नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आईचे दूध हेच पूर्ण अन्न असते. त्याचे महत्त्व ठसवण्यासाठी दर वर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा स्तनपान जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

महाभारतातल्या कर्णाच्या कवचकुंडलांची गोष्ट न ऐकलेली व्यक्ती विरळाच असेल. दानशूर कर्णाने कावेबाज इंद्राला कवचकुंडले देऊन टाकली आणि लढाईत अजिंक्य, अमर्त्य कर्ण धारातीर्थी पडला. आरोग्याच्या बाबतीत अशी अमूल्य कवचकुंडले आई स्तनपानातून आपल्या बाळाला देते. जगभरातील बालमृत्यूंच्या लढय़ातील एक अत्यंत प्रभावी अस्त्र म्हणजे स्तनपान! त्याबद्दल वैद्यकीयजगतात शास्त्रीय माहिती, जबाबदारीची जाणीव आणि समाजात माहिती आणि जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा ‘जागतिक स्तनपानविषयक जागृती सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
The maternal uncle of a young man whom a girl had married and his son was hit by a jeep while riding a bike
मुलीने प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या नात्यातील भावाला जीपखाली चिरडले

एक वर्षांखालील बालमृत्यूंची महत्त्वाची कारणे – प्रसूतीकालीन गुंतागुंती, प्रीमॅच्युअर प्रसूती, कुपोषण, न्यूमोनिया, अतिसार यांसारखे इन्फेक्शन्स, संसर्गजन्य रोग इत्यादी आहेत. कुपोषणावरून आठवले, रोजच्या लोकल ट्रेनच्या प्रवासात आकडे, पिना, इ. विकणारी एक दाक्षिणात्य स्त्री रोज आपल्या काही महिन्यांच्या बाळाला खांद्यावरच्या झोळीत बांधून येत असे.  ते बाळ छान गुटगुटीत, गोंडस आणि आनंदी होते. कधी कधी ती बाळाला पाजत पाजतच आपले काम करीत असे. त्या गरीब आईचा आहार कसा असेल याची आपण सहज कल्पना करू शकतो; पण नियमित स्तनपानाने त्या बाळाचे आरोग्य उत्तम होते. काही महिन्यांनंतर जेव्हा आईचे दूध सुटले आणि मूल इतर आहार घेऊ लागले तेव्हा हळूहळू कुपोषणाची लक्षणे दिसू लागली.

२०१५ सालच्या जागतिक आकडेवारीप्रमाणे ५ वर्षांखालील बालमृत्यूंमध्ये ५०% मुले अतिसार (आतडय़ांची इन्फेक्शने) आणि न्यूमोनियामुळे दगावतात.

स्तनपानाने या आजारांना आळा घालायला मोठी मदत होते. यात नवल ते काय असे कोणी म्हणेल.

आईच्या दुधाची महती सर्वात जास्त आपल्या बॉलीवूडच्या निर्मात्यांना माहिती असावी. ‘माँ का दूध पिया है तो सामने आ!’’, ‘दूध का कर्ज’ वगैरे शब्द आपले हिरो लीलया फेकत असतात.

पण हल्लीच केलेल्या एका संशोधनात आढळून आले की स्तनपान कसे द्यावे, किती (फ्रिक्वेन्सी) तासांनी द्यावे, एक्सक्लुसिव्ह ब्रेस्टफीडिंग (निव्वळ स्तनपान) म्हणजे काय याबद्दल नवीन पिढीतील माता व त्यांच्या वडिलधाऱ्या महिलांपैकी २० ते ३४ टक्के महिलांनाच माहिती होती.

गरोदर असतानाच डॉक्टरांनी कुटुंबाशी त्यांच्या ‘स्तनपानाविषयक समजुती, अपेक्षा, तयारी’ याबद्दल चर्चा केली तर सकारात्मक पद्धतीने मातापिता बाळाच्या जन्मानंतर येणाऱ्या प्रश्न आणि आव्हानांना हाताळू शकतात. अनेक बाळंतपणे काढलेल्या आयामावश्यांना यात निश्चितच अतिशयोक्ती वाटेल. पण आजकाल कामानिमित्ताने कुटुंबापासून वेगळे राहणाऱ्या घरात कोणी मदतीला नसणाऱ्या तरुण मुलींची आव्हाने वेगळीच असतात. नव्याने करिअरची सुरुवात झालेली असते, महत्त्वाकांक्षा असतात, मॅटíनटी लीव्ह असली तरी करिअरची काळजी असते; वर्किंग फ्रॉम होम’ची तडजोड करत, एकाहाती पाळण्याची दोरी आणि एकाहाती लॅपटॉप अशी कसरत या मुली करतात. मला नवीन पिढीचे खूप कौतुक वाटते. मी संवाद साधलेल्या जवळजवळ सर्व माता स्तनपान द्यायला उत्सुक होत्या, अनेक जणींनी इंटरनेटवरून बरीच माहिती काढली होती, अगदी ब्रेस्टपंपपासून, मिल्क स्टोरेजपर्यंत सगळ्या प्रकारे तयारी केली होती. या तरुण पिढीला, कुटुंबाचे सहकार्य, समजूत आणि मानसिक आधार यांची गरज आहे. पतीही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असणे आवश्यक आहे. त्यासाठी स्तनपान, निव्वळ स्तनपानपूरक आहार इत्यादी माहिती पती, दोन्हीकडचे कुटुंबसदस्य यांना असली पाहिजे.

