डॉ. मानसी राजाध्यक्ष – manasi.milind@gmail.com  

आपल्या आहारातल्या बऱ्याच पदार्थात कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ‘गोडवा’ असतो. मग आपल्यासमोर अनेक शंका उभ्या राहतात. अरे! या पदार्थामध्ये गोडवा आहे म्हणजे ‘साखर’ असेल का? आणि साखर तर म्हणे आपल्या प्रकृतीसाठी चांगली नाही. ‘साखरे’विषयीच्या अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चामुळे हल्ली आपल्यापैकी अनेक जणांच्या मनात ‘साखरे’विषयी प्रेम आणि भीती अशा द्वंद्वभावना निर्माण झाल्या आहेत. चवीला गोड असलेली ‘साखर’, खरंच आपल्या प्रकृतीसाठी ‘कटू’ आहे का?

how to To Stay Cool in summer
Heatwave Precautions : उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स….
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Yukta Biyani nanded girl youngest pilot
नांदेडच्या युक्ताची गरुडझेप; देशातील सर्वात तरूण वैमानिकाचा मिळवला मान
Should diabetics have an evening snack
मधुमेहींनी संध्याकाळचा नाश्ता करावा की नाही? तज्ज्ञांचा सल्ला नक्की वाचा…

सर्वात पहिल्यांदा आपण ‘साखरे’बद्दल थोडी शास्त्रीय माहिती घेऊ या. जेणेकरून आपल्याला तिची ‘निर्थक’ भीती वाटणार नाही आणि मग आपल्याला साखर खाऊ या की नको, आणि खाल्ली तरी ती किती प्रमाणात, याविषयीचा निर्णय ‘जाणतेपणी’ घेता येईल.

मुळात आपण घरात वापरतो ती ‘साखर’ ही ‘शर्करे’च्या अनेक रूपांपैकी एक रूप आहे! शर्करेचे अनेक प्रकार किंवा रूपं आहेत. प्रत्येक शर्करेला ‘गोडवा’ असला तरी त्यातही थोडा थोडा फरक आहे. कारण प्रत्येक शर्करेचं स्वरूप आणि गुणधर्म थोडेफार निराळे आहेत. आणि एखाद्या पदार्थात ज्या प्रकारची शर्करा असते त्याप्रमाणे त्याचा ‘गोडवा’ वेगळा असतो. खरं म्हणजे शर्करेचा, पदार्थाला ‘गोडवा’ बहाल करणं, एवढा एकच गुणधर्म नाही. शर्करेमुळे पदार्थ टिकतात. मोरंबा, मोरावळा, जाम, जेली, केक्स, कुकीज असे पदार्थ दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यात शर्करेचा मुबलक वापर होतो. शर्करेमुळेच केक्ससारख्या पदार्थाना मुलायम आणि दमट असं स्वरूप प्राप्त व्हायला मदत होते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘शर्करा’ आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं काम करते. आपल्या शारीरिक ऊर्जेसाठी आपल्या आहारात ‘शर्करेचा’ समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे, असं अनेक तज्ज्ञांनी संशोधनांती सिद्ध केलं आहे. फक्त कोणत्या प्रकारची शर्करा आपल्या शरीरात नेमका कोणता परिणाम करते, एवढं समजून घ्यायला हवं.

शर्करेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवनसत्त्वं नाहीत, ना कोणतेही क्षार किंवा ना तो तंतुमय पदार्थ! शर्करा म्हणजे फक्त कॅलरीज! निव्वळ ऊर्जा!! आपण जेवढी शर्करा आपल्या आहारातून घेतो, तेवढय़ा ऊर्जेचा जर वापर झाला नाही तर ही शर्करा आपल्या शरीरात मेदाच्या स्वरूपात साठवली जाते. आणि असा मेद अधिक प्रमाणात झाला तर त्याचे दुष्परिणाम होऊ  शकतात. म्हणूनच शरीराला ऊर्जेसाठी अतिशय आवश्यक असलेली शर्करा आपल्या आहारात जरूर असावी आणि ती आपल्या दैनंदिन वापराच्या प्रमाणानुसारच खावी! अर्थात एखाद्या आजारानुसार तज्ज्ञांनी ‘शर्करा’ न खाण्याचा सल्ला दिला असेल तर तो मात्र जरूर पाळावा.

chaturang@expressindia.com