पाहा : मुंबईत वासीम अक्रम यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे प्रक्षेपण थांबवले

काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

Wasim Akram , Cricket,Icc T 20 World Cup,T 20 world cup,Virat Kohli Innings For India,Virat Kohli's Innings Against Australia,ऑस्ट्रेलिया टी २०,ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहली, loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
Wasim Akram heckled during live broadcast : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर वासीम अक्रम 'आज तक' या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मुंबईतून सहभागी झाले होते. यावेळी ते विराट कोहलीविषयी बोलत असताना अचानक काहीजण त्याठिकाणी आले आणि त्यांनी कार्यक्रमाचे प्रक्षेपण थांबविण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक वासीम अक्रम यांच्या वृत्तवाहिनीवरील लाईव्ह कार्यक्रमादरम्यान काही लोकांनी घुसखोरी करत कॅमेरा टीमवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यानंतर वासीम अक्रम ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात मुंबईतून सहभागी झाले होते. यावेळी ते विराट कोहलीविषयी बोलत असताना अचानक काहीजण त्याठिकाणी आले आणि त्यांनी कार्यक्रमाचे प्रक्षेपण थांबविण्याचा प्रयत्न केला. काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ट्वेन्टी-२० विश्वचषकादरम्यान पाकिस्तानी संघाला मुंबईत पाय ठेवून देणार नाही, असे शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार घडल्याची शंका व्यक्त केली जात होती. मात्र, तसे काहीही घडले नसून यावेळी कोणालाही इजा झाली नसल्याचे वृत्तवाहिनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Watch tv crew recording wasim akram heckled during live broadcast

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या