संधी ओळखणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे उद्योजकाकडे असणारं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे. स्वत:चा व्यवसाय निवडताना संधीचा सातत्याने मागोवा घेतला पाहिजे. बाजारपेठेत कशाची गरज आहे, ही गरज किती प्रमाणात आहे, आपल्या उत्पादनाचे ग्राहक किती असू शकतात आदी. व्यवसायाचा शोध ही उद्योजिकेची पहिली गरज आहे. त्याविषयी.

बदलत्या काळाची आणि त्यातल्या बदलत्या स्त्रीची व्यवसाय ही एक गरज आहे; पण त्यासाठी आजही अनेक स्त्रियांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. मानसिकता बदलणं म्हणजे काय? तर पारंपरिक विचारसरणीला छेद देऊन काळानुसार स्वत:मध्ये बदल करणं. यात यशस्वी होण्यासाठी उद्योजकतेच्या धाडसाबरोबरच बांधिलकी, त्याग आणि कल्पकता यांची जोड असायला हवी. ‘त्याग’ स्त्रियांमध्ये मूलत:च असलेला गुण मानला जातो. याबरोबरच एखाद्या व्यवसायाची सुरुवात करण्याआधीच किंवा तो निवडताना आपले शिक्षण, आपली आवड, आपल्यात असलेले कौशल्य याचा विचार करणे गरजेचे आहे. जर ते नसेल तर ते शिकण्याची जिद्द किती आहे, आपल्याकडे उपलब्ध असलेले भांडवल, रोजगारनिर्मिती करण्यासाठीच्या आजूबाजूला असणाऱ्या संधी यांचा अभ्यास करणे ही उद्योजकतेची मुख्य पायरी आहे.

readers reaction on loksatta editorial
लोकमानस : सत्तेच्या राजकारणात व्यवसायाचे नुकसान
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

संधी ओळखणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे उद्योजकाकडे असणारं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे. यासाठी उद्योजकाला एक वेगळाच दृष्टिकोन असावा लागतो. तो आपल्याला स्वत:मध्ये आणावा लागतो. तसेच स्वत:चा व्यवसाय निवडताना संधीचा सातत्याने मागोवा घेतला पाहिजे. यात आपल्याला कुठल्या व्यवसायाच्या संधी आहेत हे कसे शोधायचे यासाठी आपण काही मुद्दे विचारात घेतले पाहिजेत याचा विचार करायला हवा. जसे की, बाजारपेठेत कशाची गरज आहे, ही गरज किती प्रमाणात आहे, आपल्या उत्पादनाचे ग्राहक किती असू शकतात आदी. ग्राहकांना केंद्रिबदू मानूनच  आपल्या उत्पादनाची योजना आखावी लागते.

व्यवसायात आíथक यश म्हणजेच नफा हा मिळायलाच हवा. आपण ज्या क्षेत्रात व्यवसाय करणार आहोत त्यात आíथक यश मिळवण्यासाठी योग्य टक्केवारीत नफा मिळणे शक्य आहे का? आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती नफा मिळेल याचा विचार व्यवसाय निवडताना करावा लागतो, कारण त्या व्यवसायाची व्याप्ती आधीपासूनच उद्योजकाकडे माहीत असायला हवी. आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा, अनुभवाचा आपल्या व्यवसायात तग धरून राहण्यास मदत होते. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळी कौशल्ये आवश्यक असतात. हॉटेल, रिअल इस्टेट, आय.टी. अशा मोठय़ा क्षेत्रात उद्योग सुरू करायचा असेल तर त्याप्रमाणे स्वत:चा कौशल्यविकास करून घेणे आवश्यक आहे. या सगळ्यासाठी लागते ते म्हणजे भांडवल.

व्यवसायासाठी भांडवल उभं करणं सोपं आहे, पण व्यवसाय चालवताना लागणारं खेळतं भांडवल लक्षात घेऊनच आíथक व्यवस्थापन करायला हवे. ज्यांना छोटय़ा स्वरूपात सुरुवातीला उद्योग सुरू करायचा आहे त्या स्त्रियांसाठी कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत, याचा विचार आपण करू या.

ज्या स्त्रियांना घरातूनच व्यवसाय करायची इच्छा आहे त्या घरच्या घरी किंवा लहान जागेत कमीत कमी भांडवलावर डबे पुरवणे, केटिरग चालवणे असे व्यवसाय करू शकतात. त्यासाठी मात्र तुमच्याकडे ‘फूड आणि ड्रग्ज’चे परवाने असणं आवश्यक आहे. ते ऑनलाइनदेखील उपलब्ध आहेत. आपल्याला दैनंदिन जीवनातदेखील अनेक छोटय़ा पण काही महत्त्वाच्या गोष्टींची गरज भासत असते. जसे की इलेक्ट्रिशियन, प्लंबर, पेंटर, कार्पेटर अशा घरगुती सेवा देणे याकडेदेखील चांगला पर्याय म्हणून स्त्रिया बघू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तूंचे पॅकिंग करणे हादेखील उत्तम व्यवसाय आहे. सध्या जगभरातल्या नातेवाईकांसाठी व्यवस्थित पॅकिंग करून भेटवस्तू पाठवण्याच्या व्यवसायाची खूप चलती आहे.

वेगवेगळ्या उद्योगांना वेगवेगळी उपकरणे लागतात. प्रत्येक उत्पादकाला नट्स, स्क्रू-ड्रायव्हर, हातमोजे, हेल्मेट अशा छोटय़ा वस्तूंपासून मोठय़ा यंत्रांपर्यंत अनेक अनेक वस्तूंची गरज भासत असते. जेवढी कंपनी मोठी त्याप्रमाणे त्याची गरजही मोठी असते. जर आपण जाऊन उत्पादकांना भेटलो, ओळखी वाढविल्या, तर तेवढाच आपला व्यवसाय वृद्धीस जाण्यास मदत होते.

