एका आईचं काळीज तिच्या मुलांसाठी तीळ तीळ तुटतं. ती कधीही आपल्या लेकरांना अगदी थोडाही त्रास सहन करताना बघू शकत नाही. ४३ वर्षीय लक्ष्मी एक अशीच आई आहे जिने आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून घरात अचानक लागलेल्या आगीत कसलाही विचार न करता उडी टाकली…आपल्या २९ वर्षीय मुलाचा जीव वाचवण्यासाठी!

शूर आई लक्ष्मीचा जीव वाचवण्याकरिता — दान करा!

“त्या दुर्दैवी घटनेनंतर माझी आई सध्या रुग्णालयात तिच्या आयुष्यासाठी लढत आहे. या परिस्थितीत मी तिला कसे सांगू की माझा लहान भाऊ, तिचा मुलगा, त्या घटनेतून जिवंत परत आलाच नाही?”

अश्रू अनावर होत लक्ष्मीची एकुलती एक मुलगी म्हणाली, “एक महिन्यापूर्वी माझी आई आणि भाऊ घरी होते, तेव्हा अचानक माझ्या भावाची किंकाळी घरात घुमली. स्वयंपाकघराला आग लागली, ज्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर जळाले आणि त्याने स्वतःला वाचविण्यासाठी बाहेर धाव घेतली. माझ्या आईने त्याला वाचविण्यासाठी काहीही विचार न करता आगीत उडी मारली. त्या आगीतून माझी आई बाहेर तर आली, परंतु ५०% खोल जखमांसोबत! ती आता तिच्या आयुष्यासाठी हॉस्पिटलमध्ये एक युद्ध लढत आहे”.

शूर आई लक्ष्मीचा जीव वाचवण्याकरिता — दान करा!

“माझी आई नेहमीच आमचं बळ राहिली आहे, पण आज ती जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे. वडिलांच्या निधनानंतर तिने आमच्यासाठी किती कष्ट घेतले, हे मला चांगलं माहीत आहे, आणि आज तिला जेव्हा आमच्या आधाराची गरज आहे, तेव्हा फक्त मी एकटीच तिच्या बाजूला उभी आहे. मला कळत नाही आहे कि मी नक्की करावे तर काय करावे.

“डॉक्टर म्हणतात, तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि तिला बरे होण्यासाठी दीर्घ व महागडे रुग्णालयात उपचार आवश्यक आहेत. तिच्या उपचारांची किंमत ही लाखोंमध्ये आहे आणि माझी मेडिकलमधील साधारण नोकरी आणि त्यापासून मिळणारा पगार हा पुरेसा नाही आहे”.

शूर आई लक्ष्मीचा जीव वाचवण्याकरिता — दान करा!

“मी आधीच खूप गमावलं आहे. आता माझ्या आईला गमावण्याची भीती वाटते. कृपया माझ्या आईसाठी मदत करा. कृपया दान करा,” अशी कळकळीची विनंती लक्ष्मीची असहाय्य मुलगी करते आहे.

Story img Loader