महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतील साखळी फेरीत अपराजित राहणाऱ्या इंग्लंड संघासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर हा सामना होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत उभय संघ पाच वेळा आमने सामने आले असून ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक तीन वेळा विजय मिळवला आहे.
२००९पासून सुरू झालेल्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत इंग्लंडने प्रथम जेतेपदाचा मान पटकावला होता आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली आहे. त्यामुळे २००९नंतर पुन्हा जेतेपदाचा निर्धार करून इंग्लंड ऑस्ट्रेलियाची जेतेपदाची मालिका खंडित करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र या लढतीत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड आहे. कारण कोटलावर दोन सामने खेळण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाने येथील वातावरणाशी जुळवून घेतले आहे.

संघ
इंग्लंड : कार्लोट एडवर्ड (कर्णधार), कॅथेरीन ब्रंट, टॅश फॅरन्ट, रेबेका ग्रुंडी, अ‍ॅमी जोन्स, लॉरा मार्श, अन्या श्रुबसोल, डॅनिएल वाएट, टॅमी बिऊमोंट, जॉर्जीआ एलविस, लिडीआ ग्रीनवे, जेनी गन, हेदर नाईट, नॅटेली स्कीव्हर, सराह टेलर.
ऑस्ट्रेलिया : मेग लॅनिंग (कर्णधार), अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल, क्रिस्टन बिम्स, लॉरेन चीटले, रेने फॅरेल, अलिसा हिली, बेथ मूनी, एलिस पेरी, एलिस व्हिलानी, निकोला कॅरेय, सराह कोयटे, हॉली फेर्लिग, जेसे जॉनसेन, एरिन ऑस्बॉर्न, मेगान स्कट.

वेळ : दुपारी २.३० वाजल्यापासून