येथे ‘ब्रेस्ट क्रॉल’ नावाच्या एक फिल्मचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. काही मिनिटांपूर्वी जन्मलेले बाळ, आईच्या पोटावर ठेवताच काही मिनिटांत कसे स्तनांपर्यंत पोहोचते आणि दूध प्यायला प्रयत्न करते हे पाहून अचंबा वाटतो. सर्वानी उत्सुकता म्हणून तरी ही फिल्म पाहावी.

कुटुंबातली वडीलधारी मंडळी अनेक प्रथा पाळतात. बाळाला जन्मत: चाटण चाटवणे, जन्मगुटी देणे हे बरेच जण करतात; मध, साखर घालून दूध, बाळकडू, ग्राइप वॉटर देतात. उन्हाळ्यात बाळाला पाणी कमी पडते म्हणून पाणीही देतात. वास्तविक बाळाला यापैकी कशाचीही गरज नसते. आईच्या दुधातून आवश्यक तेवढे पाणी, कॅलरीज, साखर इत्यादी बाळाला पूरक प्रमाणात मिळतात. अनेक माता व कुटुंबीय यांना कॉलॉस्ट्रम (चिकाचे दूध) बद्दल माहिती नसते. कोलॉस्ट्रम म्हणजे प्रसूतीनंतर स्तनाग्रांतून जे पिवळसर रंगाचे घट्ट थेंब निघतात ते! मी ज्या कवचकुंडलांचा उल्लेख केला ते हेच! बाळासाठी अत्यावश्यक अशी रोगप्रतिकारक तत्त्वे यात असतात. पहिले काही तास दुधाचे प्रमाण कमीच असते त्यामुळे बाळ उपाशी राहील असे वाटते; पण ही काळजी असू नये. थोडेसे असले तरीही तेवढेच दूध बाळाला पुरे पडते. थोडेसे वजन घटतेसुद्धा! पण दोन आठवडय़ांपर्यंत घटलेले वजन पुन्हा भरून निघते.

बऱ्याचदा प्रसूतीनंतर किंवा सिझेरियननंतर आई थकलेली असेल; तिला आरामाची गरज आहे. असे आज्यांना वाटते. मग त्या बाळाला वरचे दूध देण्यासाठी आग्रह धरतात. प्रसूतीनंतर लागलीच बाळ जागे आणि अ‍ॅलर्ट असते. तेव्हा छातीवर धरले तर बाळ व्यवस्थित लॅच करते (स्तनाग्र तोंडात घेते). एकदा वरच्या दुधाने पोट भरले की बाळ सुस्तावते, प्रयत्न न करता दूध तोंडात येते आहे असे कळले तर ते दूध ओढायचा, लॅच करायचा प्रयत्न करत नाही. मग पित नाही म्हणून वरचे दूध अधिक दिले जाते. अशा पद्धतीने हे चक्र चालू होते. क्वचित प्रसंगी वरचे दूध द्यावेच लागले तर ते बाटलीने न देता, वाटी चमच्याने देणे बरे! निदान त्यात नीट र्निजतुकीकरण न झाल्याने इन्फेक्शन होण्याची शक्यता तरी नसते. बाटलीने सुरुवात केल्यास निपल कन्फ्युजन (बाळाचा दोन प्रकारच्या निपल्समुळे होणारा गोंधळ) होण्याची शक्यता असते. आईच्या स्तनाग्रातून दूध ओढण्यासाठी तोंड, टाळूच्या स्नायूंना खूप जोर करावा लागतो. उघडय़ा छिद्रांच्या बाटलीच्या निपल्समध्ये हा प्रश्न येत नाही व दूध सहजतेने तोंडात येते. मग परत स्तनांवर लावल्यास बाळ सहज दूध खेचू शकत नाही.

दूध देण्याची फ्रिक्वेन्सी किती असावी हा एक सामान्य आणि परत परत विचारला जाणारा प्रश्न आहे. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा वाक्प्रचार बाळांनाही लागू होतो. प्रत्येक बाळाच्या शेडय़ुलची आईलाही सवय व्हावी लागते. त्यामुळे डॉक्टर असे सांगतात की ‘ऑन डिमांड’ (मागणीनुसार) फीडिंग करा. बाळ झोपेतून उठले, थोडे हलू लागले, आता रडणार असे वाटले की सराईत आई बाळाच्या ओठांच्या कडेला बोट लावून बघते. बाळ बोट चोखायला वळले की समजावे त्याला/ तिला भूक लागली आहे. अशा पद्धतीने हळूहळू आईला बाळाच्या दिनचर्येची सवय होते. काही माता छातीचा आकार मोठा नाही, दूध पुरेल का? अशी काळजी करतात. छातीचा आकार स्तनांच्या ग्रंथींच्या आजूबाजूस असलेल्या चरबीने ठरतो. ग्रंथींचे कार्य चरबीवर अवलंबून नसावे. बहुतांशी सर्व माता एकच काय जुळ्या बाळांनासुद्धा पुरेसे एवढे दूध निर्माण करू शकतात. या आश्वासनावर आपण हा भाग संपवू.

आई व बाळांच्या विशेष गरजा आपण पुढच्या भागात पाहू!
डॉ. पद्मजा सामंत – response.lokprabha@expressindia.com