आईचं दूध बाळासाठी किती महत्त्वाचं असतं आणि आईलाही त्याची किती सखोल जाणीव असते, हे स्पष्ट करणारी हिरकणीची गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आजच्या काळातल्या हिरकणीही अनेक दिव्यांमधून जात आपल्या बाळाला वेळच्यावेळी दूध मिळेल याची काळजी घेत असतात.

शिवाजी महाराजांच्या अनेक स्फूर्तिदायक कथा आपण सर्वानी नक्की वाचल्या आहेत. हिरकणीची गोष्ट आठवते? बाळाला दूध द्यायला त्या मातेने कडय़ावरून उतरण्याचे साहस केले. अशा अनेक हिरकणी आजही अडचणींचे डोंगर पार करतात, बाळाला दूध पाजून त्याचे / तिचे रक्षण करतात.

virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
Aurangzeb had changed the name of Pune to 'Muhiabad' after chatrapati shivaji maharaj death
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव; जाणून घ्या इतिहास
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

बाळ कुटुंबाचे आहे तर बाळाचे रक्षण, संगोपन हीसुद्धा कुटुंबाचीच जबाबदारी आहे, या प्रकारचा संदेश देणारी एक सुंदर जाहिरात आजकाल टी.व्ही.वर येते. प्रसूतिगृहात आजी लगबगीने येते ‘‘मैने वादा किया था, मैने वादा किया था’’! म्हणत. आजीने बाळाला पहिले दूध नक्की मिळेल याची जबाबदारी घेतली होती आणि तसेच वचन दिले होते. ही वचनाची संकल्पना फारच सुंदर आहे ना!

अशा हिरकणी, अशा समजूतदार कर्तव्यतत्पर आज्या, मावश्या, आत्या, आजोबा, बाबा; सगळेच घरोघरी असावेत. पण काही आरोग्यविषय प्रश्न असे असतात की त्यांच्याविषयीचा सल्ला, समुपदेशन, देखरेख आणि सर्वात महत्त्वाची आपुलकी यांची गरज असते. आणि डॉक्टर, नर्सेस बऱ्याचदा इतर गंभीर रुग्णांच्या गडबडीत या समुपदेशनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यासाठी ‘ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया’ या सेवाभावी संस्थेने ‘लॅक्टेशन मॅनेजमेन्ट कन्सल्टन्ट’ तयार केले आहेत. ‘मुंबई ब्रेस्टफीडिंग प्रमोशन कमिटी व ‘बी. पी. एन. आय’ या संस्थांच्या विद्यमाने मुंबईच्या तसेच देशभरातील अनेक रुग्णालयांमध्ये ‘मदर सपोर्ट ग्रुप’ चालवले जातात. ही सुविधा खासगी तसेच सरकारी रुग्णालयांमधूनही उपलब्ध आहे. आमच्या रुग्णालयातील नव्या मातांनाही या स्तनपान समुपदेशकांचा खूप फायदा झाला आहे. त्या प्रसूतीनंतर आईने बाळाला कसे धरायचे, किती वेळा पाजायचे, बाळ भुकेले आहे हे कसे समजायचे, दूध कसे काढायचे, इ. सर्व स्तनपानविषयक प्रश्न, शंका, अडचणी यातून शंकानिरसन व मार्गदर्शन करतात.

कुणी म्हणेल, डॉक्टरांपर्यंत ठीक होते; बाळाला पाजण्यात काय मोठेसे आहे? त्याला समुदपेशक कशाला हव्यात? आपण प्रॉपर्टी कन्सल्टन्ट, ब्युटी कन्सल्टन्ट, पर्सनल ट्रेनर, इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट या व्यक्तींचा सल्ला घेतोच ना? बाळ हे आपली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे की नाही! मग त्याच्या संगोपनातल्या प्रश्नांना संवेदनशीलपणे, शास्त्रशुद्ध उत्तरे देणाऱ्या प्रशिक्षित, अनुभवी व्यक्तींच्या सेवेचा लाभ का घेऊ नये?