ग्राहक सेवा देणे म्हणजे लोकांना छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी सेवा हवी असते त्यासाठी घरच्या घरी, छोटेखानी, घरच्यांच्या वेळा सांभाळून सेवा केंद्रे उभारली तर स्त्रिया ते उत्तम प्रकारे चालवू शकतात. अनेक लोकांना ऑफिससाठी जागा, गाळे हवे असतात. जर आपल्याला आपल्या भागातील संपूर्ण माहिती असेल, आपली फिरण्याची तयारी असेल, तर या पर्यायाचादेखील स्त्रिया विचार करू शकतात. यासाठी बोलण्याचे चातुर्य असणे महत्त्वाचे आहे, जे स्त्रियांकडे असतेच आणि नसेल तर ते शिकण्याची त्यांची तयारी असणे गरजेचे आहे. ‘पाण्यात पडलं की पोहता येतंच’ या उक्तीप्रमाणे व्यवसायाचा विचार करायला हरकत नाही.

आपण स्त्रिया घर चालवताना, कुटुंब सांभाळताना आपोआपच व्यवस्थापन करत असतो. व्यवस्थापनाचे हे कौशल्य आपण व्यवसायातही उपयोगात आणू शकतो. मनुष्यबळ सल्लागार, व्यवस्थापन सल्लागार, मार्केटिंग सल्लागार, आíथक सल्लागार, संवाद सल्लागार अशा विविध माध्यमांतून आपण व्यवसायनिर्मिती आणि रोजगारनिर्मिती करू शकतो. यामध्ये कौशल्य व ज्ञान हेच सर्वात मोठे भांडवल आहे. स्वत:च स्वत:चा बॉस होण्यासाठी उद्योग सुरू करणं आणि तो पुढे वाढवणं आवश्यक आहे. त्यासाठी स्वत:मधल्या स्वत:ला शोधणं गरजेचं आहे. तुम्ही स्वत: कोण आहात? तुमच्यातले सकारात्मक आणि नकारात्मक गुण कोणते? तुम्ही स्वत:ला भविष्यात कुठल्या स्थानी बघता आहात, हा खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर आधीच विचार करायला हवा.

तुम्ही स्वत:चे शिकवणी क्लासेस सुरू करू शकता. कालांतराने त्याच्या शाखा काढून इतर स्त्रियांना रोजगारासाठी संधी उपलब्ध करून देऊ शकता. प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाचे क्लासेस, कॉम्प्युटरचे क्लासेस, परकीय भाषेचे क्लासेस असे इतर वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस तुम्ही घेऊ शकता. याशिवाय छोटे किराणा दुकान, भाजीपाला व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, घरगुती खाण्याचे पारंपरिक पदार्थ बनवून विकणे, कपडय़ांचा व्यवसाय, विविध प्रकारच्या बॅग बनवण्याचा व्यवसाय, त्यात छोटय़ामोठय़ा आकारांतील कापडी पर्स, पेपरच्या बॅग्ज बनवता येतील.

काही व्यवसाय असे असतात की, त्यांचे प्रशिक्षण घेऊन छोटय़ा जागेत मशीन घेऊन व्यवसाय सुरू करू शकतो. यामध्ये द्राक्षांपासून मनुका तयार करणे, कचऱ्यापासून खत तयार करून विकणे, बगिचा सांभाळणे, भाज्यांचे पॅकिंग करून तो सुपर मॉलला पुरविणे, मेंदीचे कोन पुरविणे, पी.व्ही.सी. केबलचा व्यवसाय, आटा चक्की चालवणे, खडू उत्पादन, रबर स्टॅम्प बनवणे, वेगवेगळी पिठे तयार करून विकणे, मिनी कॉल सेंटर चालवणे, धोबी सेवा, सोलर सिस्टम, ब्युटीपार्लर चालवणे, छोटय़ा डाळ मिल चालवणे, बेकरी प्रॉडक्ट्स बनवून विकणे अशा विविध व्यवसायांचा विचार करून तो प्रत्यक्षात आणू शकतो. व्यवसाय शोधून, त्यात उतरून, स्वत:ला सिद्ध करूनच आपण ‘स्वयंसिद्धा’ होऊ शकतो. या प्रवासात आपला आत्मविश्वास, क्षमता आणि परिश्रम करण्याची तयारी यात आपसूकच वाढ होण्यास मदत होते. आपण विक्री करण्यात माहीर होतो, पशाचं महत्त्व कळतं त्याचबरोबर स्वत: कमावलेल्या पशाचं मोल आपल्याला अधिक कळतं. स्वत:चं भविष्य स्वत: घडवण्यासाठी केलेला प्रयत्न आपल्याला खूप पुढे घेऊन जातो. आíथक स्वातंत्र्य असल्याने आपली निर्णय क्षमता वाढते. तो निर्णय अमलात आणल्यावर आपण यशस्वी होतो आणि आपल्याला मिळालेल्या यशाची मजा काही औरच असते. यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी धडपड, ध्येयनिश्चिती, नशिबावर अवलंबून न राहता संधी शोधून त्याचं सोनं करून, आपल्यातील भीतीवर मात करून काम सुरू केले तर यशाची वाट आपोआपच तयार होते. व्यवसाय कोणताही असो, त्यात सर्जनशीलता महत्त्वाचीच आहे. काय वेगळं करू शकतो याचा सतत विचार करावा लागतो. तरच तुम्ही गर्दीतले एक न होता तुमची वेगळी वाट तयार करू शकता.

नेहा खरे neha18.mirror@gmail.com