|| प्रभा गणोरकर

गुस्ताव फ्लॉबेर या फ्रेंच कादंबरीकाराच्या ‘मादाम बोव्हारी’ (१८५७) या शोकात्म कादंबरीची नायिका एम्मा. शोकांतिकेसाठी तीच जबाबदार असल्याने तिच्याबद्दल सहानुभूती वाटत नाही. या कादंबरीतून फ्लॉबेरने व्यभिचाराचा विषय हाताळला आहे. फ्लॉबेरची ही आधुनिक, वास्तववादी कादंबरी त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी व एक महान कलाकृती म्हणून जागतिक वाङ्मयात गौरविली जाते.

janhvi kapoor walked barefoot with boyfriend shikhar pahariya mother smruti shinde
Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर
Prajakta mali put her mothers name said its mandatory to put mother's name after your name decision by Aditi Tatkare
‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ ऐतिहासिक निर्णयानंतर अभिनेत्रीने लावलं आईचं नाव, पोस्ट शेअर करत म्हणाली…
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Ajith Kumar made biryani video viral
बाईकने रोड ट्रिपवर निघालाय सुप्रसिद्ध अभिनेता, कॅम्पमध्ये मित्रांसाठी बनवला खास पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

विविध पुरुष लेखकांनी स्त्रियांच्या भावभावनांचे, मनोवस्थांचे, स्वभावाचे, परिस्थितीचे, असहायतेचे, संवेदनशीलतेचे, कजागपणाचे, स्खलनशीलतेचे, दुष्टपणाचे चित्रण आपल्या विविध कलाकृतींतून, विविध प्रकारच्या व्यक्तिरेखांमधून केलेले आहे. स्त्रीवादी समीक्षकांच्या मते, पुरुष लेखकांच्या मनात स्त्रीची जी हवीहवीशी, सुंदर, आकर्षक प्रतिमा असते ती समोर ठेवून ते आपल्या कादंबऱ्यांतल्या नायिका रंगवतात. सिमॉन द बोव्हाच्या मते, स्त्रीचे खरेखुरे चित्रण पुरुष लेखकांना करता येणे शक्यच नाही.

स्त्रिया लैंगिक संबंधाच्या बाबतीत धाडसी असतात हे दाखवताना पुरुष लेखकांनी त्या धाडसाबद्दल त्यांना शिक्षा झाली असे चित्रण केले आहे, असे प्रतिपादन करताना एका समीक्षिकेने टॉलस्टॉय आणि फ्लॉबेर या कादंबरीकारांची उदाहरणे दिलेली आहेत. आजच्या लेखात गुस्ताव फ्लॉबेर या फ्रेंच कादंबरीकाराच्या मादाम बोव्हारी (१८५७) या कादंबरीतील एम्मा या स्त्रीचे व्यक्तिचित्र आपण बघणार आहोत.

फ्लॉबेरची ही आधुनिक, वास्तववादी कादंबरी त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी व एक महान कलाकृती म्हणून जागतिक वाङ्मयात गौरविली जाते. एम्मा ही या शोकात्म कादंबरीची नायिका.

एम्मा ही सुखवस्तू पित्याची, कॉन्व्हेन्टमध्ये शिकलेली मुलगी. कादंबऱ्या वाचणे, चित्रे काढणे, कशिदाकाम करणे, पियानो वाजवणे हे तिचे छंद असतात. तिच्या पित्याचा पाय दुखावतो, त्यावर इलाज करण्यासाठी पलीकडच्या गावातला डॉक्टर चार्ल्स त्यांच्याकडे येतो. तेव्हा सुस्वरूप एम्माविषयी त्याला आकर्षण वाटू लागते. चार्ल्सला त्याच्या आईने प्रयत्नपूर्वक डॉक्टर केलेले असते. एका गावात त्याचे बस्तान बसवून दिलेले असते आणि एका बेलिफाच्या विधवेशी त्याचे लग्नही लावून दिलेले असते. चार्ल्सची ही बायको खाष्ट, कुरूप, हडकुळी, संशयी आणि त्याच्यावर अधिकार गाजवणारी असते. चौदा महिने हा संसार चालतो. पण एकदा चार्ल्सच्या आईशी तिचे जोरदार भांडण होते, पशांवरून चांगलाच तमाशा होतो नि अचानक रक्त ओकून ती मरते. चार्ल्स एकाकी होतो, पण त्याच्या मनात एम्माने घर केलेले असते. प्रयत्न करून पाहू या म्हणून तो एम्माच्या वडिलांकडे शब्द टाकतो. एम्माची संमती असल्याने लग्नाची तयारी सुरू होते. एम्माला लग्न थाटामाटात, मध्यरात्री रोषणाई, खूप पाहुणे, मेजवानी अशा समारंभाचे हवे असते. पण तिचा बाप तिची कल्पना धुडकावून लावतो. लग्न होते आणि एम्मा मादाम बोव्हारी बनून चार्ल्सच्या गावी राहायला येते.

