scorecardresearch

नाशिक

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
NCP politician Chhagan Bhujbal pulled out of Nashik LS race
भुजबळ यांच्या माघारीमुळे समता परिषदेचे राज्य नेतृत्वावर प्रश्नचिन्ह -बैठकीत उमेदवारी करण्याचा आग्रह

खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने मंगळवारी आयोजित बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली.

Chhagan Bhujbals statement from Nashik Lok Sabha seat in discussion
नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य चर्चेत! | Chhagan Bhujbal on Nashik Loksabha

नाशिक लोकसभेच्या जागेवरून छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य चर्चेत! | Chhagan Bhujbal on Nashik Loksabha

Chhagan Bhujbal Nashik Lok Sabha
महायुतीत नाशिकचा तिढा सुटेना, आता छगन भुजबळांचं मोठं विधान; म्हणाले, “आमचा दावा…”

नाशिक लोकसभेची जागा छगन भुजबळ यांनी लढवावी, यासाठी समता परिषदेने ठराव केला. यानंतर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या…

nashik municipal schools semi english marathi news
नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना

महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी

आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना दुसरीकडे धरणांतील जलसाठा वेगाने कमी होत आहे. जिल्ह्यातील धरणसाठा २३.८९ टक्क्यांवर आला.

nashik water crisis marathi news, nashik water tankers marathi news
नाशिक जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची टँकरवर भिस्त, लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा अन प्रत्यक्षातील स्थितीत अंतर

एप्रिलच्या मध्यावर तापमानाने ४० अंशांचा टप्पा ओलांडला. उष्णतेच्या लाटेत पाणी टंचाईचे संकट भीषण स्वरुप धारण करीत आहे.

nashik market committee auction marathi news
नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत

नांदगाव आणि मनमाड बाजार समितीत बंद लिलाव लवकरच सुरू होतील, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

Now women are also in the crime investigation team in the police stations of the Commissionerate
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही

पोलीस तपासात महत्वपूर्ण मानल्या जाणऱ्या गुन्हे शोध पथकात (डीबी) महिला अंमलदाराची नियुक्ती करत महिला सक्षमीकरणाकडे पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.

More than 40 vehicles destroyed in Chowk Mandai fire
नाशिक : चौक मंडईतील आगीत ४० पेक्षा अधिक वाहने खाक

जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथे सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत ४० ते ५० वाहने खाक झाली. कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

संबंधित बातम्या