scorecardresearch

छगन भुजबळ

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर, १९४७ रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांनी मुंबईमधील एका अभियांत्रिकी विद्यालयामधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते शेती व त्याच्याशी संबंधित व्यवसाय करत होते. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होती. शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी राजकारणामध्ये पदार्पण केले.

१९७३ मध्ये ते मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. पुढे १९९१ साली त्यांनी शिवसेना (Shivsena) सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते शरद पवारांचे निकटवर्तीय आहेत. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा पक्षांतर केले. माझगाव मतदारसंघातून ते १९८५ आणि १९९० या वर्षांमध्ये निवडून आले आहेत. येवला मतदारसंघातून निवडून येत त्यांना विधानसभेचे सदस्यत्व मिळाले. १९९९ ते २००३ या काळामध्ये त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन पदांची जबाबदारी होती. २००४ मध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले.

२००८ ते २०१० या काही महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. महाराष्ट्र सदन घोटाळा व मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांचा जामीन मंजूर झाला. महाविकास आघाडी सरकार असताना अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार या विभागाचे ते मंत्री होते.
Read More
nashik lok sabha seat, Mahayuti, Allocation , press conference, Deepak Kesarkar, bjp, ajit pawar ncp, eknath shinde shivsena, chhagan bhujbal, hemant godse, lok sabha 2024, election 2024, marathi news, politics news, nashik news
नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार

महायुतीत नाशिकची जागा कुणाच्या पदरात पडणार, उमेदवार कोण असणार, याची स्पष्टता गुरुवारी होणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.…

What Hemant Godse Said?
हेमंत गोडसे छगन भुजबळांच्या पाया पडल्यानंतर म्हणाले, “मी आशीर्वाद”..; काळाराम मंदिरात नेमकं काय घडलं?

हेमंत गोडसेंनी नाशिकमध्ये पुन्हा धनुष्यबाण येईल असाही विश्वास व्यक्त केला आहे.

Chhagan Bhujbal and Hemant Godse met in the premises of Kalaram temple in Nashik
नाशिकमधील काळाराम मंदिर परिसरामध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची झाली भेट! | Nashik

नाशिकमधील काळाराम मंदिर परिसरामध्ये छगन भुजबळ आणि हेमंत गोडसेंची झाली भेट! | Nashik

minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”

मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या, अशी मागणी होती आणि आम्ही ते दिले आहे. त्यामुळे आता हा मुद्दा नाही, असेही भुजबळ म्हणाले.

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई

नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विषय महायुतीतील तीनही पक्षांच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला आहे.

Chhagan Bhujbal On Mahayuti Seat Sharing
नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार? छगन भुजबळांचे सूचक विधान; म्हणाले, “महायुतीतील प्रत्येक पक्षाला ही जागा…”

नाशिकच्या जागेचा तिढा कधी सुटणार, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे.

Jayant Patil on Amit Shah
“पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, पण जनता..”, जयंत पाटील यांची अमित शाहांवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड येथील प्रचार सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असली आणि एक नकली असल्याचे…

chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास

महायुतीत नाशिकच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा तीनही पक्षांच्या नेतेमंडळींच्या एकत्रित बैठकीनंतर सुटेल, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन…

chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट

शरद पवार गटातील नेते आणि राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Nashik Lok Sabha, mahayuti, Candidate , Bhujbal Farm, Office Reflects Silent Tension, chhagan bhujbal, hemant godse, bjp,
नाशिकच्या जागेचा तिढा अन् भुजबळ फार्मची शांतता

लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्षात सुरु असलेल्या टोकाच्या संघर्षामुळे दाटलेल्या शांततेचे प्रतिबिंब राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री…

All three parties in mahayuti are fighting for Nashik Lok Sabha seat
भुजबळ मुंबईत तर, गोडसे दिल्लीत… इच्छुकांची पडद्याआडून मोर्चेबांधणी

लोकसभेच्या नाशिकच्या जागेवरून महायुतीतील तीनही पक्षात अटीतटीचा संघर्ष सुरू असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे सात दिवसांपासून…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×