T20 World Cup : न्यूझीलंडचा वचपा घेण्यासाठी पाकिस्तान उत्सुक

पाकिस्तानसाठी आझम आणि मोहम्मद रिझवान हे सलामीवीर दमदार कामगिरी करत आहेत.

शारजा : पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताला धूळ चारल्यानंतर पाकिस्तानची ट्वेन्टी-२० विश्वचषकात मंगळवारी ‘अव्वल-१२’ फेरीमध्ये न्यूझीलंडशी गाठ पडणार आहे. या सामन्यात पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेण्याच्या न्यूझीलंडच्या निर्णयाची परतफेड करण्यास बाबर आझमचा संघ उत्सुक आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंड संघाने पाकिस्तानात खेळण्यास अचानक नकार दिला. न्यूझीलंड क्रिकेट मंडळाच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांच्यासह खेळाडूंनीही टीका केली होती. त्यामुळे आता भारतानंतर न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तानसाठी आझम आणि मोहम्मद रिझवान हे सलामीवीर दमदार कामगिरी करत आहेत.

वेळ : सायं. ७.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: T20 world cup confident pakistan ready to seek revenge from new zealand zws