scorecardresearch

नाशिक न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
fraud in recruitment exam of Mahanirmiti case against four including two candidates
महानिर्मितीच्या भरती परीक्षेत गैरप्रकार, दोन उमेदवारांसह चौघांविरोधात गुन्हा

ऑनलाईन परीक्षेवेळी एकाने तोतया व्यक्तीच्या मदतीने तर दुसऱ्या उमेदवाराने छुप्या कॅमेऱ्याने प्रश्न बाहेर पाठवून ‘ब्लू टुथ’द्वारे उत्तर मागवत पेपर सोडविल्याचे…

Changes in Composite Assessment Test Exam Schedule
संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा वेळापत्रकात बदल

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात…

Mahavikas aghadis discussion is continues for Jalgaon Raver seat Sampada Patils name from Thackeray group
जळगाव, रावेर जागेसाठी मविआचा काथ्याकूट सुरुच, ठाकरे गटाकडून संपदा पाटील यांचे नाव चर्चेत

जळगावमध्ये भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, तर रावेरमधून खासदार रक्षा खडसे यांना महायुतीकडून भाजपने उमेदवारी जाहीर केली असली तरी महाविकास…

Chhagan Bhujbal willing to contest Nashik Lok Sabha seat
शिंदे गटाची पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे धाव; भुजबळांना उमेदवारीच्या चर्चेने अस्वस्थता

भाजपला साताऱ्याची जागा देण्याच्या मोबदल्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिकची जागा मागितली आहे. काही मतदारसंघात अदलाबदल होऊ शकते, असे संकेत…

Rajabhau Waje
नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना एकनिष्ठतेचे फळ मिळाले

आजवर कुठल्याही वादात न सापडलेले आणि साधी राहणी, मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ वाजे यांना शिवसेना ठाकरे गटाने एकनिष्ठतेचे…

nashik marathi news, nashik uddhav thakceray shivsena marathi news
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरीचे संकेत, उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर संतप्त

ठाकरे गटाने उमेदवाराची घोषणा केल्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. करंजकर समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

Nashik, Two Die, Separate incident, Well Accidents, Baglan Taluka, marathi news,
नाशिक : बागलाण तालुक्यात विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

बागलाण तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

nashik credai marathi news, real estate exhibition nashik marathi news
क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे एप्रिलमध्ये प्रदर्शनांची साखळी

स्वत:चे घरकुल असणे हे सर्वसामान्यांचे स्वप्न असते. तसेच गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून देखील बांधकाम क्षेत्राकडे बघितले जाते.

nashik district head masters union, disbursement of differential payments
नाशिक : शिक्षक-शिक्षकेतरांची फरक देयके त्वरीत द्यावीत, जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी

२०२३ ची देयके निघाली असताना २०१८ ची देयके न निघणे हा अन्याय असून मोठ्या प्रमाणात दलालांकडून आर्थिक मागणी केली जात…

A fire broke out at the platform of Gorakhpur-bound Godan Express from Lokmanya Tilak Terminus
लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेल्या गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग! | Nashik

लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे निघालेल्या गोदान एक्स्प्रेसच्या मालडब्याला आग! | Nashik

संबंधित बातम्या