वेस्ट इंडिजच्या महिला संघापाठोपाठ वेस्ट इंडिजच्या पुरूष संघानेही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला आहे. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगलेल्या रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडवर चार विकेट्सने विजय साजरा केला. मार्लन सॅम्युअल्स वेस्ट इंडिजच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ६६ चेंडूत नाबाद ८५ धावा ठोकल्या, तर सामन्याच्या महत्त्वपूर्ण क्षणी कालरेस ब्रेथवेटने अखेरच्या षटकात ६ चेंडूत १९ धावांची गरज असताना लागोपाठ चार खणखणीत षटकार ठोकून संघाला विजेतेपद गाठून दिले. त्यानंतर स्टेडियमवर ‘चॅम्पियन्स’चा जल्लोष सुरू झाला. या विजयासह वेस्ट इंडिजच्या क्रिकेट इतिहासात यंदाच्या वर्षाची सुवर्ण अक्षरांनी नोंद केली जाईल. कारण, २०१६ मध्ये वेस्ट इंडिजच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक जिंकला. त्यानंतर आज महिला संघाने ऑस्ट्रेलियावर मात करत आणि पुरूष संघाने इंग्लंडवर मात करत ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद काबीज केले आहे.

इंग्लंडने दिलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची ३ बाद १३ अशी केविलवाणी अवस्था झाली होती. सामन्याच्या दुसऱयाच षटकात जो रुटने सुरूवातीला जॉन्सन चार्ल्स आणि त्यानंतर ख्रिस गेलला स्वस्तात माघारी धाडले होते. त्यानंतर तिसऱया षटकात लेंडल सिमन्स माघारी परतला. मग ड्वेन ब्राव्होच्या साथीने मार्लन सॅम्युअल्सने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सामन्यावर पकड निर्माण होत असतानाच ब्राव्हो देखील माघारी परतला. त्यावेळी वेस्ट इंडिजला ३६ चेंडूत ७० धावांची गरज होती. विस्फोटक आंद्रे रसेल देखील धावांची सरासरी आटोक्यात आणण्यासाठी मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला आणि आल्या पावलीच माघारी परतला. त्याच्यापाठोपाठ कर्णधार सॅमीनेही तंबू गाठला. मग सॅम्युअल्सने कालरेस ब्रेथवेटला हाताशी घेऊन झुंज दिली आणि अखेरच्या षटकात ब्रेथवेटने चार शानदार षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले.

Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
Mumbai Indians vs Rajasthan Royals IPL 2024 Highlights in Marathi
IPL 2024 MI vs RR Highlights: मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅटट्रिक, राजस्थानने मुंबईवर ६ विकेट्सने मिळवला सहज विजय
IPL 2024 Gujarat Titans vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्सच्या सामन्यात चाहते एकमेकांशी भिडले, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, सामन्याचा नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. इंग्लंडच्या डावाची सुरूवात निराशानजक झाली होती. पहिल्याच षटकात सॅम्युअल बद्रीने इंग्लंडचा घातक फलंदाज जेसन रॉयला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर दुसऱया षटकात आंद्रे रसेलने हेल्सची विकेट घेतली. कर्णधार ईऑन मॉर्गनने देखील निराशा केली. मॉर्गन अवघ्या पाच धावा करून माघारी परतला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड निर्माण केली होती. त्यानंतर जो रुट आणि जोस बटलर यांनी मैदानात टिच्चून फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी रचून संघाच्या डावाला सांभाळले. इंग्लंडची सामन्यावर पकड निर्माण होत असतानाच मोठा फटका मारण्याच्या नादात १२ व्या षटकात बटलर(३६) बाद झाला. त्यानंतर बेन स्टोक्स(१३) आणि मोईन अली शून्यावर बाद झाले. त्यामुळे सामन्यावर पुन्हा एकदा वेस्ट इंडिजने पकड निर्माण केली. जो रुटची एकाकी झुंज सुरू होती. तो देखील ५४ धावा ठोकून बाद झाला. रुट बाद झाल्यानंतर ठरावीक अंतराने इंग्लंडचे फलंदाज बाद होत गेले आणि वीस षटकांच्या अखेरीस इंग्लंडला ९ बाद १५५ धावा करता आल्या.

