News Flash

इंग्लंडचा निसटता विजय

आफगाणिस्तानचा डाव २० षटकांत १२७ धावांवर संपुष्टात आला अन् इंग्लंडने १५ धावांनी कसाबसा विजय मिळवला.

इंग्लंडचा निसटता विजय
इंग्लंड अडचणीत असताना मोईन आलीने ३३ चेंडूत ४१ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.

मोईन अलीने राखली इंग्लंडची लाज
एकीकडे बलाढय़ अनुभवी इंगलंड संघ, तर दुसरीकडे नवखा अफगाणिस्तान संघ. मात्र, अनुभव असूनही इंग्लंडला विजय मिळवण्यासाठी मोठी झूंज द्यावी लागली. मोईल आलीने उत्तम प्रदर्शन करत संघाची लाज राखली, तर अफगाणिस्तानचा खेळाडू शफिकउल्लाह शफकने विजय मिळव्यासाठी प्रयत्न केला. मात्र, मिळालेल्या १४२ धावांचे लक्ष्य गाठण्यास यश आले नाही. आफगाणिस्तानचा डाव २० षटकांत १२७ धावांवर संपुष्टात आला अन् इंग्लंडने १५ धावांनी कसाबसा विजय मिळवला.
‘अ’ गटातील साखळी सामन्यात बुधवारी दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकू न प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या जेसन रॉयचा अमीर हमजाने त्रिफळा घेत इंग्लंडला दुसऱ्याच षटकांत धक्का दिला. मात्र, सलामीवीर जेम्स विन्सने फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र, मोहम्मद नाबीने आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत जेम्स विन्सला २२ धावांवर थांबवण्यात यश मिळविले. ५ व्या षटकात ४२ धावांवर असलेल्या इंग्लंडची बाजू सांभाळण्यास बेन स्ट्रोकला यावे लागले. मोहम्मद नाबीच्या शेवटच्या चेंडूवर पाचव्या षटकाच्या धडाकेबाज फटकेबाजी करणारा ज्यो रूट अवघ्या १२ धावांवर धावबाद झाला. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉग्रेनला नाबीने पहिल्याच चेंडूवर झेल घेत तंबूत परतवले.
अशात अनुभवी इंग्लंडची नवख्या अफगाणिस्ताने केविलवाणी परिस्थिती केली. ७ व्या षटकापर्यंत इग्लंडला ४ गडीबाद ४९ धावांपर्यंत मजल मारता आली. आठव्या षटकात सुमिउल्ला शेनवारीने ६ धावांवर खेळत असलेल्या जोस बटलरची पारी संपुष्टात आणली. राशीद खाने ९ व्या षटकात बेन स्ट्रोकलाही परतवून लावले अन् इंग्लंडच्या फलंदाजांची फळी कोसळत गेली.
मोईन आली इंग्लंडच्या ढसळलेल्या इंग्लंडची बाजू सांभाळण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याला डेव्हिड विलेची साथ लाभली अन् दोघांनी ४.५ षटक खेळत तब्बल ५० धावांची भागीदारी करत संघाला १३५ धावांवर पोहचविले.
मात्र, १८ व्या षटकापर्यंत १०९ धावा काढण्यास इंग्लंडला कसेबसे यश आले. इंग्लंड अडचणीत असताना मोईन आलीने ३३ चेंडूत ४१ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. शेवटी २० षटकांत १४२ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानसमोर ठेवण्यात आले. प्रत्युत्तर देतांना अफगाणिस्तानचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद शहजाद हा पहिल्याच षटकात आपटला. डेव्हिड विलेने शाहजादला पायचित करत ४ धावांवर तंबूत परतवले, तर जॉर्डनने कर्णधार असगर स्टॅनिकझाईला १ धावावर ज्यो रुटने झेल घेत बाद केले.
जशी गत इंग्लंडची झाली होती तशीच काही परिस्थिती अफगाणिस्तानची झाली. एका पाठोपाठ गडी बाद होत गेले अन् १० व्या षटकांत ५ बाद ४५ धावा, अशी गत झाली. मात्र, शफिकउल्लाह शफकने उत्तम खेळी खेळत सामन्यात रंग भरला. मात्र, २० षटकांत अफगाणिस्तानला १२७ धावांवर समाधान मानावे लागले.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड २० षटकांत ७ बाद १४२ (मोईन अली नाबाद ४१, डेव्हिड विले नाबाद २० ; मोहम्मद नबी १७/२, राशीद खान १७/२) विजयी वि. अफगाणिस्तान (नूर अली झदरान १७, शफिकउल्लाह शफक ३५; डेव्हिड विले ४/२, आदील राशीद १८/२ )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2016 1:03 am

Web Title: england beat afghanistan by 15 runs
टॅग : Icc T20 World Cup
Next Stories
1 जिगरबाज अफगाण !
2 न्यूझीलंडची विजयी घोडदौड कायम
3 पडद्यावरच नव्हे तर शाहरूखची क्रिकेट मैदानावरही शाब्दिक फटकेबाजी
Just Now!
X