ट्वेन्टी-२० महिला विश्वचषकाच्या पहिल्या साखळी सामन्यात जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सहज विजय मिळवता आला नव्हता, त्यामुळे सोमवारच्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियाला चांगले खेळाचे प्रदर्शन करणे भाग आहे.
ऑस्ट्रेलियाने यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात विजय नोंदविला आहे, तर दुसरीकडे न्यूझीलंडनेदेखील आर्यलडला पहिल्याच सामन्यात ९९ धावांनी पराभूत केले आहे.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेिनग व एॅलेक्स ब्लॅकेवेलच्या महत्त्वपूर्ण व अष्टपलू कामगिरीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात विजय मिळवता आला, त्यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा असतील. मोहालीला आर्यलडच्या विरोधात खेळताना न्यूझीलंडची कर्णधार सुझी बेट्सने दमदार फलंदाजी करत ७३ चेंडूंत ८२ धावा फटकावल्या होत्या, तर एरिन बर्मिघमने भेदक गोलंदाजी करत दोन बळी मिळवले होते.

 

– अविष्कार देशमुख