26 May 2020

News Flash

Live Cricket Score, India vs Bangladesh, ICC World Twenty20 : चुरशीच्या लढाईत भारताची बांंगलादेशवर एका धावेने मात

उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीकोनातून बांगलादेशविरुद्धचा आजचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण

Live Cricket Score, India vs Bangladesh, ICC World Twenty20: India take on Bangladesh in Bangalore on Wednesday. (Source: AP)

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेन्टी-२० सामन्यात भारतानने अवघ्या एका धावाने विजय प्राप्त केला. भारताने दिलेल्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱया बांगलादेशचा डाव सामन्याच्या अगदी शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या षटकात हार्दिक पंड्याने भारतासाठी विजय श्री खेचून आणला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना पंड्याचा चेंडू शुवागता होमने चुकवला, पण त्यावर चोरटी धाव घेऊन भारताच्या धावसंख्येशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न शुवागता आणि मुस्ताफिझूरने केला. बांगलादेशच्या या मनसुब्याला धोनीने आपल्या चपळ यष्टीरक्षणाने सुरूंग लावला आणि भारताने या महत्त्वपूर्ण लढतीत १ धावाने विजय मिळवला. या विजयासह भारताने गुणतालिकेत दुसऱया स्थानी झेप घेतली आहे. भारताकडून आर.अश्विनने चार षटकांमध्ये २० धावा देऊन २ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याला सामानावीराच्या पुरस्कारने गौरविण्यात आले.
(FULL COVERAGE || FIXTURES || PHOTOS)

दरम्यान, भारताच्या डावात रोहित आणि धवनने चांगली सुरूवात केली होती. पण सहाव्या षटकात मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्माने विकेट गमावली. त्यानंतर धवन देखील माघारी परतला. विराट आणि रैनाने भारताच्या डावाला आकार दिला. मात्र, मोठी खेळी साकारण्यास दोघेही अपयश ठरले. कोहली बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने भारताचे फलंंदाज बाद होत गेले. बांंगलादेशच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांवर चांगला अंकुश ठेवला. वीस षटकांच्या अखेरीस भारताला ७ बाद १४६ धावांपर्यंतच मजल मारता आली आहे.

Live Cricket Updates of India vs Bangladesh:

# सहाव्या आणि अखेरच्या चेंडूवर बांगलादेशचा फलंदाज धावचित बाद. भारताचा एका धावाने बांगलादेशवर रंगतदार विजय

# पाचव्या चेंडूवर मेहमदुल्ला झेलबाद, बांगलादेशला १ चेंडूत विजयासाठी २ धावांची गरज

# चौथ्या चेंडूवर सौम्या सरकार झेलबाद, बांगलादेशला दोन चेंडूत २ धावांची गरज

# तिसऱया चेंडूवर सौम्या सरकाचा चौकार, दोन चेंडूत ३ धावांची गरज

# दुसऱया चेंडूवर सौम्या सरकारने खेचला चौकार

# पहिल्या चेंडूवर मेहमदुल्लाकडून एक धाव

# शेवटचे षटक टाकतोय हार्दिक पंड्या, भारत सामना जिंकणार का?  सामना रंगतदार स्थितीत.

# बांगलादेशला विजयासाठी ६ चेंडूत ११ धावांची गरज; नेहरा, बुमराह, अश्विन आणि जडेजाची चार षटके संपली. शेवटचे षटक कोण टाकणार? रैना की पंड्या?