चार्ल्सचे घर लहान आहे. क्लिनिकमध्ये स्वयंपाकघरातले वास येतात. आणि स्वयंपाकघरात क्लिनिकमधल्या रुग्णांचे खोकणे ऐकू येते. चार्ल्स लग्नाने सुखावला आहे. सुस्वरूप बायको मिळाल्याने चारचौघांत त्याची मान उंचावली आहे. एम्माही नव्या वातावरणाशी जुळवून घेते आहे. ती घराची सजावट, नवे पडदे यांवर भरपूर खर्च करते. नोकरांवर देखरेख करते. चार्ल्सला तिचे फार कौतुक आहे. तिने काढलेली चित्रे त्याने फ्रेम करून िभतींवर लावली आहेत. ती पियानो वाजवते तेव्हा तो तिच्याजवळ उभा राहून ऐकतो. तिच्यावरचे आपले प्रेम तो निरनिराळ्या प्रकारांनी व्यक्त करीत राहतो, पण ती कधी कधी हसून त्याला बाजूला सारते. सारखे अंगाला चिकटणाऱ्या मुलासारखे त्याचे वागणे असते.

एम्माच्या मनात प्रेमाच्या काही विशिष्ट रोमँटिक कल्पना आहेत. कादंबऱ्या वाचून तिच्या प्रेमासंबंधीच्या त्या कल्पना पक्क्या झाल्या आहेत. ती भावविवश, चन, श्रीमंती, थाटमाट आवडणारी आहे. त्या लहानशा गावात निम्न मध्यमवर्गीय, रटाळ, तेच ते आयुष्य दळत बसलेली माणसे तिच्या आसपास आहेत. चार्ल्स दिवसरात्र आपल्या व्यवसायात गुंतलेला. एम्माला हळूहळू सगळ्या गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो. जीवनाबद्दलच्या तिच्या स्वप्नात न बसणारे जगणे तिला जगावे लागत होते. सासू मधूनमधून येत असे, तिच्या उधळपट्टीवर ताशेरे झाडीत असे. काटकसरीच्या सूचना देत असे. एम्माला जीवन नीरस वाटू लागले. तिच्या मनाच्या कानाकोपऱ्यात हळूहळू एक कोळी शांतपणे आपले जाळे विणू लागला. त्यात भरीस भर म्हणजे चार्ल्सला एका नृत्य समारंभाचे निमंत्रण येते. तिथे गेल्यावर तिथले ऐश्वर्य, थाटमाट, ऐटबाज पोशाख घातलेले तरुण, नादावून टाकणारे संगीत आणि उंची मद्य, धुंद करणारी तरुण पुरुषांबरोबर केलेल्या नृत्याची नशा ती अनुभवते. परतल्यावर त्या समारंभाच्या आठवणींत ती रमत राहते. त्यातल्या व्हायकाऊंट असलेल्या पुरुषाने तिला आकर्षति केलेले असते. तो पॅरिसला राहत असतो. पॅरिसचा नकाशा ती मागवून घेते आणि तिथल्या रस्त्यांवर, दुकानांत, पार्लर्समध्ये आपण हिंडतो आहोत असे स्वप्नरंजन करण्यात वेळ घालवते. पॅरिसच्या श्रीमंतीची, दिमाखाची, फॅशन्सची वर्णने करणारी मासिके ती वाचत राहते. तिच्या मनात दडलेल्या सुखांच्या, आसक्तीच्या तृप्तीच्या कल्पना करण्यात ती दंग असते. आपल्या जुन्या कामवालीला काढून टाकून एका चौदा वर्षांच्या मुलीला नेमते आणि पाण्याचा ग्लास ट्रेमध्ये आणावा, समोरच्याला आदराने संबोधावे अशा रितीभाती तिला शिकवू लागते. तिचे स्वत:चे वागणेबोलणेही ऐटबाज होऊ लागते. चार्ल्सला हा बदल सुखावून जातो, पण तो स्वत: जसा होता तसाच राहतो. त्याला महत्त्वाकांक्षा नाहीत, एक नाटकसुद्धा त्याने कधी पाहिले नाही, त्याला पोहता येत नाही. काय त्याचे कपडे, काय ते फुरफुर आवाज करीत सूप पिणे नि ताटातले अन्न चाटूनपुसून खाणे, गटगटा पाणी पिऊन अंथरुणावर पडणे आणि घोरायला लागणे.. चार्ल्सबद्दल एम्माच्या मनात वाढू लागलेली चीड, त्या गावाबद्दल, पलीकडे जायचे दार बंद असलेल्या बोळकंडीसारख्या स्वत:च्या आयुष्याबद्दल तिला किती वीट आलेला आहे याचे तपशीलवार, बारकाईने केलेले वर्णन मुळातून वाचण्यासारखे आहे.

