scorecardresearch

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल

ऑनलाइन क्लासेस: शिक्षणाचे भविष्य

काही वर्षांपूर्वी कोणत्याही शैक्षणिक संस्थेमार्फत अगदी दुर्मिळ स्वरुपात वापरली जाणारी गोष्ट, आजमितीला प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाचा मोठा भाग बनली आहे. २०२०पासून भारतातील बहुतांश शाळा व विद्यापीठांनी सुरक्षा कारणांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पत्करला आहे.

“मला अतिशय आनंद होत आहे की द इंटरनॅशनल स्कूलने स्थितीचा विचार करुन तात्काळ त्यांचे ऑनलाइन क्लासेस पुढे सुरु ठेवले,” असे बंगळुरुच्या रहिवासी रश्मी म्हणतात. त्या त्यांचे पती व मुलांसह राहतात.

“ऑनलाइन शाळेने मला सकाळी ५ ला धडपडत उठण्यापासून मुक्ती दिली. आता मला माझ्या कुटुंबासाठी फक्त नाश्ता बनवावा लागतो. मला माझ्या मुलांकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळू लागला आहे आणि मी आता बराच काळ त्यांच्यासोबत राहू शकते. मी त्यांना त्यांच्या घरच्या अभ्यासात मदत करु शकते. पण त्याची फार कमी वेळा गरज भासते. कारण ऑर्किडच्या शिक्षकांना अगदी ऑनलाइन क्लासेसमध्ये देखील मुलांकडून घरचा अभ्यास कसा करुन घ्यायचा याची चांगली कल्पना आहे”, असे त्या म्हणाल्या.

ऑनलाइन शंका निरसन वर्ग नेहमीच ऑर्किड्सच्या शैक्षणिक सुविधांचा भाग आहेत. पण गेल्या वर्षात त्यांची आणखीन निकडीने आवश्यकता भासत आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून सर्व ऑर्किड्स शाळांची व्यवस्थापने आणि कर्मचारी वर्ग मुलांना शाळेतल्या वर्गाप्रमाणेच दर्जेदार ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी झटत आहेत. यासाठी अभ्यासक्रमाच्या नियोजन व स्ट्रिमिंगची तसेच त्याला दररोज चॅनलाइझ करण्याची आवश्यकता भासते.

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूलने १८ मार्च २०२० पासून त्यांचे ऑनलाइन क्लासेस सुरु केल्यामुळे श्री. राजेश रंजन, फादर ऑफ तुषार्शु म्हणतात, “द इंटरनॅशल स्कूल महामारीची स्थिती ओळखणारी पहिली शाळा होती, जिने नियमितपणे ऑनलाइन क्लासेस सुरु केले.”

काही पालक स्टाफ मेंबर्सच्या तात्काळ उपलब्धतेमुळे ऑनलाइन क्लास सुरु झाल्याबद्दल आनंदी होते, तर काहींना सुरुवातीला काही शंका होत्या. “करोनामुळे लॉकडाउनच्या काळात आम्ही ऑनलाइन शिक्षणाकडे वळलो आणि हे सगळे कसे काय जमेल याबद्दल मी साशंक होतो,” असे श्री. तेजस राजे म्हणतात. त्यांची मुलगी ऑर्किड्समध्ये तिसरीत शिकत आहे. पण शाळा ज्याप्रकारे हे ऑनलाइन क्लास सांभाळत आहे, त्यामुळे ते अतिशय भारावून गेले. “मला शिक्षकांची व्हर्च्युअल क्लास घेतेवेळेची सृजनशीलता अतिशय आवडली आणि माझ्या मुलीला देखील ती खूपच आवडली. ऑनलाइन क्लासबाबत बोलायचे झाल्यास ती अगदी पाण्यातल्या माशाप्रमाणे त्यात समरस होऊन गेली आहे”, असे ते म्हणाले.

