भारताचे दिग्गज क्रिकेटर सुनिल गावसकर यांनी अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाबाबत एक भाकीत वर्तवलं आहे. यानुसार आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या ४० व्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळाडूंविषयी अफगाणिस्तानसाठी एक खेळाडू विजयात महत्त्वाचा ठरेल. हा खेळाडू म्हणजे प्रसिद्ध क्रिकेटर रशीद खान नाही, तर मुजीब उर रहमान हा आहे. गावसकर यांच्यामते मुजीब उर रहमान अफगाणिस्तानला विजय मिळवून देऊ शकतो.

सुनिल गावसकर म्हणाले, “न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानसाठी मुजीबने खेळावं असं मला वाटतं. तसं झालं तर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानसाठी हा फिरकीपटू अतिरिक्त ताकद ठरेल. तो या सामन्यात रशीद खान आणि मोहम्मद नबीसोबत आपली जादू दाखवू शकतो. या सामन्यात भारतासाठी छोटीशी आशा आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला पराभवाची धुळ चारल्यास ही मोठी गोष्ट ठरेल.”

T20 World Cup 2022: Suryakumar Yadav's half-century gives Australia a challenge of 187 runs
T20 World Cup2022: सुर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियासमोर १८७ धावांचे आव्हान
T20 World Cup2022: Commentary panel for T20 World Cup announced, three Indians on the list
T20 World Cup2022: टी२० विश्वचषकासाठी समालोचन पॅनेल जाहीर, यादीत तीन भारतीयांचा समावेश
T20 World Cup 2022: India to focus on bowling deficiencies in practice match against Australia
T20 World Cup2022: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात गोलंदाजीतील उणीवा दूर करण्याकडे भारताचे असणार लक्ष
T20 World Cup 2022: Netherlands thrash UAE by three wickets in last-overs thriller
T20 World Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या षटकात नेदरलँडचा थरारक विजय, यूएईचा तीन गडी राखून पराभव

“मुजीब आणि रशीद अफगाणिस्तानसाठी निर्णायक ठरतील “

“मुजीब न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तानसाठी महत्त्वाचा शिलेदार असेल. कारण त्याच्या बॉलवर खेळणं वरूण चक्रवर्तीप्रमाणे अवघड असतं. विशेष म्हणजे मुजीबला आत्ताच वरूण चक्रवर्तीपेक्षा अधिक अनुभव आलाय. त्यामुळे मुजीब आणि रशीद या सामन्यात अफगाणिस्तानसाठी निर्णायक ठरतील,” असंही गावसकर यांनी नमूद केलं.

उपांत्य फेरीसाठी कडवी झुंज

टी २० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघांनी धडक मारली आहे. आता ग्रुप २ मधील न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि भारत या संघात चुरस आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यानंतर उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट होणार आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकल्यास थेट उपांत्य फेरीत धडक असणार आहे. मात्र अफगाणिस्तानने हा सामना जिंकल्यास धावगतीच्या जोरावर भारताला उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे.