scorecardresearch

मराठा आरक्षण

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.
Read More
beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी

शेतकरी आत्महत्या, चारा-पाणी टंचाई हे सर्वसामान्यांना भेडसावणारे मुद्दे प्रचाराबाहेर असून रेल्वेचा मुद्दा अधून-मधून केंद्रस्थानी आणला जात असल्याचे चित्र आहे.

pleas challenging maratha quota in bombay hc
मराठा आरक्षण : प्रवेश, नोकऱ्यांवर टांगती तलवार; नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन – उच्च न्यायालय

आरक्षणानुसार शैक्षणिक प्रवेश आणि सरकारी नोकऱ्यांतील नियुक्त्या केल्या गेल्यास त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असे पूर्णपीठाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासाठी घातलेली ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा आणि आरक्षण देणारा कायदा करण्याचा अधिकार कोणत्याही कायदेमंडळाला नाही.

manoj jarange patil loksabha election 2024
“यांना इतक्या ताकदीनं पाडा की…”, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन; देवेंद्र फडणवीसांचा केला उल्लेख!

मनोज जरांगे पाटील म्हणतात, “मी अजूनही गृहमंत्र्यांना सांगतो. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. मी निष्ठावान आहे. मी माझी जात…!”

parbhani lok saha seat mahayuti focus on divide maratha voting
परभणीत मराठा मतांच्या विभाजनावर महायुतीची भिस्त

परभणी लोकसभा मतदारसंघात मराठा मतांची विभागणी करण्यावर महायुतीच्या बाजूने लक्ष केंद्रित केले जात असून मतदारसंघातील सर्व मराठा मते एका दिशेने…

43 percent Maratha women labour Report of the Backward Classes Commission
४३ टक्के मराठा महिला मजूर; मागासवर्ग आयोगाचा अहवाल; सरकारी नोकऱ्यांतील प्रतिनिधित्वही कमी

 मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या पाहणीनुसार, मराठा समाजातील ४३.७६ टक्के महिला उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असल्याचे…

mpsc
मराठा आरक्षण निश्चितीनंतर परीक्षा? ‘एमपीएससी’च्या  निर्णयामुळे नाराजी

लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने फेब्रुवारीत मराठा आरक्षणाचा कायदा केला.

Hearing on petitions related to Maratha reservation now before the full bench of the High Court
मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी

मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याविरोधात आणि समर्थनार्थ करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे…

manoj jarange lok sabha election marathi news
जरांगे यांच्या निर्णयानंतर ‘मराठा मतपेढी’ ला आकार येण्याबाबत साशंकता

‘समाजाने ठरवावे कोणाला पाडावे, करेक्ट कार्यक्रम करावा’ या काही वक्तव्यामुळे मतदानाचा कल सत्ताधारी विरोधी रहावा, असे संकेत जरांगे यांनी दिले…

manoj jarange bacchu kadu
लोकसभा निवडणुकीत प्रहार आणि मनोज जरांगे एकत्र येणार? बच्चू कडू म्हणाले…

आमदार बच्चू कडू म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वी आम्ही केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो.

clash between 2 maratha groups
छ. संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, लाथाबुक्क्यांनी मारहाण; नेमकं प्रकरण काय?

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची एक बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी काही जणांनी एकमेकांवर हल्ला…

sakal maratha samaj, Nashik and Dindori Seats, lok sabha 2024, meeting, preparation, testing, candidate, reservation, maharashtra politics, marathi news,
नाशिक : सकल मराठा समाजाकडून लोकसभेसाठी चाचपणी

मनोज जरांगे यांच्या सूचनेनुसार सकल मराठा समाजाची पंचवटीतील संभाजीनगर रस्त्यावरील शेवंता लॉन्स येथे बैठक पार पडली. यावेळी नाशिक, दिंडोरी लोकसभा…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×