News Flash

बेबी धोनी आणि विराट कोहलीचा सेल्फी व्हायरल

हा सेल्फी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मुंबईत असलेल्या टीम इंडियाला मंगळवारी एक खास पाहुणी भेटायला आली होती. भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची कन्या झिवा तिच्या बाबांना भेटण्यासाठी आली होती. यावेळी विराट कोहलीने झिवासोबत सेल्फी काढला. हा सेल्फी सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या सेल्फीत झिवा कोहलीसोबत सेल्फी काढण्याऐवजी मोबाईलशी खेळण्यात गुंग असल्याचे दिसत आहे. विराटने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर झिवासोबतचा सेल्फी शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर त्याच्या या सेल्फीला तब्बल एक लाखांहून अधिक लाईक्स आणि सुमारे ४००० कमेंट मिळाल्या आहेत. अशीच परिस्थिती फेसबुकवरही आहे. दरम्यान धोनीचा चांगला मित्र असणारा ड्वेन ब्राव्हो आणि हरभजन सिंग यांनीदेखील झिवासोबत छायाचित्र काढले.

With Baby DhoniShe is too cute and adorable!

Posted by Virat Kohli on Tuesday, March 29, 2016

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2016 9:51 am

Web Title: ziva dhoni spends time with dad in mumbai meets virat kohli
Next Stories
1 ICC WT20, Eng vs NZ, Semi Final: फिरकीच्या तालावर..!
2 जबरा फॅन हो गया..
3 फक्त विराटवर लक्ष ठेवून चालणार नाही -गेल
Just Now!
X