# बांगलादेशला विजयासाठी १२ चेंडूत १७ धावांची गरज

# बांगलादेशची सहावी विकेट, सौम्या सरकार झेलबाद

# आशिष नेहरा टाकतोय सामन्याचे १८ वे षटक, अठराव्या षटकाच्या दुसऱयाच चेंडूवर सौम्या सरकारचा खणखणीत चौकार

# बुमराहचे जबरदस्त यॉर्कर, १७ व्या षटकात ७ धावा.

# बांगलादेशला विजयासाठी २४ चेंडूत ३४ धावांची गरज

# सोळाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर सौम्या सरकारचा खणखणीत षटकार

# सामन्याच्या १५ व्या षटकात केवळ ५ धावा, भारतीय गोलंदाजांकडून बांगलादेशवर दबाव

# जडेजाकडून बांगलादेशच्या फलंदाजांवर अंकुश, १४ व्या षटकात केवळ ३ धावा.

# बांगलादेशला विजयासाठी ४२ चेंडूत ५१ धावांची गरज

# अश्विनची अप्रतिम गोलंदाजी, आपल्या चार षटकांमध्ये अश्विनने दिल्या २० धावा आणि टिपल्या दोन महत्त्वपूर्ण विकेट्स.

# अश्विनने मिळवून दिले महत्त्वपूर्ण यश, शाकिब अल हसनची घेतली विकेट;  भारताचे पुनरागमन

# बांगलादेशची दुसऱया बाजूने पडझड होत असली तरी शाकिब अल हसनची मात्र तुफान फटकेबाजी. जडेजाला ठोकला उत्तुंग षटकार.

# बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझा क्लिन बोल्ड, जडेजाची भेदक गोलंदाजी

# शाकिब हल हसनला जीवनदान, अश्विनने झेल सोडला

# दहा षटकांच्या अखेरीस बांगलादेशची धावसंख्या ३ बाद ७७

# रैनाच्या पहिल्या दोन चेंडूवर १ धाव, तिसऱया चेंडूवर धोनीचे अप्रतिम यष्टीरक्षण; रेहमान बाद

# धोनीकडून गोलंदाजीत पुन्हा बदल, सुरेश रैना टाकतोय सामन्याचे १० वे षटक.

# पंड्याच्या पहिल्या चेंडूवर दोन धावा, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱया चेंडूवर १ धाव, चौथ्या चेंडूवर चौकार, पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा ‘बिहाईंड द विकेट’ चौकार, सहावा चेंडू निर्धाव. बांगलादेश २ बाद ६७

# हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी सज्ज

# शाकिब अल हसन मैदानात

# रवींद जडेजाने मिळवून भारताला दुसरे यश, तमीम इक्बाल ३५ धावांवर बाद

# सात षटकांच्या अखेरीस बांगलादेशची धावसंख्या १ बाद ५३

# सहाव्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर बांगलादेशने कुटल्या १६ धावा.

# बुमराहकडून पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण, झेल सोडला.

# पाचवे षटक अश्विनकडून, पहिल्याच चेंडूवर अपिल, पण पंचांचा नकार

# चौथ्या षटकात ८ धावा, बांगलादेश १ बाद २० धावा.

# तीन षटकांच्या अखेरीस बांगलादेश १ बाद १२ धावा.

# भारताला पहिले यश, मोहम्मद मिथुन झेलबाद. हार्दिक पंड्याने टिपला झेल.

# फिरकीपटू आर.अश्विन सामन्याचे तिसरे षटक टाकण्यास सज्ज

# बुमराहची अचूक टप्प्यात गोलंदाजी, दुसऱया षटकात केवळ ३ धावा.

# जसप्रीत बुमराह टाकतोय दुसरे षटक, बांगलादेश बिनबाद ७ धावा.

# आशिष नेहराच्या पहिल्या षटकात ७ धावा.

# आशिष नेहराकडून पहिले षटक, पहिल्याच चेंडूवर चौकार; बुमराहकडून गचाळ क्षेत्ररक्षण

# सामन्याच्या दुसऱया डावाला सुरूवात.

# भारताचे बांगलादेशसमोर १४७ धावांचे आव्हान.

# वीस षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद १४६ धावा.

# धोनीकडून दमदार फटका, पण केवळ दोनच धावा.

# शेवटचे तीन चेंडू शिल्लक, धोनी स्ट्राईकवर

# आर.अश्विन मैदानात, पहिल्याच चेंडूवर चौकार; भारत ७ बाद १४१ धावा.

# शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जडेजाची विकेट.

# शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूसाठी जडेजा स्ट्राईकवर

# शेवटचे ६ चेंडू शिल्लक, भारत ६ बाद १३७ धावा.

# जडेजाकडून पुन्हा एकदा चौकार, भारत ६ बाद १३६

# १९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जडेजाचा चौकार, भारत ६ बाद १३२

# धोनीचा खणखणीत चौकार, भारत ६ बाद १२७ धावा.

# अठरा षटकांच्या अखेरीस भारत ६ बाद १२३ (धोनी- ५* , जडेजा- ३*)

# तीन षटकांचा खेळ बाकी, भारत ६ बाद ११८

# युवराज सिंग देखील स्वस्तात बाद, भारत ६ बाद ११७

# पंड्या बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रैना देखील माघारी, भारत ५ बाद ११२

# सौम्या सरकारने हार्दिक पंड्याचा टिपला अप्रतिम झेल, भारत ४ बाद ११२

# हार्दिक पंड्याची फटकेबाजी, ६ चेंडूत १५ धावा.

# कोहली बाद झाल्यानंतर युवराजऐवजी हार्दिक पंड्या फलंदाजीसाठी मैदानात. पहिल्याच चेंडूवर पंड्याने खेचला षटकार

# शुवागता होमच्या फिरकीवर कोहली क्लिन बोल्ड, भारत ३ बाद ९५ धावा.

# १३ व्या षटकाच्या अखेरीस भारत २ बाद ८४ धावा. (कोहली- १८* , रैना- २३* )

# सुरेश रैनाचे लागोपाठ दोन उत्तुंग षटकार, भारत २ बाद ७३

# सामन्यातील पहिल्या दहा षटकांचा खेळ संपला, भारत २ बाद ५९ (कोहली- ११* , रैना- ५* )

# ९ व्या षटकात केवळ ३ धावा, भारत २ बाद ५२ (कोहली- ७* , रैना- २* )

# आठ षटकांनंतर भारत २ बाद ४९ धावा. (कोहली- ५* , रैना- १* )

# रोहितपाठोपाठ शिखर धवन देखील माघारी, भारत २ बाद ४५ धावा.

# पहिल्या सहा षटकारांच्या अखेरीस भारत १ बाद ४१ धावा.

# विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात दाखल

# मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा झेलबाद, रोहितच्या १६ चेंडूत १८ धावा.

# रोहितनंतर शिखरनेही ठोकला उत्तुंग षटकार, भारत बिनबाद ४१.

# सामन्याच्या सहाव्या षटकात रोहित शर्माचा खणखणीत षटकार, भारत बिनबाद ३५

# तीन षटकांच्या अखेरीस भारत बिनबाद १७ धावा.

# रोहित शर्माच्या कव्हर्सच्या दिशेने शानदार चौकार, भारत बिनबाद १७ धावा.

# दुसऱया षटकात भारताच्या ४ धावा, भारत बिनबाद ९ धावा.

# धवनचा दमदार चौकार, भारत बिनबाद ९ धावा.

# पहिल्या षटकात पाच धावा. (शिखर- २* , रोहित- २*)

# शिखर धवन, रोहित शर्मा मैदानात दाखल.

# बांगलादेशच्या राष्ट्रगीताला सुरूवात.

# भारत आणि बांगलादेशचा संघ मैदानात दाखल, राष्ट्रगीताला सुरूवात

# भारतीय संघात कोणताही बदल नाही, बांगलादेशच्या संघात तमिम इक्बालचे पुनरागमन

# बांगलादेशने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षणाचा निर्णय

# खेळपट्टीची चाचपण करताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी.

# पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटला साजेशी साथ देऊन भारतीय संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या युवराज सिंगने बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी कसून सराव केला.

# आर.अश्विनने खेळपट्टीचा अंदाज घेतला.

# टीम इंडिया बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमकडे रवाना

# फोटो गॅलरी- बांगलादेशविरुद्धच्या लढतीपूर्वी टीम इंडियाचा कसून सराव

Bengaluru: Skipper MS Dhoni with Virat Kohli during a training session at Chinnaswamy Stadium in Bengaluru on Tuesday. PTI Photo by Shailendra Bhojak (PTI3_22_2016_000218A) *** Local Caption *** Bengaluru: Skipper MS Dhoni with Virat Kohli during a training session at Chinnaswamy Stadium in Bengaluru on Tuesday. PTI Photo by Shailendra Bhojak (PTI3_22_2016_000218A) *** Local Caption ***

# धोनीने आपल्या चाहत्यांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

# दरम्यान, विराट कोहलीने नेट्समध्ये भरपूर घाम गाळला आणि रिव्हर्स पॅडल स्वीप फटक्याचाही सराव केला.

India vs Bangladesh Live Cricket Streaming, ICC World T20: India will clash with Bangladesh in Bengaluru. (Source: AP) India vs Bangladesh Live Cricket Streaming, ICC World T20: India will clash with Bangladesh in Bengaluru. (Source: AP)

# भारताने आजचा सामना जर गमावला तर कमी रनरेटमुळे आपण चौथ्या स्थानावर फेकले जाऊ आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

# भारतानने सामना जिंकल्यास संघाला चार गुणांसह गुणतालिकेत दुसऱया स्थानावर झेप घेता येईल.

# Watch: India vs Bangladesh World T20 Preview

 

# अडथळ्याची शर्यत रे अपुली..

India vs Bangladesh Live Cricket Streaming, ICC World T20: India cricket team members during a practice session in Bangalore. (Source: PTI) India vs Bangladesh Live Cricket Streaming, ICC World T20: India cricket team members during a practice session in Bangalore. (Source: PTI)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2016 2:39 pm

Web Title: live cricket match streaming india india vs bangladesh live icc world twenty20 2016 bangalore bengaluru
Next Stories
1 काश्मिरी प्रेक्षक पाकिस्तानी संघाचे समर्थक; आफ्रिदीच्या वक्तव्याने वाद
2 स्टम्प व्हिजन : .. आहे ट्वेन्टी-२० तरीही!
3 India vs Bangladesh, World T20: अडथळ्याची शर्यत रे अपुली..
Just Now!
X