scorecardresearch

म्हाडा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वपूर्ण सरकारी संस्था आहे. या संस्थेला म्हाडा (Mhada) असेही म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या संस्थेचे नाव Maharashtra Housing and Area Development Authority असे आहे. या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरुन ‘म्हाडा’ हे नाव प्रचलित झाले आहे. या सरकारी संस्थेची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी झाली. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ आणि मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थांचे विलीनीकरण झाल्यानंतर म्हाडाची निर्मिती झाली असे म्हटले जाते.


महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मध्यम् व अल्प-उत्पन्न असलेल्या नागरिकांना परवडणाऱ्या दरांत घर मिळवून देण्याची सोय करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आजवर म्हाडाच्या अनेक प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई परिसरात तब्बल ३०,००० घरे सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.


प्राधिकरणाच्या स्थापनेपूर्वी म्हाडा हि संस्था “बाँम्बे हाऊसिंग बोर्ड” या नावाने ओळखली जात होती. म्हाडाचे मुख्यालय गृहनिर्माण भवन, कलानगर, वांद्रे (पू), मुंबई येथे आहे. मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ असे म्हाडाचे एकूण विभाग आहेत. या विभागांच्या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गृहनिर्माण धोरण राबवले जाते. म्हाडाअंतर्गत घर मिळवण्यासाठी तुम्ही https://www.mhada.gov.in/en या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.


Read More
Appointment of financial institution
विरार-बोळींजमधील घरांच्या विक्रीसाठी वित्तीय संस्थेची नियुक्ती

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींजमधील रिक्त ५१९४ घरांची विक्री करण्याकरिता मंडळाने आता विविध पर्यायांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai E auction shops
मुंबई : १७३ दुकानांचा ५ एप्रिल रोजी ई-लिलाव, नोंदणी, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील विविध ठिकाणच्या ७१३ दुकानांची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

virar bolinj mhada
दीड हजार कोटीची ५,१९४ घरे विक्रीविना, विरारबोळींजमधील घरांसाठी म्हाडाची कसरत सुरूच

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींजमधील दहा हजार घरांच्या प्रकल्पातील ५,१९४ घरे विक्रीवाचून धूळ खात पडून आहेत. अंदाजे दीड हजार कोटींच्या या…

House Taddeo
ताडदेवमधील साडेसात कोटींच्या घराची विक्री नाही, ‘म्हाडा’ची गेल्यावर्षीची सोडत, ४०८२ पैकी केवळ २७२६ घरांची विक्री

म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये काढलेल्या सोडतीतील घरांची विक्री किंमत अदा करण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे.

Mohite patil
विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका प्रीमियम स्टोरी

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराज झालेल्या माजी मंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुतणे व इच्छुक उमेदवार धैर्यशील…

megha engineering and shirke construction
मेघा इंजिनीअरिंग, शिर्के कन्स्ट्रक्शनच्या देणग्यांमध्ये ठरावीक ‘पॅटर्न’

हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने ११ एप्रिल २०२३ रोजी १४० कोटींची रोखेखरेदी केली

Joint meeting of MHADA mill workers mill workers union held regarding service charges of houses in Kon Panvel
कोनमधील घरांचे सेवाशुल्क कमी करा,संतप्त विजेत्यांची म्हाडावर धडक; १८ मार्चला संयुक्त बैठक

म्हाडाच्या मुंबई मंडळाने पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या घरासाठी ४२ हजार १३५ रुपये इतके वार्षिक सेवा शुल्क आकारले आहे.

Bandra Reclamation
म्हाडाच्या प्रस्तावातून वांद्रे रेक्लमेशन, आदर्शनगर वसाहत वगळल्याने रहिवाशी नाराज!

दोन्ही वसाहतींनाही तात्काळ पुनर्विकासाची आवश्यकता आहे. मात्र याबाबत निर्णय न झाल्याने रहिवाशी नाराज झाले आहेत.

MHADA
म्हाडाचा बाळकुमच्या ६८ विजेत्यांना दिलासा, घरांच्या किंमतीत ‘इतक्या’ रुपयांची कपात करण्याचा निर्णय

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २०१८ सोडतीतील बाळकुम येथील प्रकल्पातील संकेत क्रमाक २७६ मधील घरांच्या योजनेतील ६८ लाभार्थ्यांना अखेर म्हाडा प्राधिकरणाने दिलासा…

Owners old buildings mumbai
मुंबई : संपादित जुन्या इमारतींचे मालक पुनर्विकासासाठी पुन्हा सक्रिय! म्हाडाच्या हलगर्जीचा रहिवाशांना फटका?

मंडळाने भूखंड संपादित केले. परंतु मालमत्ता पत्रकावरील नाव न बदलल्याचा फायदा उठवत आता अशा जुन्या इमारतींचे मालक पुनर्विकासासाठी पुन्हा सक्रिय…

chhatrapati sambhajinagar, mhada non residential plots
संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, बीड जिल्ह्यांतील अनिवासी भूखंडांचा ई – लिलाव, अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीस सुरुवात

म्हाडाच्या छत्रपती संभाजीनगर मंडळाने आपल्या अखत्यारितील विविध जिल्ह्यांतील २० अनिवासी भूखंडांचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.

The Pune Board of Maharashtra Housing and Area Development Authority MHADA announced the lottery for houses in five districts of various income groups Pune news
घराचे स्वप्न आणा प्रत्यक्षात; पुणे म्हाडाची लॉटरी जाहीर

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने विविध उत्पन्न गटातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील…

संबंधित बातम्या