LIVE UPDATE:

# ब्रेथवेट वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो, लागोपाठ चौथा षटकार. रोमांचक सामन्यात वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर चार विकेट्सने विजय

# ब्रेथवेटचा लागोपाठ तिसरा षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी केवळ १ धाव गरज

# कालरेस ब्रेथवेटचा आणखी एक उत्तुंग षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी ४ चेंडूत ७ धावांची गरज

# वीसाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कालरेस ब्रेथवेटचा खणखणीत षटकार, वेस्ट इंडिजला विजयासाठी ५ चेंडूत १३ धावांची गरज

# वेस्ट इंडिजला विजयासाठी ६ चेंडूत १९ धावांची गरज

# १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सॅम्युअल्सने खेचला खणखणीत चौकार, दुसऱया चेंडूवर एक धाव, तिसऱया चेंडूवर पुन्हा एक धाव, चौथ्या चेंडूवर एक धाव, पाचव्या चेंडूवर एक धाव आणि सहाव्या चेंडू निर्धाव.

# वेस्ट इंडिजला विजयासाठी १२ चेंडूत २७ धावांची गरज

# डेव्हिड विलीची अचूक टप्प्यात गोलंदाजी, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकुश

# इंग्लंडकडून क्षेत्ररक्षणात बदल, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न

# वेस्ट इंडिजला विजयासाठी १८ चेंडूत ३८ धावांची गरज

# मार्लन सॅम्युअल्सचा सतराव्या षटकाच्या दुसऱया चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने शानदार चौकार

# अॅलेक्स हेल्सचे सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षण, १६ षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज ६ बाद १११ धावा. विजयासाठी २४ चेंडूत ४५ धावांची गरज

# रसेलपाठोपाठ वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी (२) झेलबाद, विलीने घेतली विकेट

# वेस्ट इंडिजची पाचवी विकेट, १६ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विस्फोटक आंद्रे रसेल झेलबाद. बेन स्टोक्सने टिपला झेल.

# सॅम्युअल्सचे लागोपाठ दोन खणखणीत षटकार, १५ व्या षटकात १८ धावा.

# मार्लन सॅम्युअल्सचे अर्धशतक पूर्ण

# इंग्लंडला चौथे यश, ड्वेन ब्राव्हो मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद. वेस्ट इंडिजला विजयासाठी ३६ चेंडूत ७० धावांची गरज

# वेस्ट इंडिजला विजयासाठी ४२ चेंडूत ८० धावांची गरज

# १३ व्या षटकाच्या तिसऱया चेंडूवर स्वेअर लेगच्या दिशेने ब्राव्हो मारलेला फटक्यावरचा झेल इंग्लंडच्या सॅम बिलिंग्सने सोडला.

# इंग्लंडच्या गोलंदाजांचा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकुश, १२ षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिजची धावसंख्या ३ बाद ७०

# दहा षटकांमध्ये वेस्ट इंडिजच्या ३ बाद ५४ धावा. विजयासाठी ६० चेंडूत १०२ धावांची गरज

# ९ षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज ३ बाद ५० धावा. ( सॅम्युअल्स- ३५*, ब्राव्हो- ६*)

# सातव्या षटकात इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलरने मार्लन सॅम्युअल्सचा झेल टिपला, पण तिसऱया पंचांच्या निर्णयाअंती झेल जमीनीला टेकल्याचे निष्पन्न. सॅम्युअल्सला जीवनदान

# सॅम्युअल्स आणि ब्राव्होकडून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न, सहा षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज ३ बाद ३७ धावा. ( सॅम्युअल्स- २६*, ब्राव्हो- २*)

# तीन षटकांच्या अखेरीस वेस्ट इंडिज ३ बाद १३ धावा ( सॅम्युअल्स- ८*, ब्राव्हो-०*)

# तिसऱया षटकात वेस्ट इंडिजची तिसरी विकेट, लेंडल सिमन्स बाद

# वेस्ट इंडिजला मोठा झटका, ख्रिस गेल झेलबाद. जो रूटने मिळवून दिले यश. एकाच षटकात दोन महत्त्वपूर्ण विकेट्स

# ख्रिस गेल स्टाईकवर आणि पहिल्याच चेंडूवर चौकार

# दुसऱया षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वेस्ट इंडिजला पहिला धक्का, जॉन्सन चार्ल्स मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद

# डेव्हिड विलीची अचूक टप्प्यात गोलंदाजी, पहिल्या षटकात वेस्ट इंडिजकडून केवळ एक धाव.

# जॉन्सन चार्ल्स आणि ख्रिस गेल फलंदाजीसाठी सज्ज. पहिले षटक टाकतोय डेव्हिड विली.

# इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी वेस्ट इंडिजचे सलामीवीर मैदानात दाखल

# २० व्या षटकात १० धावा, इंग्लंडचे वेस्ट इंडिजसमोर १५६ धावांचे आव्हान

# १९ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ९ बाद १४५ धावा

# १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱया चेंडूवर दोन धावा आणि तिसऱया चेंडूवर विकेट

# अठराव्या षटकात सात धावा आणि एक विकेट. इंग्लंड ८ बाद १३८ धावा.

# आणखी एक धक्का, विली मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद. वेस्ट इंडिजच्या जॉन्सन चार्ल्सने डाईव्ह मारून टिपला अप्रतिम झेल.

# अठराव्या षटकात इंग्लंडच्या विलीची फटकेबाजी शानदार चौकार

# १७ षटकांच्या अखेरीस इंग्लंड ७ बाद १३१ धावा

# इंग्लंडला मोठा धक्का, जो रुट माघारी. रुटने ३३ चेंडूत ठोकल्या ५४ धावा.

# मोईन अली शून्यावर माघारी, ब्राव्होची भेदक गोलंदाजी. इंग्लंड ६ बाद ११० धावा.

# ड्वेन ब्रावोने मिळवून दिले संघाचा पाचवे यश, बेन स्टोक्स(१३) झेलबाद. इंग्लंड ५ बाद ११० धावा

# इंग्लंडच्या जो रुटचे ३३ चेंडूत अर्धशतक, इंग्लंडची धावसंख्या ४ बाद ९७

# १२ व्या षटकात इंग्लंडला चौथा धक्का, जोस बटलर  झेलबाद. बटलरने ठोकल्या २२ चेंडूत ३६ धावा.

# अकराव्या षटकात जोस बटलरची तुफान फटकेबाजी, सुलेमान बेनच्या पहिल्या दोन चेंडूवर खेचले खणखणीत षटकार

# १० षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद ६७ धावा. (रुट- ३९* , बटलर- २८* )

# जोस बटलरचा ९ व्या षटकात सुलेमान बेनला खणखणीत षटकार, इंग्लंड ३ बाद ५५ धावा.

# जो रुट आणि जोस बटलकरकडून इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न

# जो रुटची अप्रतिम फटकेबाजी, इंग्लंड ३ बाद ४६

# पाच षटकांच्या अखेरीस इंग्लंड ३ बाद २३ धावा.

# पाचव्या षटकात इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार ईऑन मॉर्गन सॅम्युअल बद्रीच्या गोलंदाजीवर झेलबाद. ख्रिस गेलने स्लिपला टिपला झेल.

# चार षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद २३ धावा.

# चौथ्या षटकात रुट आणि मॉर्गनने कुटल्या १४ धावा.

# चौथ्या षटकात जो रुट आणि मॉर्गनची फटकेबाजी. तिसऱया षटकात तीन चौकार

# दोन षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद ८ धावा.

# दुसऱया षटकात इंग्लंडला आणखी एक झटका, अ‍ॅलेक्स हेल्स झेलबाद. आंद्रे रसेलने घेतली विकेट.

# पहिल्या षटकाच्या अखेरीस इंग्लंड १ बाद ७ धावा.

# इंग्लंडला पहिल्याच षटकात धक्का, सॅम्युअल बद्रीच्या फिरकीवर जेसन रॉय शून्यावर बाद.

# अंतिम सामन्यासाठीचे दोन्ही संघांतील खेळाडू

# दोन्ही संघांत कोणताही बदल नाही.

# वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

# नाणेफेकीसाठी वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी आणि इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉर्गन मैदानात दाखल.

# थोड्याच वेळात सामन्याचा नाणेफेक होणार.

# Watch: England vs West Indies ICC World T20 Final Match Preview

# वेस्ट इंडिजच्या महिला संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला, ऑस्ट्रेलियावर केली मात.

जगज्जेतेपद कुणाचे?