ऑर्किड्स इंटरनॅशनलमार्फत त्यांच्या ऑनलाइन शिक्षण कार्यक्रमासाठी कोणत्या सुविधा पुरवल्या जातात?
1.   एडूव्हेट पोर्टलवरुन नियमित लाइव्ह ऑनलाइन
2.   विशेष शंका निरसन वर्ग, विस्तारीत ऑनलाइन कार्यक्रम जो विद्यार्थी आणि विषय तज्ञांमध्ये लाइव्ह संवादाची सुविधा देतो.
3.   ऑलवेज ऑन लर्निंग पोर्टलवर उपलब्ध असणारे प्रत्येक इयत्तेसाठी तयार केलेले विशेष कोर्सेस.
4.   या कठीण काळामध्ये पालक-मुलातल्या अॅक्टिव्हिटीला चालना देणाऱ्या पीडीएफ वर्कशिट्स
5.   पालकांसाठी डॉ. यास्मिन सिद्दकी (चाइल्ड आणि पेरेंटिंग स्पेशालिस्ट) यांची मोफत पुस्तके ज्यामुळे गोष्टींना सकारात्मक ठेवण्यासाठी टिप्स मिळू शकतील.

ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलमार्फत घेतलेल्या ऑनलाइन क्लासेसचे काय लाभ आहेत?
1.   शाळा विद्यार्थ्यांच्या संपूर्ण सुरक्षेची हमी घेते. शाळा पुन्हा उघडणे १००% सुरक्षित होईपर्यंत ऑनलाइन क्लासेसचे नियोजन सुरु राहील.
2.   तुमच्या मुलांसाठी त्यांच्या शाळेतल्या वर्गांप्रमाणेच तसेच शिक्षक उपलब्ध असतील. यामुळे ऑफलाइनपासून ऑनलाइन आणि या उलट स्वरुपात क्लासेसच्या सुरळीत स्थानांतरणाची शाश्वती मुलांसाठी दिली जाते.
3.   वर्ग वेळ, जागा आणि विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल वैयक्तिकृत आहेत. मुलांना काय शिकायचे आणि त्यांच्या स्वत:च्या वेळात कसे शिकायचे याचा निर्णय घेता येईल.
4. तुमच्या मुलाला मदत करण्यासाठी शिक्षक त्याचप्रमाणे आयआयटी अॅल्युमिनी नेहमी हजर आहेत.
5. टेक्स्ट, ऑडिओ, ग्राफिक्स आणि व्हिडिओच्या मिलाफाच्या स्वरुपात सामुग्री डिलिव्हर केली जाईल. ज्यामुळे हाताळणे आणि आकलन करणे सहज सोपे होईल.
6.   वेब पोर्टलची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना कोणत्याही वयोगटातल्या मुलाला सहज हाताळता येईल.

ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूल पालकांना त्यांच्या मुलाला वर्गातल्या खऱ्या शिक्षणाप्रमाणेच ऑनलाइन क्लासेसमध्ये देखील दर्जेदार शिक्षण मिळण्याची शाश्वती देते.

“मला पुन्हा माझ्या शाळेत परत जावेसे वाटत आहे, मला देखील या मुलांप्रमाणेच आनंद घेता येईल,” असे श्री. सुरेश म्हणाले. त्यांचा मुलगा दर्शन आता १०वीमध्ये आहे.

सध्या सुरु असलेल्या महामारीमुळे जरी अपरिहार्य असले तरी ऑनलाइन क्लासेस हळूहळू पण खात्रीशीरपणे शिक्षणाचा स्थायी स्वरुपी भाग बनण्याच्या प्रगतीपथावर आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा इंटरनॅशनल स्कूल्सनी, त्यांच्या जागतिक संरचनेसह मुलांना जगाच्या दुसऱ्या भागातल्या त्यांच्या सहयोग्यांसह नेटवर्क करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ऑनलाइन क्लासेस लवकरच खंडांदरम्यान संस्कृती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचे माध्यम बनणार आहेत. द इंटरनॅशनल नेहमीच विद्यार्थ्यांना प्रगतीपर तंत्रज्ञानाचे सर्व लाभ प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देत राहील.

मराठीतील सर्व प्रायोजित ( Sponsored ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Orchids the internation school sgy

ताज्या बातम्या