व्यक्ती तितक्या प्रकृतीच्या तक्रारी असू शकतात. अशा विविध प्रश्नांचा विचार करू. कधी कधी बाळ अकाली जन्मते आणि परस्पर बाळांच्या अतिदक्षता विभागात दाखल केले जाते. कधीतरी आई काही कारणाने सिरियस असू शकते. अशा वेळी प्रसूतीनंतर लागलीच बाळाला पाजणे शक्य नसते. दूध बनायला लागले की छाती दुखायला लागते, स्तन घट्ट होतात. अशा वेळी ब्रेस्टपंपच्या साहाय्याने किंवा हातांनीच हळूहळू दाबून दूध काढावे लागते. बाळ दूध पिऊ शकत नसेल तर तेच दूध बाळास देता येते. छातीही हलकी होते, ताप येत नाही, नवीन दूध बनण्याची प्रक्रिया चालू राहते आणि बाळालाही पोषण मिळते. जेव्हा आईची तब्येत सुधारते तेव्हा तिला लवकरात लवकर बाळाच्या संगोपनात, इलाजात सहभागी व्हायची संधी द्यावी. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढतो. प्रीमॅच्युअर (अकाली जन्मलेले) बाळ हाताळणे हे खूप मोठे आव्हान आहे. ते पेलायची क्षमता आपल्यात आहे असा विश्वास मिळवण्यात तिला डॉक्टर्स, नर्सेस, समुदपेशक तसेच कुटुंबातील सदस्य मदत करू शकतात. प्रीमॅच्युअर अथवा कमी वजनाची बाळे दूध ओढू शकत नसतील तर त्यांना वाटी-चमच्याने दूध द्यावे लागते. त्यासाठी दूध काढून किंवा क्वचित प्रसंगी वरचे दूध असेल तर ते योग्य तापमानात ठेवायचे; र्निजतुक केलेल्या बाटलीत ठेवून हवे तेवढे वाटीत घेऊन पाजायचे; ही पूर्णवेळची जबाबदारी आहे. एकटी आईच हे सर्व करू शकली नाही तर तिला कोणाची तरी मदत लागते. अशा बाळांना ऊब आवश्यक असते. त्यांचे तापमान, रक्तातील साखर व इतर घटक लवकर कमी होऊ शकतात.

यासाठी बाळाला आपल्या छातीजवळ कपडय़ाच्या पिशवीत घेऊन उबदार ठेवता येते. आईच्या किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या उबेत बाळ झोपू शकते, जागे झाल्यास त्याच्या/ तिच्या गरजेनुसार पाजता येते. याला कांगारू केअर म्हणतात. आई कामावर रुजू होणार असेल तर ती पाजणे चालू ठेवू शकते. ब्रेस्टपंपच्या साहाय्याने दूध काढून घट्ट झाकणाच्या, स्वच्छ र्निजतुक केलेल्या तीन ते चार औंसाच्या (साधारण १२० सी. सी.पर्यंत) बाटल्यांमध्ये ठेवून त्यावर वेळ व दिनांक टाकावा. त्या जरुरीप्रमाणे फ्रिज वा डीप फ्रिजरमध्ये ठेवून पाजायच्या वेळेप्रमाणे कोमट पाण्यात ठेवून दूध रूम टेंपरेचरला आणून वापरता येतात.

बाहेरचे तापमान २५ अंश सेंटिगेट्रेडच्या खाली असले आणि दूध सहा तासांत वापरायचे असले तर फ्रिजमध्ये ठेवले नाही तरी चालते. चार अंश सेंटिग्रेटेडपर्यंत तापमानात पाच दिवसांपर्यंत हे दूध साठवता येते. दोन आठवडय़ांपर्यंत डीप फ्रिजरमध्ये ठेवता येते.

मिल्क बँकमध्ये तीन ते चार महिन्यांपर्यंतसुद्धा हे दूध ठेवता येते. एका वेळेस वापरून संपेल (दोन-तीन औंस) एवढे दूध असेल तर ते वाया जाणार नाही, कारण एकदा बाहेर काढलेले दूध परत फ्रिजमध्ये ठेवता येत नाही.

