अडचणीत असताना SUPERGAS पुढे सरसावली आणि तमिळनाडूतील वेल्लोर येथील सीएमसी हॉस्पिटल आणि व्हीआयटी कॉलेजसारख्या संस्थांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांमध्ये एकाही दिवसाचा व्यत्यय येऊ दिला नाही. त्यांची विश्वासार्हता, कार्यशिस्त आणि दबावाखाली पुरवठा व्यवस्थापन पार पाडण्याची क्षमता यामुळे ते आमच्यासाठी केवळ विक्रेते न राहता जेव्हा खऱ्या अर्थाने गरज होती, तेव्हा ते आमच्या या प्रवासातील भागीदार बनले. आम्ही त्यांना आमच्या पुरवठा साखळीतील एक विश्वासार्ह आणि महत्त्वाचा घटक मानतो.”

lpg-crisis-in-india-hormuz-strait-supergas-supply (1)

मधल्या फळीतील वर्गाला पुरवठ्यासाठी आधार

पुरवठा व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या बाबींनुसार प्राधान्य देणं आवश्यक असलं, तरी त्यामुळे बाजारपेठेच्या मधल्या फळीत पुरवठ्याची मोठी पोकळी निर्माण झाली. उद्योगधंदे, हॉटेल्स, खासगी रुग्णालये, विद्यापठे आणि लॉजिस्टिक्स हब्ज यांचा समावेश असलेला भारतीय बाजारपेठेचा मधला वर्ग हा ना संरक्षित गटात मोडत होता, ना तो व्यावसायिक वापरकर्त्यांच्या यादीत होता. याच ठिकाणी खासगी एलपीजी वितरण व्यवस्थेची लवचिकता महत्त्वाची ठरते. कारण SUPERGAS ला आधीपासून निश्चित करण्यात आलेल्या यादीऐवजी प्रत्यक्ष गरजेनुसार कोट्याचे वाटप करण्याचे स्वातंत्र्य होते.

अत्यावश्यक संस्थांसाठी अखंड सेवा

याच काळात अनेक रुग्णालये, महाविद्यालये, पेईंग गेस्ट निवासस्थाने आणि स्वयंसेवी संस्थांनी SUPERGAS शी संपर्क साधला. त्यांना नवीन ग्राहक म्हणून नव्हे तर अत्यावश्यक सेवांसाठी स्थिर पुरवठा करणाऱ्या व्यवस्थेची गरज होती. यातील अनेक संस्थांसाठी आणि प्राधान्यक्रमाच्या उद्योगांसाठी LPG चा पुरवठा म्हणजे ऑपरेशन कंटिन्युटीचा भाग होता, तर अनेक ठिकाणी रुग्ण व रहिवाशांच्या कल्याणाशी थेट संबंधित बाब होती. त्यामुळे अशा संकटकाळात पुरवठादार बदलण्याचा त्यांचा अनुभव कोणत्याही अडचणीशिवाय राहावा याची खात्री करणं याला प्रत्यक्ष पुरवठ्याइतकंच प्राधान्य दिलं गेलं.

HAB Pharmaceuticals & Research Ltd चे प्लांट जनरल मॅनेजर संजय गुप्ता म्हणाले, “भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत आमचे उत्पादन कोणत्याही परिस्थितीत थांबू शकत नाही. SUPERGAS च्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, वेळेवर पुरवठा आणि नियमांचे पालन यामुळे या संपूर्ण काळात आमचा प्लांट कोणत्याही तडजोडीशिवाय सुरू राहिला.”

लवचिकतेसाठी उभारलेली भक्कम पायाभूत सुविधा

या सगळ्याच्या पाठिशी कंपनीचे दोन इंपोर्ट टर्मिनल्स, १६ फिलिंग प्लांट्स, पूर्णपणे समर्पित टँकर्सचा ताफा आणि ४०० हून अधिक फ्रँचायझी अशी भक्कम यंत्रणा उभी आहे.

कंपनीच्या या सर्व कामगिरीबाबत बोलताना SUPERGAS चे विक्री व विपणन संचालक अमीश मेहता म्हणाले, “गेल्या काही आठवड्यांत आमच्या संपूर्ण व्यवस्थेची कसोटी लागली. मात्र आम्हाला यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या केवळ इथल्या पायाभूत सुविधा नव्हत्या, तर त्यामागील माणसे होती. आमचे फ्रँचायझी भागीदार, प्रकल्प कर्मचारी आणि लॉजिस्टिक्सचे भागीदार यांनी हे सुनिश्चित केले की सिलिंडरची वाट पाहणारे एखादे घर, अत्यावश्यक सेवा देणारे रुग्णालय किंवा LPG वर अवलंबून असलेला ऑटोचालक यांपैकी कोणीही निराश होणार नाही. SUPERGAS मध्ये आम्ही नेहमीच LPG व्यवसायाला मानवी व्यवसाय मानले आहे आणि या कठीण काळात तो विश्वास अधिकच दृढ झाला आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना आणि भागीदारांना प्रशिक्षण व पाठबळ देत त्यांच्यासोबत उभे राहण्याची आमची बांधिलकी कायम आहे, कारण त्यांच्याकडून केले जाणारे प्रयत्नच आमचं चांगल्या सेवेबाबतचं वचन प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवतात.”

भविष्यातील कामगिरीची ब्लूप्रिंट

होर्मुझच्या संकटामुळे हे स्पष्ट झाले आहे की भारताचं LPG नियोजन हे केवळ धोरणात्मक साठे आणि रिफायनरी उत्पादनावर अवलंबून राहू शकत नाही. गेल्या काही आठवड्यांत SUPERGAS ने बजावलेली कामगिरी हा प्रत्यक्ष दबावाखाली काम करणाऱ्या मजबूत आणि जबाबदार वितरण व्यवस्थेचा एक प्रभावी नमुना ठरला आहे.