टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाच्या ईडन गार्डनवर पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा करण्यात आला. कोलकातापासून दिल्लीपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात विजय साजरा झाला. पण पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या आनंदोत्सवात मात्र धोनीच्या मुलीची झोप मोड झाली.
टीम इंडियाचा विजयानंतर धोनीच्या घराबाहेरही क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. मात्र यामुळे धोनीच्या लेकीची झोप मोड झाली. धोनीची पत्नी साक्षीने टि्वटरवरुन ही माहिती दिली. माझ्या घराबाहेर गाडयांचे हॉर्न वाजवले जातायत, फटाके फोडले जातायत, घोषणा सुरु आहेत. तुम्ही सगळे मिळून माझ्या मुलीला झोपेतून उठवणार आहात असे टि्वट साक्षीने केले. साक्षीनेही टीम इंडियाला टि्वटरवरुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.