T20 World Cup 2021 अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंपुढे पाकिस्तानच्या फलंदाजांचा कस

रशीद खान आणि मुजीब उर रहमान या फिरकी जोडीविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांचा कस लागणार आहे.

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी सायंकाळी होणाऱ्या ‘अव्वल-१२’ फेरीतील लढतीत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, हे आशिया खंडातील दोन बेभरवशाचे संघ आमनेसामने येणार आहेत. रशीद खान आणि मुजीब उर रहमान या फिरकी जोडीविरुद्ध पाकिस्तानच्या फलंदाजांचा कस लागणार आहे.

भारत, न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि हसन अली या वेगवान त्रिकूटासह कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामी जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात स्कॉटलंडचा तब्बल १३० धावांनी फडशा पाडला. या लढतीत रशीद-मुजीबच्या जोडीने नऊ बळी मिळवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup 2021 pakistan vs afghanistan match prediction zws

Next Story
इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ सामना
ताज्या बातम्या