न्यूझीलंडचा सलग तिसरा विजय उपांत्य फेरीत धडाक्यात प्रवेश
न्यूझीलंडच्या फिरकीपटूंची प्रभावी गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून दारुण पराभव केला. सोमवारी नागपूरच्या जामठा मदानावर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने ‘अ’ गटातल्साखळी लढतीमधील सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत धडाकेबाज प्रवेश केला. न्यूझीलंडने याआधी श्रीलंकेला आणि आर्यलडला हरवले.
नाणेफेक जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत फक्त ८ बाद १०३ धावा केल्या. मग न्यूझीलंडच्या संघाने फक्त चार फलंदाजांच्या मोबदल्यात १६.२ षटकांत आरामात हे लक्ष्य ओलांडले.
किवी ऑफ-स्पिनर लीघ कास्पेरेकने प्रभवी गोलंदाजीचे प्रदर्शन केल्यामुळे ऑस्ट्रेलियाची सुरुवातीला ४ षटकांत ४ बाद ४ धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. कास्पेरेकने ४ षटकांत १३ धावांत ३ बळी घेतले. फिरकीपटू एरिक बर्मिगहॅमने २३ धावांत २ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून एलिस पेरीने सर्वाधिक ४२ धावा (४८ चेंडूंत) केल्या. यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. जेस जोनासेन (२३) आणि बेथ मुनी (१५) यांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाला जेमतेम शंभरी गाठता आली.
मग न्यूझीलंडकडून कर्णधार सुझी बेट्स (२३) आणि रचेल प्रीस्ट (३४) यांनी४७ चेंडूंत ५८ धावांची समी नोंदवली. मग सोफी डिव्हाइन (१७), एमी सॅटर्थवेट (नाबाद १६) आणि सारा मॅकग्लॅशन (११) यांच्या फलंदाजीमुळे किवी संघाने हे आव्हान पार केले.