आजच्या व्यग्र जीवनात बरीचशी कामं ही दूरध्वनीवरून किंवा समाजमाध्यमांद्वारे केली जातात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून लहानातल्या लहान व्यावसायिकांपासून ते अगदी मोठय़ा उद्योजकांपर्यंत कुणीही उत्तम प्रकारे व्यवसाय करू शकतो. जाहिरात करण्यापासून आपल्या उत्पादनाची खरेदी-विक्रीसुद्धा सहजपणे एकाच जागी बसून करणं आता शक्य झालं आहे. त्यामुळे खरं तर प्रत्येक उद्योजकाने या माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. त्यासाठी ही समाजमाध्यमं कोणती, त्याचं काम कसं चालतं याचा जाणीवपूर्वक अभ्यास करणं आवश्यक आहे.

आताचं तंत्रज्ञान इतकं विकसित झालं आहे की समाज माध्यमांचा वापर करण्यासाठी संगणकाचीसुद्धा गरज पडत नाही. व्यक्तिगत मोबाइलवरूनही त्याचा चांगला वापर करता येतो. आपल्या ओळखीच्या व्यक्तीपर्यंतच नव्हे तर अगदी अनोळखी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. व्यावसायिक फायद्यासाठी या माध्यमाचा उपयोग करताना तुमच्या व्यवसायासंदर्भात सतत पोस्ट टाकणं, नवीन ट्रेण्ड जाणून घेणं, मार्केटचा अंदाज घेणं हे सर्व अत्यंत आवश्यक असतं. तुमच्या कामाबद्दल इतरांना माहिती देण्याबरोबरच तुमच्या कामाबद्दल सतत बोललं पाहिजे त्यासाठी समाजमाध्यमावर सतत ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहणं गरजेचं आहे. स्वत:ला अपडेट ठेवा, ग्राहकांच्या ‘कमेंट’ला उत्तर द्या. संवाद साधा. तुमच्या उत्पादनाबद्दल प्रतिक्रिया मागवा. तुमचा व्यवसाय लोकल ते ग्लोबल स्तरावर पोहचवण्यासाठी हे एक शक्तिशाली साधन ठरू शकेल.

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
deep learning definition
कुतूहल : डीप लर्निग – सखोल शिक्षण म्हणजे काय?
Job Opportunity Recruitment of License Inspector Posts
नोकरीची संधी: अनुज्ञापन निरीक्षकपदांची भरती

समाजमाध्यमांचा सगळ्यात चांगला फायदा म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीशी होणारा थेट संपर्क वा संवाद. थेट संवादाचा फायदा आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांतील ज्ञान वाढवण्यापासून व्यवसायवृद्धीपर्यंत होऊ  शकतो. उत्तम दर्जाचे उत्पादन असूनही अनेक स्थानिक व्यावसायिकांना ठरावीक कक्षेपलीकडे आपला व्यवसाय वाढवता येत नाही. विक्री, जनसंपर्क आणि जाहिरात करण्यात यश मिळत नाही, याचं कारण डिजिटल मार्केटिंगसाठी समाजमाध्यमांचा वापर कसा करायचा याचं अपुरे ज्ञान. त्यासाठी फार काही करायची गरज नसते. तुम्ही एकदा ही सगळी प्रक्रिया नीट समजून घेतली. कशा पद्धतीने समाजमाध्यम काम करतं हे जाणून घेतलं आणि सतत अ‍ॅक्टिव्ह राहिलात तर तुम्ही लवकरच यात पारंगत होऊ शकता.

अलीकडे बहुतांशी घरात स्मार्टफोन दिसतो. ते लोक जर समाजमाध्यमांचा वापर करीत असतील तर आपल्या उत्पादनाचे वैशिष्टय़ माहितीच्या स्वरूपात त्यावर टाकल्यास त्याविषयी कुतूहल, आकर्षण निर्माण करता येऊ  शकतं. या ठिकाणी ग्राहकांना आपलं मत मांडण्यासाठी वाव असतो. संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, ८१ टक्के ग्राहक एखादं उत्पादन खरेदी करण्यापूर्वी इंटरनेटवर त्याची विस्तृत माहिती बघतात. जगातील ६० टक्के लोक थेट त्यांच्या वेबसाइटवर न जाता सर्च इंजिनचा वापर करतात. तुलना करतात. जगातील ७९ टक्के ग्राहकांना विश्वास आहे की, यामुळे माहिती अचूक मिळते व फसवणूक टळते. तसंही सध्या समाजमाध्यमाचा वापर करणाऱ्या व्यक्ती शहरात तरी बहुसंख्य आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वेबसाइट तयार केली नसली तरी ऑनलाइन हजेरी लावू शकता, म्हणजे तुमच्या व्यवसायाची, उत्पादनाची माहिती लोक इंटरनेटद्वारेसुद्धा घेऊ  शकतात. तुम्ही यावर तुमचा संपर्क क्रमांक, पत्ता, ईमेल आयडी देऊ  शकता. फेसबुक, गुगल यांच्या सुविधाही विकत घेता येतात.

सध्या आबालवृद्धांमध्ये प्रसिद्ध असलेले व्हॉट्सअ‍ॅप हे व्यवसायासाठी प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे एक अब्ज ग्राहक असल्याचं सांगितलं जातं. या माध्यमातून केलेल्या प्रमोशनचे फायदे खूप आहेत. त्यावर आपल्या व्यवसायाचं माहितीपत्रक किंवा छोटे व्हिडीओ टाकता येतात. ते तत्काळ लोकांकडे, ग्राहकांकडे पाठवता येतात. पाठवण्याचा कोणताही खर्च येत नाही. ग्राहकाला उत्पादन पसंत पडल्यास, प्रॉडक्ट सव्‍‌र्हिस किंवा कंपनीविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण फोन करू शकतो. आपल्या उत्पादनाची ऑनलाइन तत्काळ विक्रीही होऊ  शकते.