एम्माची अस्वस्थता वाढत जाते, तिचे घरातले लक्ष उडून जाते. ती वारंवार आजारी पडू लागते. शेवटी चार्ल्स ते गाव सोडतो. जरा मोठे, बाजारपेठ, दुकाने असलेल्या, नदीकाठच्या टुमदार गावात ते राहायला येतात. त्या वेळी एम्माला दिवस गेलेले असतात. बोव्हारी दाम्पत्याचा प्रवेश गावातल्या लोकांना उत्साहित करणारा असतो. घरमालकीण बडबडी, पण कामसू, मदतीचा हात पुढे करणारी असते. एम्माला हा बदल आवडतो. शेजारच्या घरात वरच्या मजल्यावरच्या लहानशा खोलीत लिऑन नावाचा एका वकिलाकडे कारकुनी करणारा तरुण राहत असतो. एम्मा सगळ्यांशी ऐसपस गप्पा मारू लागते. विशेषत: लिऑनशी. त्याला खूप माहिती असते, संगीत आवडते, वाचनात किती आनंद असतो हे तो रंगवून सांगतो. लहानशा गावात कारकुनी करीत कंटाळलेल्या त्या युवकाला ही रूपवान, पियानो वाजवणारी, आकर्षक स्त्री भेटली. तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी त्याच्याकडे पुष्कळच गोष्टी होत्या. त्याच्याबद्दल लोकांचे मत चांगले होते. एम्माच्या व त्याच्या आवडीनिवडी सारख्याच होत्या. त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगत. चार्ल्सचे अद्याप बस्तान बसले नव्हते. रुग्ण नसत. त्यामुळे तो तासन्तास काहीही न बोलता नुसता बसून राही. आधीच्या गावातल्या घरावर त्याचे पुष्कळ पैसे खर्च झाले होते. नव्या गावात येताना बरेचसे सामान तुटले, वाटेत हरवले. पण बायको गरोदर, मूल होण्याच्या कल्पनेने तो उत्साहित होत असे.

एम्माला मुलगा हवा होता, पण मुलगी झाली. मुलीला सांभाळण्यासाठी एक नर्स ठेवली गेली. शेजारीच राहत असल्याने आणि घरमालकिणीकडे सारे एकत्रच जेवण घेत असल्याने एम्माची लिऑनशी रोजच गाठ पडू लागली. पत्ते खेळणे, त्याचे काव्यवाचन ऐकणे, इतरांची निजानीज झाल्यावर हळू आवाजात एकमेकांबरोबर बोलत राहणे हे जवळजवळ रोजच होऊ लागले. आणि त्यांच्यात एक बंध निर्माण झाला. चार्ल्सला त्यांच्या भेटींबद्दल संशय वाटत नसे. लिऑनचे नीटनेटके राहणे, ऐटबाज पोशाख हे सारे एम्माला त्याच्याकडे ओढू लागले. ती त्याच्याबरोबर पुष्कळ वेळ काढू लागली. नदीकाठी, बागेत फिरू लागली. सतत नाटके, संगीत, नृत्याचे जलसे, वाचन यासंबंधी ते बोलत बसत. पण खरे तर त्यांना काही वेगळे बोलायचे असे. काही तरी मधुर असे त्यांच्यात उमलत होते. दूरच्या अज्ञात क्षितिजाचा विचार न करता मनावर चढलेली वेगळी धुंदी दोघेही अनुभवत होते. एम्मा एक वेगळेच आयुष्य अनुभवू पाहत होती..

prganorkar45@gmail.com

chaturang@expressindia.com