News Flash

भारतीय क्रिकेट संघाची जुनी जाहिरात सोशल मिडीयावर व्हायरल

भारतीय संघासंदर्भातील आणखी एक गोष्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Ad Featuring Team India Is Going Viral : या जाहिरातीत हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली दिसत आहेत. मजेशीर प्रसंगावर चित्रीत करण्यात आलेल्या या जाहिरातील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

भारतात क्रिकेट अनेकांना एकत्र आणणारा घटक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात याचा प्रत्यय आला. या स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल उपांत्य फेरीतच संपुष्टात आली तरी पराभवानंतरही भारतीय चाहत्यांनी टीम इंडियाला भरभरून पाठिंबा दिला. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक भारतीय क्रिकेट रसिकाच्या तोंडी विराट कोहली, नेहरा, बुमराह आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे असली तरी सोशल मिडीयावर सध्या भारतीय संघासंदर्भातील आणखी एक गोष्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. भारतीय संघासोबत काही वर्षांपूर्वी चित्रित करण्यात आलेली पेप्सीची एक जाहिरात सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. या जाहिरातीत हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, युवराज सिंग, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली दिसत आहेत. मजेशीर प्रसंगावर चित्रीत करण्यात आलेल्या या जाहिरातीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे.

EPIC! Please take me back in time!Advertiser: Pepsi

Posted by Best Ads on Friday, April 1, 2016

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2016 5:09 pm

Web Title: team india popular vintage ad featuring is going viral
टॅग : Team India
Next Stories
1 पाहा: विंडिजच्या विजयानंतरचा युसेन बोल्टचा ‘चॅम्पियन डान्स’
2 सॅम्युअल्सचा विजयी उन्माद; पत्रकारपरिषदेत टेबलवर पाय ठेवून दिली उत्तरे
3 T20 World cup BLOG: ते मनाने खेळले..विश्वविजेतेपद जिंकलं, आता तुम्ही त्यांच मन जिंकणार का?
Just Now!
X