फेसबुक – याचं नेटवर्क वापरताना लोकांच्या आवडीचा भाग ओळखून तुमच्या पेजच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाइक्स, शेअर मिळतील अशी दर्जेदार माहिती पोस्ट करा. यात आपण आपल्या व्यवसाय नावाचं वॉटरमार्क टाकून आपल्या कंपनीचा प्रचार-प्रसार करू शकता. कॉल नाऊ  या बटणाचा वापर करता येतो. त्याचा थेट उपयोग तुमच्या व्यवसायाला होऊ शकतो. फेसबुक जाहिराती स्थानिकांपर्यंत पोहचविण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.

आपल्याला जर प्रतिसाद हवा असेल तर स्वत:च्या अकाउंटची लिंक त्या पोस्टमध्ये समाविष्ट करावी. लोकांना ती आवडल्यास ते आपल्या पेजला फॉलो करण्यास सुरुवात करतात. प्रत्येकाची आवड बघून त्यातही ग्रुप केले जातात. त्याचा अंदाज घेऊन त्यात आपण सहभागी होऊन आपल्या उत्पादनाविषयी व कंपनीविषयी माहिती द्यावी. लोकांकडून आलेल्या आपल्या व्यवसायाविषयी किंवा उत्पादनाविषयीचे सकारात्मक अभिप्राय शेअर नक्की करावेत. याचा फायदा असा होतो की, आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचतो आणि तुमच्याविषयी लोकांमध्ये विश्वास तयार होतो. सोशल नेटवर्क साइट निवडताना आपले ग्राहक कोणत्या सोशल नेटवìकग साइटवर सक्रिय आहेत ते बघावं आणि त्या साइटवर आपली माहिती प्रसारित करण्याचं ठरवावं. सध्याचं फेसबुक प्रचलित प्रोमोट हे फीचर यासाठी उपयुक्त ठरतं.

लिंक्डिन – जगातलं सगळ्यात मोठे प्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणजे लिंक्डिन. दर सेकंदाला दोन नवीन प्रोफाइल या सोशल नेटवर्कमध्ये समाविष्ट होत असतात. कोणत्याही व्यवसायाचं मुख्य काम असतं ते नवीन ग्राहक मिळवणं. त्यासाठी वर्षांनुवर्षे वापरात असलेल्याला फोन करणं, ईमेल करणं ही माध्यमं आता फारशी परिणामकारक राहिलेली नाही, म्हणून ‘लिंक्डिन’वर आपली माहिती पोस्ट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी याचा वापर करणं गरजेचं आहे.

इन्स्टाग्राम -नवीन पिढीला आपल्या व्यवसायाकडे जास्तीत जास्त आकर्षित करायचं असेल किंवा आपलं प्रॉडक्ट त्याच्यापर्यंत पोहचवायचं असेल तर इन्स्टाग्राम हा आणखी एक पर्याय आहे. फेसबुक इतकाच हा प्रभावी दुवा आहे.

ट्विटर – या माध्यमाचा वापर व्यवसायासाठी कसा करता येतो हे समजून घ्या. आपली वेबसाइट जर प्रोफाइलमध्ये सहभागी केलीत तर तुमच्या उपयोगी गोष्टी ट्वीट करा. ‘ग्राहकांना ऐका’ अशी व्यवसायातील एक म्हण आहे. तुम्हाला ग्राहकांच्या अपेक्षा ट्विटरच्या माध्यमातून कळतील. समाजमाध्यमावर व्यवसाय नोंद करताना योग्य कीवर्डचा वापर करा. कारण ग्राहकांना/ व्यावसायिकांना, व्यवसाय शोधणाऱ्यांना याचा फायदा होतो. तुमचे ग्राहक निश्चित करून त्याच्या दृष्टीने जाहिरात करा. ईमेल, जाहिरातीचे फायदे, कमी खर्च, ग्राहकाला शोधणं सोपं, इतरांना सहभागी करणं यातून सोपं पडतं.

ब्लॉक लिहिणं हे आणखी एक प्रभावी माध्यम आहे. ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या सेवेविषयी किंवा वस्तूविषयी माहिती देऊ शकता. अगदी विस्तृत माहिती लिहू शकता. ई-कॉमर्ससारख्या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या उद्योगाची जाहिरात करू शकता. ग्राहक कोणत्याही व्यवसायाचा शोध हा सर्चइंजिन- गुगल, याहू, ब्रिंगच्या माध्यमातून घेतात. तुम्ही योग्य प्रकारे माहिती व व्यावसायिक शब्दांचा वापर केल्यास तुमच्या वेबसाइट किंवा वेबपेजचा फक्त शोधच घेणं सोपं होणार नाही तर याचा वापरही वाढेल व सर्व प्रकारच्या जाहिरातीपेक्षा सीईओ खूप स्वस्त कायमस्वरूपी व दीर्घकाळ परिणाम देणारं माध्यम आहे. तुमच्या व्यवसायाचं ऑनलाइन अस्तित्व वाढविण्यासाठी आणि व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन बिझनेस डिरेक्टिरीमध्ये तुमच्या व्यवसायासंबंधी नोंद करू शकता. जेवढय़ा जास्त ठिकाणी तुमच्या व्यवसायाची नोंद असेल तेवढा जास्त तुमचा व्यवसाय लोकांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे. समाजमाध्यमं हा व्यवसाय वृद्धीचा महत्त्वाचं साधन ठरत आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर कसा करून घेता येईल, यावर तुमच्या व्यवसायाचे यशही ठरू शकते.

नेहा खरे

neha18.mirror@gmail.com