भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यातला शेवटच्या चेंडूवरच्या ‘त्या’ थराराची क्रिकेट जगतात सुरू असलेली चर्चा अद्यापही कायम आहे. धोनीने चपळतेने शेवटच्या चेंडूवर बांगलादेशच्या मुस्ताफिझूरला धावचीत बाद केल्याचा ‘तो’ क्षण मैदानात पुन्हा एकदा जशाच्या तसा साकारण्यात आला. मात्र, यावेळी भारत किंवा बांगलादेशच्या खेळाडूंऐवजी समालोचकांनी तो क्षण मैदानात उभा केला. बांगलादेशला एका चेंडूत दोन धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने टाकलेला चेंडू बांगलादेशच्या फलंदाजाने चुकवला आणि चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुस्ताफिझूर रेहमानला महेंद्रसिंग धोनीने धावचीत बाद केले होते. सामन्याचा हा निर्णयाक क्षण माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांनी मैदानात पुन्हा एकदा साकारला आणि याचा व्हिडिओ देखील आयसीसीने प्रदर्शित केला. यावेळी धोनीची भूमिका  वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू डॅरेन गंगा यांनी साकारली, तर हार्दिक पंड्याची भूमिका द.आफ्रिकेचा माजी गोलंदाज शॉन पॉलकने पार पाडली. बांगलादेशच्या फलंदाजांच्या भूमिकेत रसेल अर्नोल्ड आणि निक नाईट दिसून आले.

व्हिडिओ-