09 August 2020

News Flash

वेस्ट इंडिजच्या महिला संघाने जिंकला ट्वेन्टी २० वर्ल्डकप

ऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालेल असे वाटत होते.

ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून विजय मिळवत वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० महिला विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वेस्ट इंडिजला १४९ धावांचे आवाहन दिले होते.
विश्वविजेपदाची हॅट्ट्रिक साजरी केल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा महिला संघ चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घालेल असे वाटत होते. मात्र, वेस्ट इंडिजच्या संघाने त्यांचे स्वप्न हे पूर्ण होऊ दिले नाही. सलामीवीर विलानी (५२) आणि लानिंग (५२) यांच्या फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात पाच बाद १४८ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून डॉटीनने दोन तर, मॅथ्यूज आणि अनिसा मोहम्मदचे प्रत्येकी एक गडी बाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2016 5:43 pm

Web Title: world t20 final west indies womens team beat australia
Next Stories
1 जगज्जेतेपद कुणाचे?
2 सलग चौथ्या विश्वविजयासाठी ऑस्ट्रेलियापुढे विंडीजचे आव्हान
3 वेस्ट इंडिजवर खेळपट्टीचे दडपण नाही
Just Now!
X