ट्वेन्टी २० विश्वचषकामध्ये भारताचे आव्हान जरी उपांत्य फेरीमध्ये संपुष्टात आले असले तरी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र मालिकावीराचा पुरस्कार जिंकलाय.
ट्वेन्टी २० वर्ल्डकपमधील पहिला सामना गमावल्यानंतर इतर सर्व सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात विराटचा मोलाचा वाटा होता.  विराटने पाच सामन्यांत १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने भारताला पाकिस्तान तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.  वेस्ट इंडिजविरुद्ध केलेली  ८९ धावांची खेळी ही त्याची विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी होती. त्याने न्युझीलँडविरुद्ध २३ धावा, पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५५ धावा, बांग्लादेशविरुद्ध २४ धावा तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ८२ धावा केल्या होत्या.
दरम्यान पुरस्कार सोहळ्याला विराट उपस्थित नसल्याने त्याच्यावतीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने हा पुरस्कार स्वीकारला.