बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खानच्या आवाजात क्रिकेट रसिकांना सामन्याचे समालोचन ऐकण्याची संधी मिळणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकात बुधवारी बंगळुरूच्या स्टेडियमवर रंगणाऱया भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याचे समालोचन शाहरुख खान करणार असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. (FULL COVERAGE || FIXTURES || PHOTOS)

थेट बंगळुरूतून शाहरुख समालोचन करणार नसून, मुंबईतील स्टुडिओमधून तो सामन्याचे समालोचन करणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये शाहरुखसोबत भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर देखील असणार आहे. ‘फॅन’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने शाहरुख कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, शाहरुखला कोलकात्यातील भारत वि. पाकिस्तान सामना पाहता आला नव्हता. त्यावर शाहरुखने आपल्या ट्विटर हॅण्डलवर नाराजी व्यक्त केली होती. या सामन्यावेळी शाहरुख दुबईत चित्रीकरणात व्यस्त होता.

Watch: India vs Bangladesh World T20 Preview