scorecardresearch

Premium

कौशल्यपूर्ण व्यावसायिक घडवण्यासाठी परिणाम आधारित शिक्षणाचा पर्याय!

शिक्षण संस्थांनी लक्षात घेण्याची गरज आहे की एखादी कौशल्य आणि परिणाम आधारीत शिक्षण संस्था या आता मुख्य प्रवाहातील शिक्षणाला पर्यायी व्यवस्था नसून त्याचाच एक हिस्सा झाल्या आहेत.

outcome based course
परणाम आधारीत अभ्यासक्रम

आजच्या सतत बदलत्या विश्वामध्ये सातत्याने होणारं संशोधन हीच वास्तव परिस्थिती आहे. सध्याच्या काळातील तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि उद्योग क्षेत्रामध्य मोठा परिणाम जाणवतो. विशेषत: अनेक आधुनिक व्यवसाय आणि त्यांच्याशी संबंधित कौशल्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल जाणवतात. ज्ञानावर आधारित गिग-इकोनॉमी आणि नव्या युगातील उद्योगधंद्यांमध्ये झालेली वाढ ही नव्याने निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांचे प्रकार आणि संख्या या संदर्भात व्यवसाय क्षेत्रावर परिणाम करू लागली आहे. सध्याच्या काळात हे परिणाम समजून घेण्यासाठी आकडेवारी उपयोगी पडू शकेल. यानुसार, २००० सालात असणाऱ्या फॉर्च्युन ५०० कंपन्यांपेकी तब्बल ५४ टक्के कंपन्या अस्तंगत झाल्या आहेत, तर ज्या कंपन्या कदाचित २०३५ मध्ये या यादीत असू शकतील, त्या अद्याप जन्माला देखील आल्या नसाव्यात.

तांत्रिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकसंख्याशास्त्रीय बदल यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी सध्याची व्यावसायिक परिसंस्था पारंपरिक शिक्षण व्यवस्थेची अग्रदूतच आहे. शिक्षणाच्या पारंपरिक व्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा दोष म्हणजे यामध्ये सर्व लक्ष हे अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि चांगले गुण मिळवणे यावर केंद्रीत असते. त्याउलट ते विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय क्षेत्रासाठी आवश्यक अशी कौशल्य विकसित करण्यावर केंद्रीत असायला हवे. व्यवसाय क्षेत्राची गरज आणि शिकवला जाणारा अभ्यासक्रम यामध्ये असणारी ही तफावत देशात आधीच गंभीर बनलेल्या बेरोजगारीच्या समस्येमध्ये अधिकच भर घालण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

सध्याच्या स्पर्धात्मक व्यावसायिक परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी आणि स्पर्धा करण्यासाठी बिझनेस स्कूल्सवर लवचिक, चपळ आणि सक्षम व्यावसायिक घडवण्याची जबाबदारी असते. या व्यावसायिकांकडे अत्याधुनिक कौशल्य आणि व्यावसायिक सामग्री असायला हवी. यासाठीच पारंपरिक आणि कालबाह्य शिक्षण व्यवस्थेपासून आऊटकम बेस्ड एज्युकेशनकडे वळण्याची गरज आहे.

परिणाम-आधारित शिक्षण (OBE) हे एक शैक्षणिक मॉडेल आहे ज्यामध्ये अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन साधने ही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या शेवटी प्रदर्शित करण्याच्या कौशल्यांनुसार निश्चित केली जातात. फक्त गुण मिळवण्यावर ते आधारीत नसतात. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये काय शिकवलं जातं, याला प्राधान्य असतं, तर त्याउलट ओबीईमध्ये काय शिकलं जातं, यावर लक्ष केंद्रीत केलेलं असतं.

गाझियाबादच्या आयएमएसमध्ये आऊटकम बेस्ड एज्युकेशनचा विद्यार्थीकेंद्रीत दृष्टिकोन प्रत्येक टप्प्यात पाळला जातो. सुरुवातीपासूनच या संस्थेचा विश्वास जैसे थे स्थितीमध्ये बदल करणे आणि व्यावसायिक शिक्षण देण्यावर विश्वास राहिला आहे. यातून तयार होणाऱ्या व्यावसायिकांमध्ये २१व्या शतकातील उद्योगांसाठी आवश्यक ते कौशल्य विकसित होऊ शकेल असा संस्थेचा दृष्टीकोन आहे. उद्याच्या विश्वातील जागतिक दर्जाचे व्यावसायिक तयार करण्याच्या आमच्या याच ध्येयाला अनुसरून आमचं लक्ष हे कॉर्पोरेट विश्वाच्या अपेक्षा आणि मागण्यांवर केंद्रीत आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये आवश्यक अशी कौशल्ये निर्माण करण्यावर आमचा भर आहे. याद्वारे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये सखोल शिस्तीच्या ज्ञानाचे आवश्यक गुणधर्म; बौद्धिक कक्षा रुंदावणे; सांघिक भावना; उत्कृष्ट संवाद कौशल्य; कोणत्याही व्यावसायिक परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता; चपळता; क्रिटिकल थिंकिंग, समस्या सोडवणे; संशोधन अभिमुखता; सर्जनशीलता; नावीन्य; माहिती; संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्ये; सामाजिकदृष्ट्या जबाबदार, नैतिक आणि उद्योजकीय मानसिकता विकसित करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

