05 July 2020

News Flash

पाकिस्तानचे राष्ट्रगीत गाण्यात चूक, सोशल मिडीयावरून अमानत अलींवर टीका

शफकत यांच्याकडून राष्ट्रगीतात दोन ठिकाणी चुका झाल्या.

Shafqat Amanat ali : ईडन गार्डन्स मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या सामन्यापूर्वी शफकत अली यांनी पाकिस्तानचे आणि अमिताभ बच्चन यांनी भारताचे राष्ट्रगीत गायले.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यातील एका प्रसंगाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचे गायक शफकत अमानत अली यांनी पाकिस्तानचे राष्ट्रगीत म्हणताना केलेली चूक सध्या सोशल मिडीयावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
राष्ट्रगीतासाठी पैसे घेणारा गरीब मनाचा- अमिताभ बच्चन 
ईडन गार्डन्स मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या सामन्यापूर्वी शफकत अली यांनी पाकिस्तानचे आणि अमिताभ बच्चन यांनी भारताचे राष्ट्रगीत गायले. शफकत अली यांनी राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीने म्हटले. शफकत यांच्याकडून राष्ट्रगीतात दोन ठिकाणी चुका झाल्या.
मात्र, या चर्चेनंतर शफकत अलींनी नाराजी व्यक्त करत आपल्याला दुःख झाल्याचे म्हटले आहे. आपल्याकडून राष्ट्रगीत म्हणताना कोणतीही चूक झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले . तरीही माझ्याकडून काही चूक झाली असल्यास मी माफी मागतो, असा माफीनामाही त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
VIDEO: अमिताभ बच्चन राष्ट्रगीत गातात तेव्हा.. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2016 12:04 pm

Web Title: shafqat amanat under fire for wrong rendition of pakistan natioal anthem in india pakistan match
Next Stories
1 T 20 WORLD CUP BLOG : कोहलीकडून बॅटिंगची बॅटसमनशिप!
2 वेस्ट इंडिजची बांगलादेशवर मात
3 शिस्त हाच विजयाचा ‘रुट’
Just Now!
X