06 August 2020

News Flash

ऑस्ट्रेलियाचा आर्यलडवर विजय

एलियास पेरीने २९ धावा करत व्हिलानीला चांगली साथ दिली.

दिमाखदार सांघिक कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषकात आर्यलडवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत आगेकूच करण्यासाठी आपली बाजू भक्कम केली आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आर्यलडला केवळ ९१ धावांतच रोखत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला. किम गॅरथने सर्वाधिक २७ धावा केल्या. मेगन शूटने सर्वाधिक ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एलियास व्हिलानीच्या ४३ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठले. एलियास पेरीने २९ धावा करत व्हिलानीला चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

आर्यलड : २० षटकांत ७ बाद ९१ (किम गॅरथ २७, सेसेलिआ जॉयस २३, क्लेर शिलिंग्टन २२, मेगन शूट ३/२९) पराभूत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : १३.२ षटकांत ३ बाद ९२ (एलियास व्हिलानी ४३, एलियास पेरी २९, किम गॅरथ २/२४)

सामनावीर : मेगन शूट

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2016 5:13 am

Web Title: %ef%bb%bfaustralia beats ireland women t20 world cup
टॅग Australia
Next Stories
1 न्यूझीलंडच्या महिलाही उपांत्य फेरीत दाखल
2 अपराजित्व राखण्यासाठी वेस्ट इंडिज उत्सुक
3 तास्किनचे निलंबन हा आमच्यावर अन्याय!
Just Now!
X