scorecardresearch

दसरा २०२३

‘दसरा’ किंवा ‘विजयदशमी’ (Dussehra) हा हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. दसरा हा या शुभ मुहूर्तांपैकी एक आहे असे मानले जाते. यामुळे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही काम करायला सुरुवात केली तर ते काम पूर्ण होते अशी अनेकांची आस्था आहे. यामुळे पूर्वीच्या काळी दसऱ्याच्या दिवशी राजे-महाराजे आपल्या सैन्यासह लढाई करण्यास निघत असत असेही म्हटले जाते. क्षत्रियांप्रमाणे व्यापारी मंडळीही याच दिवशी व्यापारासाठी बाहेर पडत, गावची सीमा ओलांडत असत. गावाची, नगराची सीमा ओलांडण्याच्या याच कृतीवर दसऱ्याशी निगडीत “सीमोल्लंघन करणे” ही म्हण प्रचलित झाली असा अंदाज लावला जातो. मुळात सीमोल्लंघन करणे म्हणजे जुन्या गोष्टी सोडून नव्या ध्येयासाठी पुढे जाणे होय.


दसऱ्याला (Dasara)काहीजण विजयदशमी असेही म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैत्य महिषासुर आणि दुर्गा यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. या युद्धाचा शेवट दसराच्या दिवशी झाला. अश्विन दशमीच्या दिवशी विजय मिळाल्यामुळेही या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणत असावेत असे असू शकते. दसऱ्याशी अन्य पौराणिक गोष्टीही संबंधित आहेत. भगवान श्रीराम यांनी राक्षसांचा राजा रावण यांचा वध दसऱ्याला केला होता. यामुळेच दसऱ्याला रावणवध देखील साजरा केला जातो. भारतात त्यातही उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दसऱ्याला रावणाचे मोठ्ठाले पुतळे तयार करुन ते जाळले जातात. या पुतळ्यांसह आपल्या सर्वांच्या आत असलेली नकारात्मक शक्तीही नाहीशी होवो असा विचार दडलेला आहे असे म्हटले जाते.


दसऱ्याच्या दिवशी पांडव अज्ञातवासातून बाहेर पडले म्हणजेच त्यांनी सीमोल्लंघन केले. अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी आपल्याला कोणी ओळखू नये यासाठी म्हणून आपापली शस्त्रे शमीच्या झाडावर लपवली होती. दसऱ्याला सर्व पांडवांनी ती शस्त्रे बाहेर काढून त्या पाचही भावंडांनी शस्त्रांची पूजा केली. यामुळेच आपल्याकडे विजयादशमीच्या, दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरातील मौल्यवान वस्तूंची पूजा केली जाते. पूजा करताना सरस्वती मातेचे आवाहन देखील केले जाते. महाराष्ट्रामध्ये दसऱ्याला आपट्याची पाने एकमेकांना देत शुभेच्छा दिल्या जातात.


Read More
dasara festival, political accusations, political speeches on dasara
राजकीय कुरघोडी करण्यासाठी दसऱ्यासारख्या सणाचा आखाडा कशाला करता?

एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी दसरा सणाचा उपयोग करायला या लोकांनी सुरूवात केली आहे. हे बंद करून दसरा मेळावा आदर्श पद्धतीने साजरा…

uddhav thackeray, BJP, dynasticism, corruption, Dussehra rally
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि आयाराम संस्कृतीवरून उद्धव ठाकरे यांनी केले भाजपला लक्ष्य

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना भाजप त्यात खोडा घालत असल्याचा आरोप करीत आणि केंद्राकडे घटनात्मक तरतुदीची मागणी करीत उद्धव ठाकरे…

bus accident, Shahapur, Shiv Sainik, aurangabad, Eknath shinde, Dussehra rally
शहापूरजवळ दसरा मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांच्या बसला अपघात, औरंगाबाद येथील १४ शिंदे समर्थक शिवसैनिक जखमी

जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. उपलब्ध बसने शिवसैनिक…

Kangana Ranaut sets fire Ravan effigy at Delhi on dussehra 2023
कंगना रणौतने केलं रावण दहन, ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला मिळाला मान; अध्यक्षांनी सांगितलं निवडीचं कारण

रावण दहनासाठी कंगना रणौतची निवड का करण्यात आली? समितीचे अध्यक्ष म्हणाले…

minister gulabrao patil criticized uddhav thackeray
आम्ही गद्दार मग अजित पवारांबद्दल गप्प का? गुलाबराव पाटील यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

राज्याचा सर्वाधिक दौरा करणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची इतिहास दखल घेईल, असा दावा पाटील यांनी केला.

dussehra 2023
विजयादशमीनिमित्त सोने-घरे-वाहन विक्रीचे ‘सीमोल्लंघन’; महागाई असतानाही सणासुदीच्या सवलतींमुळे ग्राहकांकडून खरेदीची लयलूट

सराफ बाजारात व्यावसायिकांनी घडणावळ किंवा तयार दागिन्यांवर २५ ते ५० टक्क्यांची सूट देऊ केली होती.

Uddhav Thackeray Dasara Speech
“३५ पुरणपोळ्या खाऊन ढेकर द्यायचे, नवरा-बायकोत भांडण लावायचं आणि…”, उद्धव ठाकरेंची भाजपावर खोचक टीका

उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली आहे.

एकनाथ शिंदे
“आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता आणि…”, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “मी साक्षीदार…”

आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला तर यात आश्चर्य वाटालयाल नको. त्या पापात आपण सहभागी नाही हे समाधान आहे. बाळासाहेब ज्यांना…

What Uddhav Thackeray Said?
“जालन्यात मराठा समाजावर लाठीचार्जचा आदेश देणारा डायर कोण? अजूनही…”, उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल

मराठा समाजाच्या आंदोलनावर जो लाठीमार झाला त्यावरुन उद्धव ठाकरेंची जोरदार टीका

RSS-chief-Mohan-Bhagwat-pay-respect-to-Dr-B-R-Ambedkar
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा संघाचा दृष्टीकोन कसा बदलत गेला? मोहन भागवत आंबेडकरांबद्दल काय म्हणाले? प्रीमियम स्टोरी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मेळाव्यात संघ प्रचारकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण वाचावे, असे आवाहन केले.

Sushma Andhare
“अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणारे अंधारात…”, सुषमा अंधारेंचा मोठा दावा; नावेही केली जाहीर

Shivaji Park Dasara Melava 2023 : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील आमदारांवर तोफ डागली आहे. तसंच, याप्रकरणी…

संबंधित बातम्या