scorecardresearch

अजय मिश्रा

अजय मिश्रा किंवा अजय मिश्रा टेनी (Ajay Mishra) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील राजकारणी आहेत. ते १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील सध्याचे राज्यमंत्री आहेत.ते उत्तर प्रदेशातील खेरी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अजय मिश्रा यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिह्यातील बनवीर पूर या गावात झाला. आपल्या गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कानपूरला जाऊन तेथील छत्रपती शाहू जी महाराज विद्यापीठाच्या ख्राईस्ट चर्च कॉलेज येथून विज्ञान शाखेची पदवी मिळवली.


पुढे त्यांनी डीएव्ही कॉलेज, कानपूर येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणामध्ये सहभाग घेतला. २०१२ मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशच्या १६ व्या विधानसभेच्या निघासन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते तेथील आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी २०१४ आणि २०१९ मध्ये खेरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. ते भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची ग्रामीण विकास स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जुलै २०२१ मध्ये मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलानंतर त्यांना गृह मंत्रालयातील राज्यमंत्रीपद मिळाले. अजय मिश्रा यांची राजकीय कारकीर्द मोठी असली तरी त्या दरम्यान त्यांचे नाव अनेक प्रकरणांमध्ये आले. नव्वदीच्या दशकात त्यांच्यावर काही गुन्हे होते. पुढे प्रभात गुप्ता केसमुळेही ते चर्चेत आले. त्यानंतर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनामुळे अजय मिश्रा अडचणीत सापडले होते. सप्टेंबर २०२१ मध्ये आपल्या मतदारसंघाच्या एका कार्यक्रमाला अजय मिश्रा उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये काही शेतकरी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवत निषेध दर्शवला. यावरुन त्यांना आंदोलकांना संबोधून ‘सुधरा नाहीतर तुम्हाला नीट सुधारु..


मला दोन मिनिट नाही लागणार तुम्हाला सरळ करायला’ असे वक्तव्य केले. त्यामुळे एकूणच वातावरण तापले. पुढे ३ ऑक्टोबर २०२१ यांनी अजय मिश्रा यांचे सुपुत्र आशीष मिश्रा यांनी शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या एका शेतकरी आंदोलनामध्ये भरधाव गाडी चालवत नेली. यामध्ये चार शेतकरी आंदोलक आणि एका पत्रकाराचा मृत्यू झाला आणि काही आंदोलक जखमी झाले असे म्हटले जात होते. यावरुन प्रकरण आणखी पेटले. पोलिसांनी आशीष मिश्रा यांना अटक केली. पुढे अजय मिश्रा यांच्या अटकेची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. काहींनी त्यांना पदावरुन काढून टाकावे असेही म्हटले. पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही.


Read More
udayanraje bhosale
VIDEO : उदयनराजे भोसले कॉलर उडवतात, डान्स करतात, ही भाजपाची शिस्त आहे का? केंद्रीय मंत्र्यांना प्रश्न विचारताच…

अजय मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा हे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

lakhimpur-6
“गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं, मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं”, ‘या’ भाजपा नेत्याची मागणी

भाजपा खासदार वरूण गांधी यांच्यानंतर आणखी एका भाजपा नेत्यानं या प्रकरणावरून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर तोफ डागलीय.

लखीमपूर हिंसाचार घडला, तेव्हा कुठे होतास? एसआयटीच्या प्रश्नावर आशीष मिश्रा म्हणतो, “मी तर तेव्हा…!”

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर हत्याकांडप्रकरणी दोन समन्स पाठवल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशीष मिश्रा पोलिसांसमोर हजर…

Latest News
illegal building, Kopar Shivsena branch,
डोंबिवलीतील कोपर शिवसेना शाखेजवळ बेकायदा इमारतीचे बांधकाम, व्यापारी गाळे बांधून विक्रीची तयारी

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील कोपर गावमध्ये सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे स्थानिक रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त…

ipl 2024 coin tos controversy sam curran cross check toss coin during punjab kings vs mumbai indians video viral ipl
VIDEO:”बिलकूल रिस्क नही लेनेका”; …म्हणून मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्सच्या मॅचच्या टॉसवेळी कॅमेरामन होते सतर्क

ipl 2024 Coin Tos Controversy : आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, नाणे टॉस करताना कॅमेरा फोकस केला यात काय मोठी…

Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान

परिस्थितीपायी साधं शिक्षण घेणंदेखील दुरापास्त असताना, प्रचंड इच्छा शक्तीच्या जोरावर, घरच्याच मंडळींशी संघर्ष करून शिक्षणात घवघवीत यश मिळवणाऱ्या जी. निर्मला…

gadchiroli lok sabha , sironcha polling station, evm technical glitch, new evm machine, aheri, helicopter, lok sabha 2024, election 2024, polling station, polling day, gadchiroli news, gadchiroli polling news,
ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, सिरोंचातील मतदान केंद्रावर गोंधळ; अहेरीवरून हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात…

मतदान सुरू असताना तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने तेलंगणा सीमेवर शेवटच्या टोकावरील सिरोंचातील मतदान केंद्रात गोंधळ उडाला होता.

Mumbai, tenders, projects,
मुंबई : तीन प्रकल्पांसाठी ८२ निविदा, आचारसंहितेनंतरच अंतिम निर्णयाची शक्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि नांदेड-जालना द्रुतगती महामार्ग अशा तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या…

divyanka tripathi hand fractures undergo surgery
‘ये है मोहब्बतें’ फेम दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, हाताचे हाड मोडले, पतीने शेअर केला फोटो

दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, पती विवेक दहियाने दिली माहिती

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी

पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकजण जखमी झाल्याची…

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: तिलक वर्माचा जबरदस्त शॉट स्पायडर कॅमवर जाऊनच आदळला, पण फटका बसला हर्षल पटेलला

IPL 2024 PBKS vs MI: मुंबई इंडियन्स आणि पंजाबच्या सामन्यात तिलक वर्माने ३४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत तिलकच्या…

sanjay raut
“आम्हाला त्या मतदारसंघात…”, उमेदवाराचं नाव पाहून संजय राऊतांनी मानले भाजपाचे आभार; नेमकं प्रकरण काय

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी सांगलीत जाऊन ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा लोकसभेचा उमेदवारी…

संबंधित बातम्या