काही आजार शरीर खंगवतात; काही मन मारून टाकतात. एच. आय. व्ही. ग्रस्त मातेला भीती आणि अपराधाची भावना घेरतात. एच. आय. व्ही. हा संसर्गजन्य आहे; पण योग्य काळजी घेतल्यास इतर दीर्घकालीन आजारांसारखाच (मधुमेह, ब्लडप्रेशर) आहे. ए. आर. टी.चे औषधोपचार चालू केल्यास शरीरातील विषाणूंचे प्रमाणही कमी राहते. गरोदर मातांना सध्या सरकारी तसेच पालिका रुग्णालयांत ‘बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी व विषाणू संक्रमण टाळण्यासाठी ही थेरपी मोफत दिली जाते. ही थेरपी चालू केल्यावर आयुष्यभर घ्यायची असते. स्तनपानाच्या काळातही ही थेरपी चालू केल्याने बाळ सुरक्षित असते. यासाठी सरकारी रुग्णालयातील समुपदेशक तसेच डॉक्टर मातांना मदत करू शकतात.

हिपॅटायटीस बी व सी हे यकृताचे रक्तातून संक्रमित होणारे आजार आहेत. हिपॅटायटीससाठी इम्युनोग्लोब्युलीन व लस जन्मानंतर दिली जाते. मातांनी दूध देणे थांबवायचे नसते; पण जर स्तनाग्रांवर जखम असेल तर दूध काढून टाकावे.

कधी कधी स्तनाग्रे (र्रिटॅक्टेड) आत खेचलेली असतात, लॅक्टेशन कौन्सेलर अथवा डॉक्टरांच्या देखरेखीखाली तपासून पाहता येते. दाब दिल्यावर स्तनाग्र बाहेर येत असेल तर बाळ दूध खेचू शकते. अथवा निपल शील्ड वापरून बाळाला पाजता येते. हे वापरायला लॅक्टेशन कन्सल्टंटकडून शिकावे.

जुळी- तिळी बाळे असतील तरी नैसर्गिकरीत्या त्यांना पुरे पडेल इतके दूध आईच्या स्तनात तयार होते. ही बाळे बऱ्याचदा प्रीमॅच्युअर असतात. त्यांचे पोषण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे वजनसुद्धा नियमितपणे पाहावे लागते; त्यांना वाटी-चमच्यानेही पाजावे लागते. या सर्व गोष्टींसाठी कुशल देखरेख आवश्यक असते.

किमोथेरपी (कर्करोगाची औषधे),  किरणोत्सर्गी औषधे, इ. घेत असल्यास स्तनपान देणे टाळावे; पण दूध काढून टाकत राहावे. त्यामुळे दूध बनण्याची क्रिया चालू राहून थेरपी संपल्यावर दूध देणे चालू करता येते.

स्तनपान देण्याचे आईलाही अनेक फायदे असतात. सातत्याने स्तनपान देत राहिले तर बीज बनण्याची क्रिया होत नाही आणि गर्भधारणा टाळता येते; पण संतती नियमनाचा हा मार्ग हमखास खात्रीचा आहे असे म्हणता येत नाही. स्तनपान दिलेल्या मातांना स्तन व बीजाशयाचे कर्करोग होण्याची शक्यता कमी संभवते. प्रसूतीनंतर गर्भाशय आकुंचन पावण्यासाठी जी हॉर्मोन्स काम करतात त्याच हॉर्मोन्समुळे स्तनांतून दूध द्रवते. प्रसूतीनंतर लागलीच छातीवर लावल्यास गर्भाशय आकुंचित होऊन रक्तस्राव कमी होतो.

बऱ्याचदा स्तनदा मातांनी शतावरी, मेथी, अळीव खावी की खाऊ नये असे प्रश्न विचारले जातात. अ‍ॅलोपथीमध्ये या प्रश्नाचे उत्तर नाही. पिढय़ान्पिढय़ांच्या अनुभवाने चालत आलेल्या प्रथांमध्ये आरोग्याला अपाय (अति कॅलरीज) वगैरे नसतील तर वडिलधाऱ्यांनी प्रेमाने बनवलेले पदार्थ जरूर सेवन करावेत. त्यामुळे बाळाच्या या सुंदर काळात वडिलधाऱ्यांच्या प्रेमाची भर पडेल.
डॉ. पद्मजा सामंत – response.lokprabha@expressindia.com