जागतिक रोजगार क्षेत्राकडे एकदा पाहिल्यास हे सहज लक्षात येईल की बहुतेक अग्रगण्य कंपन्या या प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. भविष्यातील नोकरीसाठीच्या इच्छुक उमदवारांचं यश हे तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि तांत्रिक संशोधनातून निर्माण झालेल्या संधींचा योग्य वापर करण्याच्या त्यांच्या कौशल्यावर अवलंबून आहे. जगभरातील कंपन्या आपापल्या डिजिटल शाखांवर अधिक भर देत असताना जागतिक बाजारपेठेत नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना त्यांचं तंत्रज्ञानविषयक कौशल्य वाढवणं आवश्यक ठरतं.

आयएमएस गाझियाबादमध्ये अभ्यासक्रम हा ब्लूम्स टेक्सोनॉमीच्या उच्च मानकांवर आधारित तयार करण्यात आला आहे. कॉर्पोरेट एक्स्पर्ट्स, शिक्षणतज्ज्ञ आणि या क्षेत्राशी संबंधित इतर व्यक्तींशी सातत्याने चर्चा करून पुररावलोकित आणि अपडेट करण्यात आला आहे. जेणेकरून, हा अभ्यासक्रम डिजिटल विश्वातील आधुनिक तंत्रज्ञानाला आणि सातत्याने बदलणाऱ्या व्यावसायिक मानकांना अनुसरून राहील. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल विश्वात उपयोगी पडतील अशी व्यावसायिक दर्जाची व्यवस्थापन कौशल्ये विकसित करण्यासाठी मॅनेजमेंट ऑफ चेंज, इनोव्हेशन टेक्नोलॉजी, बिझनेस अॅनालिटिक्स, एचआर अॅनालिटिक्स, गुगल अॅनालिटिक्स आणि इतर अनेक गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

यासाठी संस्थेकडून अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी सेंटर फॉर इनोव्हेशन अँड ऑन्त्रप्रुनरशिप, व्हॅल्यु अॅडेड शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम्स, व्हॅल्यु अॅडेड सर्टिफिकेशन प्रोग्राम्स, कॉम्पिटन्सी मॅपिंग, स्टुडंट्स आऊटरीच अशा उपक्रमांचा समावेश आहे. रोजनिशीच्या आयुष्यातील महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी स्टुडंट्स सायकोलॉजिकल कौन्सेलिंग प्रोग्राम, डिपार्टमेंट क्लब्स अँड पर्सनल अँड प्रोफेशनल स्किल प्रोग्राम्स अशा उपक्रमांचा उपयोग होतो. विद्यार्थ्यांमध्ये कॉर्पोरेट रेडीनेस विकसित व्हावा यासाठी प्रि-प्लेसमेंट प्रिपेअर्डनेस कमिटी, प्लेसमेंट रेडिनेस एन्हान्समेंट प्रोग्राम, कॉर्पोरेट इंटरफेस सीरीज, सीएसआर अॅक्टिव्हिटीज, वर्कशॉप्स आणि इतर अनेक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

आएमएसनं याच कौशल्य विकसनासाठी जागतिक शिक्षण संस्थांशी भागीदारी प्रस्थापित केली आहे. यातून नियमितपणे आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरे, विशिष्ट अशा टॉक सिरीज, आंतरराष्ट्रीय परिषदा, कॉन्क्लेव्ह आणि समिट्सचं आयोजन केलं जातं. यातून जागतिक आणि कॉर्पोरेट विश्वातील आदान-प्रदान सक्षम करणं शक्य होऊ शकेल. संशोधन आणि शैक्षणिक प्रतिभा या क्षेत्रामध्ये एकत्रितपणे प्रगती करण्यासाठी संस्थेनं अनेक नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्थाशी भागीदारी केली आहे.

हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही की आपण अशा जीवघेण्या स्पर्धेच्या काळात वावरत आहोत, जिथे कंपन्यांच्या इच्छुक उमेदवारांकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा असतात. कर्मचाऱ्यांना रुजू होण्यासाठी आणि काम समजून घेण्यासाठी मोठा कालखंड दिला जाण्याचे दिवस आता निघून गेले आहेत. आजच्या काळातील कंपन्या कर्मचाऱ्यांकडून पहिल्या दिवसापासूनच पूर्णपणे निर्दोष कामाची मागणी करतात. शिक्षण संस्थांनी लक्षात घेण्याची गरज आहे की एखादी कौशल्य आणि परिणाम आधारीत शिक्षण संस्था या आता मुख्य प्रवाहातील शिक्षणाला पर्यायी व्यवस्था नसून त्याचाच एक हिस्सा झाल्या आहेत. हे समजून घेतल्यानंतरच या शिक्षण संस्था फक्त ज्ञानाची सुविधा उपलब्ध करण्याऐवजी ज्ञानाचा प्रसार करण्याच्या भूमिकेत स्वत:ला विकसित करू शकतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Practicing outcome based education system in india obe curriculum teaching pmw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×