सध्याच्या घडीला माणूस आपलं काम आणि नात्यांमध्ये गुंतून गेलाय. रोजच्या धकाधकीत तो इतका गुंतून गेला आहे की त्याला त्याचं शरीर आणि मनस्वास्थ्य शांत ठेवण्यासाठी वेळच नाही. याच कारणामुळे माणसं विविध आजारांना बळी पडत आहेत. हृदयरोग हा त्यापैकीच एक आहे. जगभरात हृदयरोग जडलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे ज्याची मुख्य कारण खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी, शरीराला हालचाल नसणे, व्यायामाचा अभाव आणि तणावपूर्ण आयुष्य.

दरवर्षी २९ सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे अर्थात विश्व हृदय दिवस म्हणून साजरा केला जातो. हृदय रोगाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस साजरा होतो. वर्ल्ड हार्ट डे (World Heart Day ) च्या दिवशी आरोग्याशी संबंधित विविध संस्था जनजागृतीचे काम करतात. Cardinal Health ने यासंदर्भातला एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. ज्यामध्ये पुण्यातील हरदास हार्ट केअरचे डॉक्टर सुहास हरदास यांनी वर्ल्ड हार्ट डेच्या अनुषंगाने लोकांना संदेश दिला आहे.

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
how Screaming is good for your health
Screaming : ‘किंचाळणे’ किंवा ‘ओरडणे’ आपल्या आरोग्यासाठी आहे चांगले; घ्या जाणून तज्ज्ञांनी सांगितलेले कारण…
2024 Bajaj Pulsar N125
Hero, Honda चा खेळ खल्लास करण्यासाठी बजाज खेळतेय नवा गेम, देशात आणतेय नवी Pulsar, किंमत…
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी

पाहा व्हिडीओ 

 

योग्य आहारपद्धती आणि नियमित व्यायाम यांच्या सहाय्याने हृदय ठेवा सृदृढ
हृदयरोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण योग्य आहार पद्धती निवडली पाहिजे. ही आहार पद्धती फक्त हृदयासाठीच नाही तर संपूर्ण शरीरासाठी योग्य असली पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड, सिगारेट, मद्यपान या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. एवढंच नाही तर आपल्या आहारात पालेभाजी, फळं यांचा समावेश आवर्जून करा. याशिवाय दररोज किमान अर्ध्या तासासाठी व्यायाम करण्याची सवय अवलंबली पाहिजे. यामध्ये तुम्ही चालण्याचा, धावण्याचा किंवा सायकलिंगचा व्यायाम निवडू शकता.

करोना व्हायरस आणि हृदय रोग

करोना व्हायरस आणि हृदय रोगाची लक्षणं काही वेळा समान दिसून आली आहेत. हृदय रोग जडला असल्यास ताप कमी येतो मात्र खोकला, श्वास लागणे, छातीत दुखणे, घाम फुटणे ही लक्षणं दोन्ही आजारांमध्ये जाणवतात. जर असा काही त्रास तुम्हाला होऊ लागला तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. समजा तसे शक्य नसेल तर टेलि मेडिसिनच्या मदतीने सल्ला घ्या. डॉक्टरांना वाटलं तर ते तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देतील.

हृदय रोग जडलेल्यांना विशेष सल्ला
जर तुम्ही हृदयरोग असलेल्या व्यक्ती आहात तर ही बाब लक्षात घ्या की तुमच्या आजाराशी संबंधित असणारी औषधं तुमच्याकडे पुरेशा प्रमाणावर आहेत. जर गरज असेल तर अतिरिक्त औषधं मागवून घ्या. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कोणतंही औषध सुरु अथवा बंद करु नका. एवढंच नाही जे तुमचे फॅमिली डॉक्टरांचा, नातेवाईकांचा आणि मित्रांचे फोन नंबर सेव्ह करुन ठेवा. इमर्जन्सीच्या वेळी तुम्हाला त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

सध्याच्या घडीला माणूस गोल ओरिएंटेड झाला आहे. मात्र महत्त्वाची बाब ही आहे की माणसाने आपल्या शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी त्याने कोणतेही ध्येय ठेवलेले नाही. एक लक्षात घ्या की तुम्हालाच तुमचे आरोग्य चांगले ठेवायचे आहे. त्यामुळे आपल्या शरीराची आणि हृदयाची काळजी घ्या. शरीर निरोगी असेल तर तुम्ही आयुष्यात कोणतेही ध्येय गाठू शकता हे विसरु नका.