17 October 2019

News Flash

अनुष्कामुळे विराट चांगला क्रिकेटपटू होऊ शकला- सुनील गावस्कर

अनुष्का खूप चांगली मुलगी आहे आणि ते दोघंही एकत्र खूप सुंदर दिसतात.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली (संग्रहित छायाचित्र)

भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीच्या मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीवरून त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला लक्ष्य करणाऱया नेटिझन्सवर भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केली. ( Full Coverage || Fixtures || Photos )
कोहलीच्या सातत्यपूर्ण खेळीचा त्याच्या खाजगी आयुष्याशी संबंध जोडणे हे खरंच तापदायक आहे. मला त्यांच्या नात्याबद्दलची सद्य परिस्थितीची कल्पना नाही. पण अनुष्का खूप चांगली मुलगी आहे आणि ते दोघंही एकत्र खूप सुंदर दिसतात. भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ म्हणून विराटची कारकीर्द घडत असताना त्याच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण होणे आवश्यक होते आणि ते अनुष्काच्या सहवासामुळे शक्य झाले, हे मी ठामपणे सांगू शकेन. त्यामुळे विराटला एक उत्तम क्रिकेटपटू होण्यामागे अनुष्काचे देखील योगदान आहे, असे सुनील गावस्कर म्हणाले.

अनुष्का आणि विराटच्या प्रेमप्रकरणाची चर्चा असताना विराटची मैदानातील कामगिरी समाधानकारक नव्हती, पण दोघांच्या ब्रेक-अपच्या चर्चेनंतर विराट सध्या खेळपट्टीवर प्रत्येक सामन्यात आपली सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश करत आहे. वास्तविक अनुष्कासोबतच्या ब्रेक-अपचा विराटच्या खेळीशी काडीमात्रही संबंध नव्हता. पण समाजमाध्यमांमध्ये अनुष्काला लक्ष्य करणाऱया विनोदांचा धुमाकूळ सुरू झाला. हे सारे समजल्यावर विराट नेटिझन्सवर बरसला. माझ्या खेळीवरून अनुष्काला लक्ष्य करणाऱयांची लाज वाटते, असे म्हणत विराटने आपल्या रोषाला वाट मोकळी करून दिली होती.

First Published on March 29, 2016 4:15 pm

Web Title: anushka sharma has helped virat kohli grow as a human being and as a cricketer says sunil gavaskar