scorecardresearch

मराठी चित्रपट

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला मराठी चित्रपटांशी (Marathi Movie) सबंधित सर्व माहिती मिळेल. पारतंत्र्याच्या काळात मूकपटांच्या माध्यमातून भारतीयांपर्यंत चित्रपट पोहोचला होता. १८९५ मध्ये लुमिअर बंधूंनी चित्रपटाचा पहिला शो मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये प्रदर्शित केला. १९१२ मध्ये पहिला मराठी चित्रपट ‘पुंडलिक’चे चित्रीकरण या शहरात झाले. त्यानंतर अथक प्रयत्नांनंतर १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट (मूकपट) तयार केला. मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात ३ मे १९१३ या दिवशी प्रेक्षकांना तो पहिल्यांदा दाखवण्यात आला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट (Indian Cinema) तयार केले. दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचे जनक म्हटले जाते. फाळके यांच्याकडून प्रेरणा घेत भारतामधील प्रत्येक प्रांतामध्ये चित्रपटाचे वेड पसरले. थोड्याच कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये सुधारणा झाली. १९३१ नंतर बोलके चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.


बोलपटांमुळे भाषानुरूप चित्रपटांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट प्रदर्शित झाल्याच्या एक वर्षानंतर म्हणजे १९३२ मध्ये अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला. ‘प्रभात’चा संत तुकाराम हा चित्रपट १९३७ साली व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट हा बहुमान मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘श्यामची आई’ या आचार्य अत्रे दिग्दर्शित चित्रपटाने राष्ट्रपती पदक मिळवले होते. सिंहासन, अशी ही बनवाबनवी, एक डाव भुताचा, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, जैत रे जैत, माझा पती करोडपती, पिंजरा, झपाटलेला, आम्ही जातो आमुच्या गावा, जगाच्या पाठीवर, मधुचंद्र, पाठलाग, सामना, हा खेळ सावल्यांचा, कळत नकळत, उंबरठा हे काही गाजलेले मराठी चित्रपट आहेत. मराठी चित्रपटसृष्टीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. श्रीराम लागू, निळू फुले, अरुण सरनाईक, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, सुप्रिया, अशोक सराफ, प्रिया अरुण, निवेदिता जोशी, सुधीर जोशी, दिलीप प्रभावळ्कर, अलका कुबल, रमेश भाटकर, अजिंक्य देव, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्मिता पाटील, मोहन आगाशे, संध्या, रंजना, महेश कोठारे, सीमा देव, रमेश देव, काशिनाथ घाणेकर, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अश्विनी भावे, गिरीश कर्नाड अशा अनेक नामवंत कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे दादा कोंडके; ज्यांनी अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता,


जेव्हा विनोदी चित्रपट फार गाजत होते. पण सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना खूप पसंती मिळते. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मराठी चित्रपट आणि कलाकारांसंबंधित सर्व अपडेट्स तुम्ही येथे वाचू शकता.


Read More
Sachin Pilgaonkar how much spent on the bus of Navra Mazha Navsacha movie, Jaywant Wadkar reveals
‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘त्या’ बसवर सचिन पिळगांवकरांनी ‘इतका’ केला होता खर्च, जयवंत वाडकरांनी केला खुलासा

‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात जयवंत वाडकरांनी फक्त अभिनय नाही तर ‘ही’ जबाबदारी देखील सांभाळली होती…

Jaywant Wadkar talk about why prashant damle role cut from Navra Mazha Navsacha movie
‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात प्रशांत दामले झळकणार होते ‘या’ भूमिकेत, पण…; जयवंत वाडकरांनी सांगितला किस्सा

ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकरांनी सांगितलेला ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाविषयीचा ‘हा’ किस्सा वाचा…

sachin pilgaonkar supriya pilgaonkar swapnil joshi star navra maza navsacha part 2 shooting start on ratnagiri video viral
Video: ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या शूटिंगला कोकणात सुरुवात, कलाकारांचा व्हिडीओ आला समोर

रत्नागिरी स्थानकात ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचे शूटिंग, स्वप्नील जोशी दिसला बाप्पाला घेऊन तर…

chat with terav marathi movie team members
‘तेरवं’ : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची संघर्ष कथा

‘तेरवं’ या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक श्याम पेठकर, अभिनेत्री किरण खोजे आणि छायाचित्रणकार सुरेश देशमाने यांनी ‘लोकसत्ता’शी मनमोकळया गप्पा मारल्या.

shooting of films, serials, government medical colleges,
सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करता येणार चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण; जाणून घ्या कसे?

राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या इमारती या स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. तसेच, नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीही चित्रकरणासाठी उत्तम आहेत.

Marathi Film, Terav, show cancelled, Multiplex theatre , Single Screen, Success, narendra jichkar, Producer Alleges Bias,
मल्टीप्लेक्सचे धोरण मराठी विरोधी, नरेंद्र जिचकार यांचा आरोप

‘तेरवं’ हा सिनेमा ८ मार्चला महिला दिनी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला. सिंगल स्क्रीनवर चित्रपट चांगले प्रदर्शन करीत असताना मल्टीप्लेक्समध्ये मात्र…

Pushkar Jog said marathi films will win an oscar soon shared Cillian Murphy won best actor Oscar trophy for Oppenheimer film
“लवकरच मराठी चित्रपट…” ‘ओपेनहाइमर’ साठी सिलियन मर्फीने ऑस्कर जिंकल्यावर पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत

सिलियनच्या या बातमीची पोस्ट पुष्कर जोगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

marathi actor subodh bhave announced relese date of Sangeet Manapmaan marathi movie
‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस, अभिनेत्याने प्रदर्शनाची तारीख केली जाहीर

सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ चित्रपटातून भव्यदिव्य संगीतमय नजराणा अनुभवता येणार

movie swatantra veer savarkar in marathi
मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा आहे – रणदीप हुडा

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बहुचर्चित चित्रपटाचा मराठी ट्रेलर सोमवार, ११ मार्च रोजी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रदर्शित करण्यात आला.

SwatantryaVeer Savarkar marathi trailer out ankita lokhande in yamunabai role
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचा मराठीतील ट्रेलर प्रदर्शित; अंकिता लोखंडे म्हणाली, “मला खरंच…”

रणदीप हुड्डाने अभिनयाबरोबरच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे.

Myra Vaikul is now on the big screen play role in upcoming marathi movie naach ga ghuma
मराठी, हिंदी मालिकाविश्व गाजवल्यानंतर लाडकी मायरा वायकुळ आता मोठ्या पडद्यावर, स्वप्नील जोशीच्या ‘या’ चित्रपटात झळकणार

मायरा वायकुळ कुठल्या चित्रपटात झळकणार? जाणून घ्या…

संबंधित बातम्या