scorecardresearch

डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.


सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.


डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.


Read More
dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन

डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस या भागात तैनात राहत नसल्याने प्रवासी एक ते दीड तास मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात अडकून पडतात.

mns mla raju patil marathi news
“मनसेच्या मूळ इंजिनमुळे ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती”, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मिश्किल टिपणी

ट्रिपल इंजिनचे सरकार असले तरी या इंजिनमध्ये खरे इंजिन हे मनसेचे मूळ इंजिन आहे, याची जाणीव ठेवावी असे आमदार राजू…

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर

पाडकाम करण्यापूर्वी या भागातील अनेक रहिवाशांनी ठेकेदाराला धूळ प्रतिबंधक उपाययोजना करण्याची सूचना केली, त्याची दखल ठेकेदाराने घेतली नाही.

‘त्यांना’ रामभक्त जागा दाखवतील; ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका

आता रामभक्त आणि बजरंग बली योग्य जागा दाखवतील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी डोंबिवलीत केली.

shrikant shinde latest marathi news
“आमचं काम बोलतं”, कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेंची प्रचार मोहीम; शिळफाटा रस्त्यावर विविध विकास कामांचे होर्डींग

प्रचार मोहिमातून विरोधकांना ही लोकसभा निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढवणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितल्याचे दिसून येते आहे.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे

डाॅक्टरांसह तीन जणांना एका महिला रुग्णाच्या नातेवाईकाने रागाच्या भरात मारहाण, शिवीगाळ करत चावे घेतल्याने खळबळ उडाली आहे.

illegal building, Kopar Shivsena branch,
डोंबिवलीतील कोपर शिवसेना शाखेजवळ बेकायदा इमारतीचे बांधकाम, व्यापारी गाळे बांधून विक्रीची तयारी

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील कोपर गावमध्ये सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे स्थानिक रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त…

dombivli , modi photo, advertisement, advertisement agency dombivli
डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहिरात एजन्सी विरुध्द आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ही पहिली…

illegal construction in green zone near Kopar railway station in Dombivli
डोंबिवलीत कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यात बेकायदा बांधकामाची उभारणी

मध्य रेल्वेच्या डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला दिवा बाजूने हरितपट्ट्यावर मातीचे भराव टाकून, या भागातील झाडे, हरितपट्टा नष्ट…

Dombivli railway station, roof platform Dombivli,
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचे चटके

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक पाचवरील दिवा बाजूकडील विस्तारित फलाटावर गेल्या वर्षापासून छत नसल्याने प्रवाशांना आता उन्हाचे चटके सहन करत…

girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

डोंबिवली जवळील पलावा-खोणी गृहसंकुलातील जॅस्मिन सोसायटीत दोन भावांनी बांगलादेशमधून घर सांभाळण्यासाठी ठेवलेल्या एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने राहत्या घरात…

dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..

डोंबिवली येथे एका चार महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून पळ काढलेल्या १७ वर्षीय बांगलादेशी मुलीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात…

संबंधित बातम्या