पाकिस्तान संघावर विजय मिळवून सकारात्मक सुरुवात करणाऱ्या वेस्ट इंडिज महिला संघासमोर रविवारी बांगलादेशचे आव्हान असणार आहे. महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पध्रेच्या ‘ब’ गटातील ही लढत चेन्नईत होणार आहे. (Full Coverage|| Fixtures||Photos)

विश्वचषक स्पध्रेत पाकिस्तानवर अवघ्या चार धावांनी निसटता विजय मिळवून वेस्ट इंडिजने दमदार सुरुवात केली. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध त्यांच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे. कागदावर वेस्ट इंडिजचा संघ बलाढय़ दित असला तरी पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश मिळवणारा बांगलादेशचा संघ त्यांना कडवे आव्हान देऊ शकतो.

वेस्ट इंडिजच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य ताळमेळ राखण्यात आला आहे.  कर्णधार स्टॅफनी टेलर आणि अनिसा मोहम्मद यांच्यावर अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीची भिस्त आहे. याव्यतिरिक्त शक्युआना क्विटीन, देवंद्रा डॉट्टीन, स्टॅसी अ‍ॅन किंग आणि मेरिसा अ‍ॅगिलेइरा यांच्याकडून महत्त्वपूर्ण खेळीची अपेक्षा आहे.